रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अमेरिकेच्या दबावानंतरही पुतिन भारत दौऱ्यावर; तारिखही झाली निश्चित, Su-57 वर होणार मोठा करार
यावेळी जयशंकर रशियन समकक्ष सर्गेई लावरोव्ह यांच्याशी भारत-रशियाच्या द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा करतील. यावेळी जयशंकर रशियन समकक्ष सर्गेई लावरोव्ह यांच्याशी भारत-रशियाच्या द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा करतील. भारत रशियाच्या धोरणात्मक संबंधाना चालना देण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल म्हटले जात आहे. शिवाय ही बैठक अशा वेळी होत आहे जेव्हा जागतिक स्तरावर रशिया युक्रेन युद्धामुळे जागतिक स्तरावर तणाव आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, १७-१८ नोव्हेंबर रोजी रशिया-भारताची उच्चस्तरीय SCO बैठक होणार आहे. या बैठकीच एस. जयशंकर उपस्थित राहतील. सोमवारी १७ नोव्हेंबर रोजी ते रशियाचे समकक्ष सर्वेई लावरोव्ह यांच्याशी औपचारिक चर्चा करणार आहेत. या बैठकीत केवळ द्विपक्षीय संबंधावरच नव्हे, तर दोन्ही देशांच्या राजकीय सहकार्यावर, व्यापारावर आढावा घेतला जाणार आहे.
याशिवाय SCO, BRICS, UN, G-20 यांसारख्या मंचावर सहकार्य करण्यावरही चर्चा होईल. याशिवाय उर्जा सुरक्षा, संरक्षण सहकार्य आणि आर्थिक भागीदारी यांसारख्या क्षेत्रांवरही चर्चा होणे अपेक्षित आहे. जयशंकर आणि सर्गेई यांच्यात, युक्रेन युद्ध, मध्य पूर्वेतील अस्थिरता आणि इंडो-पॅसिफिक प्रदेश या सर्व बाबींवर विचारांची देवाण-घेवाण होईल.
एस. जयशंकर यांचा हा दौरा पुतिन यांच्या भारत दौऱ्यापूर्वी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) ५ डिसेंबर रोजी भारतात येणार असल्याचे रशियाच्या क्रेमलिनन स्पष्ट केले आहे. यावेळी ते रशिया-भारत फोरमच्या अधिवेशनात सहभागी होतील. अमेरिकेच्या दबावाला झुगारुन पुतिन यांचा हा दौरा होत आहे.
यावेळी ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासोबत एक वार्षिक बैठक होणार आहे. भारत आणि रशिया संबंधासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. शिवाय पुतिन यांचा हा दौरा अशावेळी होत आहे, जेव्हा अमेरिकेने रशियाच्या तेल व्यापारावर निर्बंध लादले आहेत. ज्यामुळे भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.






