Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

10 Km डावी-उजवीकडे Brahmos असते वळले, नेस्तनाबूत झाले असते पाकिस्तान; अमेरिकेचीही वाढली होती धाकधुक!

India Pakistan War : भारत आणि पाकिस्तानमध्ये आता युद्धबंदी झाली असून अमेरिकेच्या मध्यस्थीने हे युद्ध थांबवण्यात आले आहे. मात्र अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करण्याचे कारण समोर येत आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 12, 2025 | 04:05 PM
Why did US President Donald Trump mediate in the India-Pakistan war news update

Why did US President Donald Trump mediate in the India-Pakistan war news update

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली आहे. मात्र तरी देखील भारतीय सेनेकडून खबरदारी घेतली जात आहे. भारतीय सेनेने पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना चांगलीच अद्दल घडवली आहे. पहलगाम हल्ल्यावर प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर करुन पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले. यामध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. मात्र यानंतर पाकिस्तानने आगळीक करुन भारतीय सीमा भागातील राज्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या चर्चेमध्ये एक मुद्दा प्रकर्षाने समोर येत आहे तो म्हणजे भारत पाकिस्तान प्रश्नांमध्ये काहीही बोलणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या अमेरिकेने अचानक युद्धबंदीसाठी मध्यस्थी केली तरी का?  असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धपरिस्थिती निर्माण होऊन भारताने पाकिस्तानी सैन्याच्या नाकी नऊ आणले. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भारताला पाठिंबा मिळाला होता. 10 मे रोजी अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत सोशल मीडिया पोस्ट करुन युद्धबंदी लागू केली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील हल्ले थांबले आहेत. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या अनेकदा चर्चा केल्यानंतर आणि दोन्ही देशांनी कॉमन सेंस वापरल्याबद्दल धन्यवाद मानले होते. मात्र यासंबंधी नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांच्या मुद्द्यात उडी का घेतली? तर चला तर मग याचे उत्तर आता जाणून घेण्याचा प्रयत्न करु

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पाकिस्तानला प्रत्येक हल्ल्याचे मिळाले सडेतोड उत्तर 

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ७ मे रोजी पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात १०० दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. पण, या हल्ल्यानंतर पाकिस्तान घाबरला आणि नियंत्रण रेषेवर सतत गोळीबार सुरू केला. एवढेच नाही तर त्याने भारताच्या काही भागांवर ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्नही केला. तथापि, भारताने पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले.

अमेरिका का हादरली?

08 आणि 09 मे रोजी दोन्ही देशांमधील लढाई मोठ्या प्रमाणात वाढली. पाकिस्तानने भारतावर फतेह क्षेपणास्त्रही डागले, परंतु भारताने ते क्षेपणास्त्र हवेत पाडले. पण त्यानंतर भारताने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आणि शुक्रवारी नूरखान एअरबेसवर मोठा हल्ला केला. या हल्ल्याने संपूर्ण जग हादरले.

अणुबॉम्बचा धोका होता!

आता तुमच्या मनात हा प्रश्न येत असेल की एअरबेस उडवून देण्याने जगाचे काय नुकसान होईल? तर उत्तर आहे अणुबॉम्ब. हो… अमेरिकेसह इतर देश अणुबॉम्बच्या भीतीने पछाडले होते. या कारणास्तव, अमेरिका दोन्ही देशांशी चर्चा करण्यासाठी मोठी घाई केली.

भारत पाकिस्तान युद्धाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा

अणुशस्त्रागार फक्त 10 किमी अंतरावर होते

खरं तर, भारताने लक्ष्य केलेला पाकिस्तानचा नूरखान हवाई तळ पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्यापासून फक्त १० किलोमीटर अंतरावर होता. या उच्च सुरक्षा साइटला पाकिस्तानी स्ट्रॅटेजिक प्लॅन डिव्हिजन (PSPD) म्हणतात.

…म्हणूनच अमेरिकेने हस्तक्षेप केला

एका परदेशी माध्यमाच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्यातील सर्वात जास्त वॉरहेड्स पीएसपीडीमध्ये साठवले जातात. तिथून फक्त १० किमी अंतरावर भारताने मोठा हल्ला केला होता. त्यानंतर अमेरिकेच्या व्हाईट हाऊसला पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना धोका असल्याची भीती वाटली. म्हणूनच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला.

पाकिस्तानला केला फोन 

हा संशय आल्यानंतर उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना फोन करून अणुसाठ्याची माहिती घेतली. अणुऊर्जा धोक्यात आहे हे लक्षात येताच त्यांनी दोन्ही देशांशी युद्धबंदीबद्दल बोलले आणि त्यांना त्यावर सहमती मिळवून दिली. भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचा रहीम यार खान हवाई तळ उद्ध्वस्त झाला. यामध्ये कचरा इतका जास्त आहे की तो साफ करण्यासाठी आठवडा लागेल.

पाकिस्तान जगाच्या नकाशावरून गायब होईल!

अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी स्वतः म्हटले होते की अमेरिका भारत आणि पाकिस्तानमधील या मुद्द्यात सहभागी होणार नाही. त्यांनी म्हटले होते की हा दोन्ही देशांमधील मुद्दा आहे आणि आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही, परंतु जेव्हा पाकिस्तान नकाशावरून गायब झाल्याची बातमी आली तेव्हा त्यांनी भारत आणि पाकिस्तानशी बोलून हा प्रश्न सोडवण्याचा आग्रह धरला.

Web Title: Why did us president donald trump mediate in the india pakistan war news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 04:05 PM

Topics:  

  • india pakistan war
  • Operation Sindoor
  • Pahalgam Terrorist Attack

संबंधित बातम्या

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images
1

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन, पहा Satellite images

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”
2

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शौर्यासाठी भारतीय जवानांचा गौरव; ९ वीरांना ‘वीर चक्र’ जाहीर
3

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शौर्यासाठी भारतीय जवानांचा गौरव; ९ वीरांना ‘वीर चक्र’ जाहीर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात  गुडघे टेकायला लावल्याचा दावा
4

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात गुडघे टेकायला लावल्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.