'ते अमेरिकेला घाबरतात...' ; रशियन टँकर जप्त करताच ट्रम्पचे Putin-Jinping ला खुलं आव्हान (फोटो सौजन्य: AI जनरेटेड)
व्हेनेझुएलाच्या समुद्रात अमेरिकेची मोठी कारवाई! रशियन जहाज जप्त केल्याने पुतिन संतप्त
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले हे की, रशिया आणि चीन फक्त अमेरिकेला घबारतात. ट्रम्प यांच्या मते, त्यांच्या पहिल्या कार्यकाळात आणि आताच्या कार्यकाळातही त्यांचे सैन्य अधिक मजबूत झाले आहे. परंतु चीन आणि रशिया आजही त्यांच्या मागे आहेत. त्यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये गोंधळ सुरु झाला आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे ती, जर रशियाने अटलांटिक महासागरातील अमेरिकेच्या कारवाईत हस्तक्षेप केला नसता तर पूर्ण युक्रेन त्यांच्याकडे असता. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिका असा एकमेव देश आहे, ज्याला रशिया आणि चीन घाबरतात.
अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या समुद्रातील रशियन तेल टँकर मरिनेराला जप्त केले आहे. या टँकरला पूर्वी बेला- 1 म्हणून ओळखला जायचे. अमेरिका हा तेल टँकर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल यामुळे रशियाने या टँकरचे नाव मरीनेरा केले होते. तसेच रशियाने या टँकरमागे पाणबुड्या आणि युद्धनौकही तैनात केल्या होत्या. ज्यामुळे अमेरिका कोणत्याही प्रकारची कारवाई करु शकणार नाही.
परंतु अमेरिकेने रशियाच्या या टँकरला जप्त केले असून व्हेनेझुएलावार अमेरिकेचा मोठा प्रभाव असल्याचे म्हटले. तसेच रशियाने व्हेनेझुएलावरील अमरिकेच्या निर्बंधांचे उल्लंघन केल्याच्या कारणाने रशियाच्या तेल टँकरला जप्त करण्यात आले असल्याचे स्पष्टीकरण दिले. रशियाने अमेरिकेच्या या कारवाईला तीव्र विरोध केला आहे. तसेच जहाजावरील रशियन नागरिकांबाबत बोलताना गरज पडल्यास त्यांना अमेरिकेत आणले जाईल. रशियाने अमेरिकेने त्याच्या तेल टँकरवर कारवाई करुन आंतरराष्ट्रीय सागरी कायद्याचे उल्लंघ केल्याचा आरोप अमेरिकेवर केला आहे.






