खैबर पख्तूनख्वामध्ये पाकिस्तानी सैन्याची मोठी कारवाई; २६ दहशतवादी ठार केल्याचा दावा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pakistan News in Marathi : इस्लामाबाद : पाकिस्तानच्या (Pakistan) खैबर पख्तूनख्वा प्रांताता सुरक्षा दल आणि गुन्हेगारांमध्ये चकामक झाली. या चकामकीत २६ दहशतवादी ठार केल्याचा दावा पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी केला आहे. दहशतवाद्यांबाबत मिळालेल्या एका गुप्त माहितीनुसार, ही मोहिम राबवण्यात आली असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
Indus Waters Treaty : सिंधु पाणी करारवर भारताचा बहिष्कार ; पाकिस्तानने केली नाराजी व्यक्त
पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादविरोधी मोहिमेअंतर्गत खैबर पख्तूनख्वाच्या तीन वेगवेगळ्या भागांत कारवाई करण्यात आली. या कारवाईत त्यांना मोठे मिळाले आहे. अधिकाऱ्यांनी दावा केला की, त्यांनी त्यांच्या दहशतवादविरोधी दृढ वचनबद्धतेचे पालन केले आहे. त्यांनी खैबर पख्तूनख्वाच्या बाजौर, कोहट आणि करक जिल्ह्यात त्यांनी मोहिम राबवली. पाकिस्तानच्या सुरक्षा दलांना सुत्रांकडून गुप्त माहिती मिळाली होती. यामुळे पख्तूनख्वामध्ये दहशतवाद्यांची उपस्थितीची माहिती मिळताच तातडीने कारवाई करण्यात आले असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, त्यांचे दहशतवाविरोधी हे ऑपरेशन सुरुच राहिले. एकही दहशतवादी जिवंत ठेवला जाणार नाही. यापूर्वी मरदान जिल्ह्यातील कटलांग भागात पाकिस्तानने कारवाऊ करत १२ दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा केला होता. पाकिस्तानने म्हटले होते की, अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या दहशतवाद्यांना आम्ही ठार केले आहे.
आम्ही सुरुवातीपासूनच दहशतवादाविरोधात आहोत असेही पाकिस्तानने म्हटले होते. परंतु यामध्ये नागरिकांचीही हत्या झाल्याचे वृत्त समोर आले होते. गेल्या अनेक काळापासून पाकिस्तानमध्ये अंतर्गत लढाई देखील सुरु आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये सतत बॉम्ब हल्ले होत होते, शिवाय अफगाणिस्तान तालिबान दहशतवाद्यांची घुसखोरी वाढली होती. यामुळे बलुचिस्तानच्या नागरिकांनी सरकारविरोधात बंड पुकारला होता. पाकिस्तानने अनेक वेळा दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. परंतु तरीही त्यांच्याच देशात सतत हल्ले होत आहे.
नुकतेच मंगळवारी (१२ नोव्हेंबर) पाकिस्तानच्या राजधानी इस्लामाबाद येथे उच्च न्यायालयाबाहेर स्फोट झाला होता. यासाठी पाकिस्तानने भारताला जबाबदार धरले होते. त्यांच्या मते, अफगाण तालिबान दहशतवाद्यांनी हल्ले केला असून, हे भारताचे प्रॉक्सी आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी दावा केला होता की, त्यांच्या देशात २०२५ मध्ये ३००० अफगाण दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे. त्यांनी सांगितले की, हे दहशतवादी पाकिस्तानच्या वेगवगेळ्या भागांमध्ये राहून दहशत निर्माण करत आहेत.
इस्लामाबाद स्फोटानंतर पाकिस्तानचा इशारा! भारताला जबाबदार धरत अफगाणिस्तानवर हल्ल्याची दिली धमकी






