Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tarique Rahman: कट्टरपंथीयांचा काळ बनून परतणार तारिक रहमान; ज्याच्या एका आवाजावर उभा राहतो अख्खा Bangladesh

Tarique Rahman : शेख हसीना सरकार उलथवल्यानंतर बांगलादेशने पहिल्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. तारिक रहमान यांच्या परतीच्या घोषणेसह, तरुण नेते शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 21, 2025 | 10:58 AM
Who is Tariq Rahman The Bangladeshi community fears his return

Who is Tariq Rahman The Bangladeshi community fears his return

Follow Us
Close
Follow Us:
  • बांगलादेशात १२ फेब्रुवारी २०२५ रोजी निवडणुका जाहीर झाल्या असून, १७ वर्षांनंतर बीएनपी नेते तारिक रहमान २५ डिसेंबरला मायदेशी परतणार आहेत.
  •  तरुण नेते शरीफ उस्मान हादी यांच्या हत्येचा तपास अद्याप संथ असून, या घटनेचा वापर इस्लामिक ध्रुवीकरणासाठी केला जात असल्याचा आरोप होत आहे.
  •  तारिक रहमान यांच्या वाढत्या प्रभावामुळे जमात-ए-इस्लामी आणि अंतरिम सरकारमध्ये अस्वस्थता असून, निवडणुका पुढे ढकलण्यासाठी देश अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

Tarique Rahman return to Bangladesh December 2025 : बांगलादेशातील (Bangladesh)राजकारण सध्या एका अत्यंत स्फोटक वळणावर येऊन ठेपले आहे. शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर आता देशात १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सार्वत्रिक निवडणुका घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या घोषणेसोबतच बांगलादेशातील रस्त्यांवर पुन्हा एकदा हिंसाचाराचा वणवा पेटला आहे. १७ वर्षांच्या प्रदीर्घ वनवासानंतर ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ (BNP) चे कार्यवाहक अध्यक्ष तारिक रहमान (Tariq Rahman) २५ डिसेंबर रोजी मायदेशी परतणार आहेत. त्यांच्या या पुनरागमनाने जमात-ए-इस्लामी आणि कट्टरपंथी गटांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असून, राजकीय विश्लेषकांच्या मते याच भीतीपोटी बांगलादेशाला पुन्हा एकदा अस्थिरतेच्या खाईत लोटले जात आहे.

शरीफ उस्मान हादींची हत्या: राजकीय षडयंत्र की अंतर्गत कट?

गेल्या आठवड्यात ‘इन्कलाब मंच’चे निमंत्रक आणि तरुण नेते शरीफ उस्मान हादी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेला आठ दिवस उलटूनही अद्याप एकाही संशयिताला अटक करण्यात आलेली नाही. सुरुवातीला बीएनपी आणि त्यानंतर अवामी लीगवर या हत्येचा आरोप करण्यात आला. मात्र, पोलीस तपासातील प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या हादी यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने केल्याचा संशय आहे. हादी यांनी बीएनपीचे ज्येष्ठ नेते मिर्झा अब्बास यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज भरला होता, ज्यामुळे ही राजकीय रंजिश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, हत्येनंतर ज्या प्रकारे कट्टरपंथी तरुण रस्त्यावर उतरले आणि भारतीय प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्यात आले, त्यावरून हा एक सुनियोजित कट असल्याचे दिसून येते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Epstein Files : जेफ्री एपस्टाईनशी संबंधित किमान 16 फायली गहाळ! 24 तासांत ट्रम्पचे फोटोही डिलीट; अमेरिकेत तुफान गदारोळ

अल्पसंख्याकांवर पुन्हा संकट; लोकसंख्या २ टक्क्यांवर?

राजकीय विश्लेषक पार्थ मुखोपाध्याय यांच्या मते, हादी यांच्या हत्येचा वापर हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर अत्याचार करण्यासाठी केला जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर इस्लामिक ध्रुवीकरण करण्यासाठी जाणीवपूर्वक हिंसाचार भडकवला जात आहे. एकेकाळी ८ टक्के असलेली हिंदू लोकसंख्या आता अवघ्या २ टक्क्यांवर आली आहे. दीपू दास यांच्यासारख्या हिंदू नेत्यांवरील हल्ल्यांनी अल्पसंख्याकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, मोठ्या प्रमाणावर पलायन सुरू झाले आहे. या हिंसाचारामुळे भारताशी असलेले संबंध अधिक ताणले जात असून, भारतविरोधी चळवळीला नव्याने हवा दिली जात आहे.

I am deeply saddened by the tragic killing of Sharif Osman Hadi. May Allah grant his soul forgiveness and place him in Jannat. This untimely death is a grave reminder of the human cost of political violence. Hadi was a brave political activist and a clear, fearless voice who… pic.twitter.com/UOJKZrvnRi — Tarique Rahman (@trahmanbnp) December 18, 2025

credit : social media and Twitter

तारिक रहमानच्या पुनरागमनाने का घाबरली ‘जमात’?

जमात-ए-इस्लामीला भीती आहे की, तारिक रहमान बांगलादेशात परतल्यास बीएनपी एक मोठी शक्ती म्हणून उदयास येईल. झियाउर रहमान यांच्या वारशाचा आधार घेऊन बीएनपी राष्ट्रवादी भावनांना चालना देईल, ज्यामुळे जमातचे ‘इस्लामी अजेंडा’ धोक्यात येऊ शकतो. मुहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने प्रशासनापासून लष्करापर्यंत सर्व महत्त्वाच्या पदांवर जमातशी संबंधित लोकांची नियुक्ती केली आहे. जर निवडणुका सुरळीत पार पडल्या आणि बीएनपी सत्तेत आली, तर ही पकड सैल होईल. त्यामुळेच देश अस्थिर करून निवडणुका पुढे ढकलण्याचा जमातचा प्रयत्न असल्याचे मानले जाते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Violence: ज्याच्यामुळे बांगलादेश पेटला, त्याच्यावरच युनूसने उधळली स्तुतीसुमने; हादीच्या अंत्यसंस्काराला जनसागराचा ओघ

युनूस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

मोहम्मद युनूस यांनी हादी यांच्या अंत्यसंस्काराला लावलेली उपस्थिती आणि त्यांना दिलेली ‘नायक’ पदवी यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हादी यांचे दफन राष्ट्रीय कवी नजरुल इस्लाम यांच्या कबरीजवळ करणे, हा युनूस यांचा कोणता संदेश आहे? एका बाजूला अवामी लीगच्या समर्थकांवर कठोर कारवाई होत असताना, दुसरीकडे कट्टरपंथी शक्तींना मोकळे रान दिले जात असल्याचा आरोप होत आहे. बांगलादेश आता लोकशाहीकडे जाणार की पुन्हा एकदा कट्टरपंथीयांच्या हातात जाणार, याचा फैसला येणाऱ्या काही दिवसांत तारिक रहमान यांच्या पुनरागमनानंतर होईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बांगलादेशात निवडणुका कधी होणार आहेत?

    Ans: बांगलादेशात १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

  • Que: तारिक रहमान कोण आहेत आणि ते कधी परतणार आहेत?

    Ans: तारिक रहमान हे बीएनपी (BNP) चे कार्यवाहक अध्यक्ष असून ते २५ डिसेंबर २०२५ रोजी १७ वर्षांच्या निर्वासनानंतर परतणार आहेत.

  • Que: शरीफ उस्मान हादींच्या हत्येमुळे काय वाद निर्माण झाला आहे?

    Ans: हादी यांच्या हत्येनंतर अद्याप कोणालाही अटक झालेली नाही, उलट या घटनेचा वापर अल्पसंख्याकांवर हल्ले आणि भारतविरोधी निदर्शनांसाठी केला जात आहे.

Web Title: Who is tariq rahman the bangladeshi community fears his return

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 10:58 AM

Topics:  

  • Bangladesh
  • Bangladesh Crisis
  • Bangladesh violence
  • sheikh hasina

संबंधित बातम्या

Bangladesh Violence: ज्याच्यामुळे बांगलादेश पेटला, त्याच्यावरच युनूसने उधळली स्तुतीसुमने; हादीच्या अंत्यसंस्काराला जनसागराचा ओघ
1

Bangladesh Violence: ज्याच्यामुळे बांगलादेश पेटला, त्याच्यावरच युनूसने उधळली स्तुतीसुमने; हादीच्या अंत्यसंस्काराला जनसागराचा ओघ

Justice For Deepu Das: बांगलादेशातील हिंसेवर मोठी अपडेट!  7 आरोपी गजाआड; थरकाप उडवणारा खुलासा आला समोर
2

Justice For Deepu Das: बांगलादेशातील हिंसेवर मोठी अपडेट! 7 आरोपी गजाआड; थरकाप उडवणारा खुलासा आला समोर

Bangladesh Violence: बांगलादेशात हिंदूंचे रक्त सांडले! प्रियांका गांधी अस्वस्थ; न्यायाच्या मागणीला काँग्रेसचा आक्रोशाचा स्वर
3

Bangladesh Violence: बांगलादेशात हिंदूंचे रक्त सांडले! प्रियांका गांधी अस्वस्थ; न्यायाच्या मागणीला काँग्रेसचा आक्रोशाचा स्वर

IndianArmy: बांगलादेशातील अशांततेनंतर भारतीय लष्कर सतर्क; ड्रोन आणि S-400 ने सीमांवर नजर, कमांडर सक्रिय
4

IndianArmy: बांगलादेशातील अशांततेनंतर भारतीय लष्कर सतर्क; ड्रोन आणि S-400 ने सीमांवर नजर, कमांडर सक्रिय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.