
फोटो सौजन्य AI
वॉशिंग्टन / तेहरान :
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आता धोकादायक वळणावर आला आहे. गेल्या 72 तासांत अमेरिकेने दक्षिण इराणमधील हवाई हल्ले लक्षणीयरीत्या वाढवले आहेत. वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार बंदर, रस्ते, तेल पाइपलाइन आणि लष्करी लॉजिस्टिक्स केंद्रांना लक्ष्य करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षा टीमची तातडीची बैठक घेतली. सूत्रांचे म्हणणे आहे की इराणकडून होणाऱ्या प्रॉक्सी हल्ल्यांमुळे आणि आखाती भागातील अमेरिकी तळांवर वाढणाऱ्या धोक्यामुळे ट्रम्प वैतागले आहेत. त्यांनी पेंटागॉनला दबाव अधिक वाढवा असे आदेश दिल्याचे सांगितले जाते.
UK Politics : लेबर पार्टीचे नेते अँडी बर्नहम बनले यूकेचे नवे पंतप्रधान, सोमवारी होणार अधिकृत घोषणा
सध्या अमेरिका केवळ हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांपुरतीच मर्यादित आहे. पण वॉशिंग्टनमधील काही वरिष्ठ अधिकारी खाजगीत ग्राउंड इन्कर्शन च्या पर्यायांवरही चर्चा करत आहेत. याच कारणामुळे बाजारात आणि राजकीय वर्तुळात तणाव आहे.मात्र इराणने कठोर इशारा दिला आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डचे कमांडर म्हणाले, आमच्या भूमीवर एकही परदेशी बूट पडल्यास त्याचा आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ. याची किंमत संपूर्ण प्रदेशाला मोजावी लागेल. इराणने आखाती देशांतील अमेरिकी तळ आणि जहाजांना लक्ष्य करण्याची धमकीही दिली आहे.जेव्हा जेव्हा अमेरिका जमिनीवर उतरून लढायला गेली आहे . तेव्हा तेव्हा इराक वगळता तिला सपाटून मार खावा लागला आहे . याची उदाहरण जसे कि अफगाणिस्थान , व्हियेतनाम , आणि इराणचा सुद्धा जमिनीवर लढण्याचा मोठा अनुभव आहे . इराण ने जवळपास १४ वर्ष इराक सोबत युद्ध केलेलं आहे . आणि तसेच इराण हा काही इराक सारखा सपाट प्रदेश असणारा देश नाही . इराणमध्ये डोंगर आहेत , वाळवंट आहे , समुद्र आहे , त्यामुळे जमिनीवर अमेरिकेची ची दमछाक होऊ शकते हे जवळपास निश्चित आहे .
Middle East Crisis: इराण ने घेतला बदला ? जॉर्डन मध्ये उडवले अमेरिकी विमाने , अमेरिकेचे नुकसान ?
तज्ञांच्या मते पुढील escalation मुळे 3 मोठे धोके आहेत.
पहिला मानवी संकट.
जमिनीवरील युद्ध झाले तर हजारो नागरिक आणि सैनिक मारले जाऊ शकतात.
दुसरा आर्थिक धक्का.
इराण होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी देत आहे. तसे झाल्यास कच्च्या तेलाचे दर 150 डॉलरपर्यंत जाऊ शकतात.
तिसरा प्रादेशिक युद्ध.
लेबनॉनचा हिज्बुल्ला, येमेनचे हूती आणि इराकमधील गट या संघर्षात उडी घेऊ शकतात.व्हाइट हाउसने अद्याप जमिनीवरील सैन्य पाठवण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, आम्हाला युद्ध नको आहे. पण अमेरिका आणि आमच्या मित्रराष्ट्रांच्या सुरक्षेशी कोणी खेळ करू शकत नाही. पुढील 48 तास निर्णायक मानले जात आहेत. इराण कसा प्रतिसाद देतो आणि अमेरिका किती पुढे जाते यावरच संपूर्ण मध्यपूर्वेचे भवितव्य अवलंबून आहे.