Will Hamas accept Trump's Gaza Peace Plan
Gaza War news in Marathi : तेल अवीव : गाझात गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ इस्रायल आणि हमासचे युद्ध (Israel Hamas War) सुरु आहे. या युद्धामुळे गाझात प्रचंड विध्वंस झाला असून अनेक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. याच वेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझात युद्धबंदीसाठी २० कलमी शांतता प्रस्ताव मांडला आहे. ज्याला इस्रायलकडून मान्यता मिळाली आहे. तसेच मुस्लिम आणि अरब राष्ट्रांनी देखील सहमती दर्शवली आहे. भारताने या योजनेचे स्वागत केले आहे. पण हमासने मात्र अद्याप यावर होकार दिलेला नाही. यामुळे सर्वत्र हमास ट्रम्प यांचा प्रस्तावर मान्य करेल यावर शंका व्यक्त केली जात आहे.
हमास अस्तित्वात आला तो म्हणजे, १९८७ मध्ये, परंतु २०२३ व्या वर्षात त्याचे नाव जगभर ऐकले गेले. कारण ७ ऑक्टेबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. तेव्हापासून हमास बातम्यामध्ये, हेडलाईन्समध्ये टॉपवर राहिला.या हल्ल्यात हमासने १२००० इस्रायलींना ठार केले होते, तर २०० हून अधिक लोकांना बंदी बनवले होते. यानंतरच इस्रायल आणि हमासमध्ये तीव्र संघर्ष सुरु झाला, जो आजही सुरुच आहे.
हमास हा इस्रायलच्या अस्तित्वाला विरोध करणार एक गट आहे. हमासच्या मते इस्रायलने पॅलेस्टिनींच्या भूमीवर ताबा जमवला आहे. यामुळे इस्रायलाकडून पॅलेस्टिनींची जमीन परत घेणे आणि एक इस्लामिक राज्य स्थापन करणे या संघटनेचा हेतू आहे. हमासला वेस्ट बँक ते पूर्व जेरुसेलमपर्यंत इस्लामिक राज्य स्थापन करायचे आहे.
Trump Gaza Plan : ट्रम्प यांच्या गाझा योजनेला PM मोदींचा पाठिंबा; इतर देशांनाही केले समर्थनाचे आवाहन