Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आधी माफी मागा, मगच…’, पाकिस्तान सरकार एलॉन मस्कवर का संतापले? काय आहे नेमकं प्रकरण?

अलीकडे टेस्ला आणि स्पेस एक्स कंपनीचे मालक एलॉन मस्क डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मैत्रीनंतर अनेक वेळा चर्चेत आले आहेत. दरम्यान एलॉन मस्क आणि पाकिस्तान सरकारमध्ये एक नवा वाद उभा राहिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jan 27, 2025 | 11:58 AM
Why Pakistani Government seeking Apology from Elon Musk know the details

Why Pakistani Government seeking Apology from Elon Musk know the details

Follow Us
Follow Us:

इस्लामाबाद: अलीकडे टेस्ला आणि स्पेस एक्स कंपनीचे मालक एलॉन मस्क चर्चेचा विषय बनत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी मैत्रीनंतर ते अनेक वेळा चर्चेत आले आहेत. दरम्यान एलॉन मस्क आणि पाकिस्तान सरकारमध्ये एक नवा वाद उभा राहिला आहे. पाकिस्तान सरकारने एलॉन मस्कवर पाकिस्तानविरोधी वक्तव्ये केल्याचा आरोप केला असून त्यांनी पाकिस्तानविरोधी प्रचार केला असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान सरकारने एलॉन मस्क यांच्या माफीची मागणी केली आहे.

मस्क यांना पाकिस्तान मध्ये इंटरनेटसेवा सुरु करण्याची परवानगी मिळणार? 

या सर्व गोष्टी अशा वेळी घडत आहे जेव्हा मस्क यांच्या सॅटेलाइट कंपनी स्टारलिंकने पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी नियामक परवान्यासाठी अर्ज केला होता. मात्र, पाकिस्तान सरकारने अद्याप या अर्जाला मंजुरी दिलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तान सरकारने एलॉन मस्क यांच्याकडून माफीची मागणी केली आहे. यापूर्वी, पाकिस्तानमधील माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार समितीने स्टारलिंकसाठी मस्कच्या अर्जाची तपासणी करण्यासाठी एक बैठक आयोजित केली होती.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- डोनाल्ड ट्रम्प यांना सोशल मीडियावरुन जीवे मारण्याची धमकी; फ्लोरिडात एका संशयिताला पोलिसांकडून अटक

पाकिस्तान अधिक संतापला

या समितीचे अध्यक्ष पलवाशा मोहम्मद जई खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील अनेक संसद सदस्य मस्कच्या सोशल मीडिया पोस्टवर नाराज आहेत, यामध्ये मस्क यांनी पाकिस्तानविरोधी विधान केले हेते. एलॉन मस्कवर पाकिस्तानचे संसद सदस्य संताप वाढत चालला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

दरम्यान, मस्क यांच्या पोस्टचा मुद्दा ब्रिटनमध्ये पाकिस्तानी वंशाच्या लोकांविरुद्ध झालेल्या बाल लैंगिक शोषणाच्या प्रकरणाशी संबंधित आहे. 1997 ते 2013 दरम्यान ब्रिटनमधील रॉदरहॅममध्ये 1400 पेक्षा जास्त बालकांचे शोषण करण्यात आले होते. या प्रकरणात पाकिस्तानी वंशाच्या लोकांचा मोठा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते.

यावर, एलॉन मस्क यांनी ब्रिटन सरकारवर टीका केली होती. एलॉन मस्क यांच्या या विधानावर पाकिस्तानच्या काही नेत्यांनी संताप व्यक्त केला असून त्याच्या विरोधात आवाज उठवला आहे. विशेषत: मस्क यांनी ‘आशियाई गँग’ असा उल्लेख केल्याने पाकिस्तानच्या संसद सदस्यांचा संताप तीव्र झाल आहे.

भारताचाही समावेश? 

या प्रकणावर भारतच्या शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी आशियाई टोळी नाही पाकिस्तानी टोळी असे म्हटले होते तर, एलॉन मस्क यांनी याचे समर्थन करत ‘सच’ असे म्हटले होते. या कारणाने पाकिस्तान सरकार संतापलेले असून मस्क यांच्याकडून माफीची मागणी केली आहे आणि त्यानंतरच स्टारलिंकच्या इंटरनेट सेवा पुरवठ्यासाठी नियामक मंजुरी विचारण्याचे सांगितले आहे. या वादामुळे भविष्यातील व्यवसायिक संबंधांवर परिणाम होऊ शकतो असे म्हटले जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Bangladesh Crisis: मोहम्मद युनूस सरकारवर संकटाचे सावट; अमेरिकेने काढून घेतली ‘ही’ मोठी मदत

Web Title: Why pakistani government seeking apology from elon musk know the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2025 | 11:58 AM

Topics:  

  • elon musk
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

US News: अमेरिकेत दरोडेखोरांचा थरार; सर्व रोकड दिल्यानंतरही 56 वर्षीय गुजराती व्यापाऱ्याची मुलीसमोरच गोळ्या झाडून हत्या
1

US News: अमेरिकेत दरोडेखोरांचा थरार; सर्व रोकड दिल्यानंतरही 56 वर्षीय गुजराती व्यापाऱ्याची मुलीसमोरच गोळ्या झाडून हत्या

Japan Earthquake: जपानमध्ये शक्तिशाली भूकंपाचा धक्का; २३ जण जखमी, टोकियोमध्ये वीजपुरवठा खंडित, रेल्वे सेवा थांबली
2

Japan Earthquake: जपानमध्ये शक्तिशाली भूकंपाचा धक्का; २३ जण जखमी, टोकियोमध्ये वीजपुरवठा खंडित, रेल्वे सेवा थांबली

Thailand curfew: थायलंडमध्ये भीषण हिंसाचारानंतर 3 प्रांतांत कर्फ्यू; बॉम्बस्फोट, गोळीबार अन् महामार्ग रोखला; लष्कराची मोठी कारवाई
3

Thailand curfew: थायलंडमध्ये भीषण हिंसाचारानंतर 3 प्रांतांत कर्फ्यू; बॉम्बस्फोट, गोळीबार अन् महामार्ग रोखला; लष्कराची मोठी कारवाई

OperationSindoor: ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त झालेला जैशचा तळ 15 महिन्यांत पुन्हा उभा; बहावलपूरमधून सॅटेलाइट फोटोंद्वारे खुलासा
4

OperationSindoor: ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त झालेला जैशचा तळ 15 महिन्यांत पुन्हा उभा; बहावलपूरमधून सॅटेलाइट फोटोंद्वारे खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.