Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM मोदींना प्रश्न विचारणारी Helle Lyng कोण? ‘प्रोपोगेंडा’च्या आरोपांमुळे जगभरात चर्चेत

Helle Lyng : हेले लिंग नॉर्वेच्या ओस्लो शहरातील Dagsavisen या वृत्तसंस्थेची पत्रकार आहे. सध्या पंतप्रधान मोदींना तिने विचारलेल्या प्रश्नांमुळे जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. तिच्यावर भारतविरोधी प्रचार केल्याचा आरोप केला जात आहे. तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 20, 2026 | 03:34 PM
Helle Lyng

Helle Lyng

Follow Us
Follow Us:
  • Norway पत्रकार हेले लिंगे कोण आहे?
  • पत्रकारितेच्या नावाखाली भारतविरोधी प्रचारचा करतेय प्रयत्न?
  • जाणून घ्या
Who is Helle Lyng : ओस्लो : सध्या जगभरात नॉर्वेजियन पत्रकार हेले लिंगची जोरदार चर्चा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना नॉर्वेत पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यानंतर तिच्यावर भारतविरोधी प्रोपोगेंडा पसरवत असल्याचा आरोप केला जात आहे. यावरुन सोशल मीडियावर मोठा वाद पेटला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिचे मेटा फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंटही सस्पेंड करण्यात आले आहे.

PM Modi Norway Controversy : प्रेस स्वातंत्र्याची किंमत? PM मोदींना प्रश्न विचारणाऱ्या नॉर्वेजियन पत्रकाराचे मेटा अकाऊंट सस्पेंड

नेमकं काय घडलं होतं?

पत्रकार लिंगने पंतप्रधानांना, माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे का देत नाहीत? असा प्रश्न केला होता. तसेच मानवाधिकर मुद्द्यांवरही प्रश्न वितारले होते. यावेळी पंतप्रधान मोदी उत्तर न देता निघून गेले होते. या प्रसगांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत लिंगने विचारले की, भारताचे पंतप्रधानांनी माझ्या प्रश्नाला उत्तर दिले  नाही, याची मला अपेक्षा नव्हती.

नॉर्वे जागतिक प्रेस स्वातंत्र निर्देशकांत पहिल्या क्रमांकावर आहे, तर भारत १५७ व्या क्रमांकावर आहेत. आणि सरकारला प्रश्न विचारणे आमचे काम आहे. या पोस्टनंतर मोठा वाद पेटला होता. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषदत बोलावून लिंगला प्रश्न विचारण्याची संधी दिली. यावेळी लिंगने भारतावर विश्वास का ठेवावा? भारत मानवाधिकारांच्या उल्लंघनावर काय भूमिका  आहे, असे प्रश्न उपस्थित केले. तसेच यांची थेट उत्तरे मागितले.

परराष्ट्र मंत्रालयाचे उत्तर

लिंगच्या या प्रश्नांवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सिबी जॉर्ज यांनी उत्तर दिले. व त्यांनी म्हटले की, राजधानी दिल्लीतच केवळ २०० हून अधिक प्रसारमाध्यमे आहेत, ज्यावरुन आमच्या स्वातंत्र्याची आणि मजबूत लोकशाहीची भूमिका स्पष्ट होते असे म्हटले. तसेच त्यांनी अपुरी माहिती आणि स्वयंसेवी संस्थांच्या अहवालाच्या आधारे भारताबाबत मत बनवणाऱ्यांवरही टीका केली.

प्रपोगंडा पसरवल्याचा आरोप

दरम्यान हेले लिंग यांच्यावर सध्या प्रोपोगेंडा पसरवल्याचा आरोप केला जात आहे. एप्रिल २०२४ नंतर लिंगने एक्सवर कोणतीही पोस्ट केली नव्हती. त्यानंतर थेट पंतप्रधान मोदींबद्द पोस्ट केली होती. शिवाय लिंगने ज्या कार्यक्रमात प्रश्न विचारला ती पत्रकार परिषद नव्हती.

दोन्ही देशांमधील करारांची माहिती देण्याचा अधिकृत कार्यक्रमत होता. अशा परिस्थिती लिंगने जाणूनबुजून प्रश्न विचारल्याचा आरोप आहे. लिंग परदेशी गुप्तहेर असल्याचाही दावा केला जात आहे. परंतु मी केवळ एक पत्रकार आहे, कोणत्याही देशाची गुप्तहेर नाही असे लिंगने स्पष्ट केले आहे.

कोण आहे हेले लिंग?

हेले लिंग नॉर्वेच्या ओस्लो शहरातील Dagsavisen या वृत्तसंस्थेची पत्रकार आहे. तिचे एक्सवर ५० हजार पेक्षाही कमी फॉलोवर्स आहेत. परंतु सध्या पंतप्रधान मोदींना तिने विचारलेल्या प्रश्नांमुळे जगभरात चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या लिंगवर भारतविरोधी प्रचाराचा आरोप असून प्रचंड ट्रोल केले जात आहे.

PM Modi Norway Visit : भारताचा मोठा अपमान? नॉर्वेजियन मीडियाने PM मोदींना म्हटले ‘गारुडी’ ; ‘त्या’ व्यंगचित्राने पेटला वाद

Web Title: Who is helle lyng pm modi question propaganda controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

World News :रशियन ड्रोन पाडण्यासाठी युक्रेनची AI गन सज्ज;‘Geran-5’लाही केलं लक्ष्य
1

World News :रशियन ड्रोन पाडण्यासाठी युक्रेनची AI गन सज्ज;‘Geran-5’लाही केलं लक्ष्य

Elon Musk: ‘इन्स्टाग्रामवरील टिप्पणी, जोडीदारांशी ब्रेकअप आणि कामाच्या ठिकाणचे वाद…’; एलॉन मस्क यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ
2

Elon Musk: ‘इन्स्टाग्रामवरील टिप्पणी, जोडीदारांशी ब्रेकअप आणि कामाच्या ठिकाणचे वाद…’; एलॉन मस्क यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ

Nobel Prize 2026: विज्ञानविश्वात ऐतिहासिक क्षण! प्रकाशाने मेंदूतील पेशींवर नियंत्रण मिळवणाऱ्या 3 महान शास्त्रज्ञांना नोबेल जाहीर
3

Nobel Prize 2026: विज्ञानविश्वात ऐतिहासिक क्षण! प्रकाशाने मेंदूतील पेशींवर नियंत्रण मिळवणाऱ्या 3 महान शास्त्रज्ञांना नोबेल जाहीर

Breaking News:जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत
4

Breaking News:जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.