Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Saudi Vs UAE: येमेनचे होणार दोन तुकडे? जाणून घ्या कसे फुटीरतावादी संघटना ‘STC’ मुळे दोन महासत्ता एकमेकांना भिडल्या

Saudi Vs UAE: येमेनच्या बंदर शहर मुकाल्लावरील सौदी हल्ल्यामुळे पुन्हा एकदा दक्षिणी संक्रमणकालीन परिषद (STC) चर्चेत आली आहे. सौदी अरेबियाचा आरोप आहे की युएई एसटीसीला शस्त्रास्त्रे पुरवत आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Dec 31, 2025 | 11:54 AM
who is yemen separatist group stc saudi uae conflict explained marathi

who is yemen separatist group stc saudi uae conflict explained marathi

Follow Us
Close
Follow Us:
  •  ‘STC’ ही दक्षिण येमेनला एक स्वतंत्र देश बनवण्यासाठी लढणारी एक शक्तिशाली फुटीरतावादी संघटना आहे.
  •  आधुनिक शस्त्रे, ड्रोन आणि मोठा निधी पुरवून युएई या संघटनेला पडद्यामागून पाठबळ देत असल्याचा सौदीचा आरोप आहे.
  •  तेल आणि वायूने समृद्ध असलेल्या हद्रमाउत आणि मुकाल्ला बंदरावर वर्चस्व मिळवण्याच्या स्पर्धेतून सौदी आणि युएईमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.

Saudi UAE conflict over Yemen STC explained : मध्यपूर्वेतील राजकारण सध्या एका नवीन वळणावर येऊन ठेपले आहे. एकेकाळी हातात हात घालून लढणारे सौदी अरेबिया (Saudi Arabia) आणि युएई (UAE) आज आमनेसामने उभे आहेत. या वादाच्या मुळाशी आहे येमेनची एक फुटीरतावादी संघटना, जिचे नाव आहे ‘दक्षिणी संक्रमणकालीन परिषद’ म्हणजेच STC (Southern Transitional Council). मुकाल्ला बंदरावर सौदीने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर ही संघटना जागतिक स्तरावर चर्चेत आली आहे. पण ही संघटना नक्की कोण आहे आणि तिच्यामुळे दोन महासत्ता का भांडत आहेत? चला जाणून घेऊया.

एसटीसी (STC) म्हणजे काय आणि तिचा उद्देश काय?

एसटीसीची स्थापना २०१७ मध्ये झाली असून तिचे मुख्यालय दक्षिण येमेनचे महत्त्वाचे शहर ‘एडेन’ (Aden) येथे आहे. या संघटनेचे नेतृत्व एद्रुस अल-झोबैदी करत आहेत. ही संघटना स्वतःला दक्षिण येमेनच्या जनतेचा आवाज म्हणवून घेते. त्यांचा मुख्य उद्देश म्हणजे १९९० पूर्वीप्रमाणे येमेनचे दोन भाग करून ‘दक्षिण येमेन’ हा एक स्वतंत्र देश निर्माण करणे. एसटीसीचे समर्थक आजही दक्षिण येमेनचा जुना ध्वज फडकवतात आणि सौदी समर्थित येमेन सरकारला विरोध करतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Ukraine War : युक्रेनच्या जखमेवर भारताने चोळले मीठ? झेलेन्स्की यांचा पंतप्रधान मोदींवर ‘हा’ गंभीर आरोप

हौथी बंडखोरांना टक्कर आणि तेलावर ताबा

येमेनचा उत्तर भाग सध्या इराण समर्थित हौथी बंडखोरांच्या ताब्यात आहे. एसटीसीचा दावा आहे की ते दक्षिण आणि पूर्व येमेनला हौथींच्या प्रभावापासून वाचवत आहेत. विशेषतः हद्रमाउत सारख्या प्रांतात, जिथे तेल आणि नैसर्गिक वायूचे अफाट साठे आहेत, तिथे एसटीसीने आपले पाय घट्ट रोवले आहेत. या संघटनेकडे आजच्या घडीला आधुनिक क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि प्रशिक्षित लढाऊ सैनिकांची मोठी फौज आहे, ज्यामुळे ही संघटना केवळ बंडखोर राहिली नसून एक समांतर सरकार चालवत आहे.

BREAKING: Tens of thousands gather in Seiyun City in the Hadhramaut governate, urging STC to declare “South Arabia” a sovereign state After this month’s offensive, the anti-Muslim Brotherhood STC now controls all areas that made up the independent state of South Yemen 1967-1990 pic.twitter.com/vYtkMquNuT — Visegrád 24 (@visegrad24) December 28, 2025

credit : social media and Twitter

युएईचा पाठिंबा आणि सौदीचा आक्षेप

सौदी अरेबियाचा असा आरोप आहे की, युएई या संघटनेला गुपचूप शस्त्रे आणि पैसा पुरवत आहे. युएई हे उघडपणे मान्य करत नसली, तरी या संघटनेद्वारे युएईला लाल समुद्र आणि अरबी समुद्रातील महत्त्वाच्या व्यापारी मार्गांवर (Maritime Routes) स्वतःचे नियंत्रण हवे आहे. दुसरीकडे, सौदी अरेबिया येमेनची फाळणी करण्याच्या विरोधात आहे. सौदीला भीती आहे की जर दक्षिण येमेन वेगळा झाला, तर त्यांचे या क्षेत्रातील वर्चस्व कमी होईल आणि युएईचा प्रभाव वाढेल. मुकाल्ला बंदर हे यासाठीच महत्त्वाचे आहे, कारण तिथून आंतरराष्ट्रीय व्यापारावर लक्ष ठेवणे सोपे जाते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Saudi vs UAE: युएईचा ‘एक्झिट’ प्लॅन! सौदीला एकटे पाडून अमिरातीला काय करायचे आहे साध्य? वाचा विशेष रिपोर्ट

येमेनची भौगोलिक स्थिती: युद्धाचे खरे कारण

येमेन हे लाल समुद्राच्या तोंडावर वसलेले आहे. जगातील सुमारे १२% तेल व्यापार याच मार्गातून जातो. इस्रायल, सौदी आणि इजिप्तसाठी हा मार्ग म्हणजे ‘लाईफलाईन’ आहे. युएई भौगोलिकदृष्ट्या लाल समुद्रापासून दूर आहे, त्यामुळे एसटीसीच्या माध्यमातून या सागरी मार्गावर आपली पकड मजबूत करणे हा युएईचा ‘मास्टर प्लॅन’ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याच सत्तासंघर्षामुळे आता सौदी आणि युएईमधील मैत्रीत मोठी दरी निर्माण झाली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: एसटीसी (STC) संघटनेची स्थापना कधी आणि का झाली?

    Ans: एसटीसीची स्थापना २०१७ मध्ये झाली. दक्षिण येमेनला एक स्वतंत्र देश बनवणे हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • Que: सौदी अरेबियाचा या संघटनेला विरोध का आहे?

    Ans: सौदीला येमेनचे विभाजन नको आहे, कारण यामुळे या क्षेत्रातील सौदीचे वर्चस्व कमी होऊन युएईचा प्रभाव वाढण्याची भीती आहे.

  • Que: युएई आणि एसटीसीमध्ये काय संबंध आहेत?

    Ans: युएई या संघटनेला आर्थिक आणि लष्करी मदत पुरवत असल्याचा आरोप आहे, जेणेकरून सागरी मार्गांवर युएईचे नियंत्रण राहील.

Web Title: Who is yemen separatist group stc saudi uae conflict explained marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 11:54 AM

Topics:  

  • International Political news
  • Saudi Arabia
  • UAE
  • yemen

संबंधित बातम्या

Saudi vs UAE: युएईचा ‘एक्झिट’ प्लॅन! सौदीला एकटे पाडून अमिरातीला काय करायचे आहे साध्य? वाचा विशेष रिपोर्ट
1

Saudi vs UAE: युएईचा ‘एक्झिट’ प्लॅन! सौदीला एकटे पाडून अमिरातीला काय करायचे आहे साध्य? वाचा विशेष रिपोर्ट

Russia Ukraine War : युक्रेनच्या जखमेवर भारताने चोळले मीठ? झेलेन्स्की यांचा पंतप्रधान मोदींवर ‘हा’ गंभीर आरोप
2

Russia Ukraine War : युक्रेनच्या जखमेवर भारताने चोळले मीठ? झेलेन्स्की यांचा पंतप्रधान मोदींवर ‘हा’ गंभीर आरोप

अमेरिका नव्हे तर ‘या’ अरब देशाने केले हजारो भारतीयांना हद्दपार; MEA च्या आकडेवारीतून धक्कादायक खुलासा
3

अमेरिका नव्हे तर ‘या’ अरब देशाने केले हजारो भारतीयांना हद्दपार; MEA च्या आकडेवारीतून धक्कादायक खुलासा

भारतासाठी धोक्याचे संकेत? UAE चे अध्यक्ष पाकिस्तानात; मोठी लष्करी गुंतवणूक करण्याची शक्यता
4

भारतासाठी धोक्याचे संकेत? UAE चे अध्यक्ष पाकिस्तानात; मोठी लष्करी गुंतवणूक करण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.