Gaza War : इस्रायल गाझातील संघर्ष थांबवण्यास तयार? येत्या २४ तासांत ट्रम्प-नेतन्याहू करु शकतात युद्धबंदीची घोषणा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Israel Hamas War : तेल अवीव : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netnyahu) यांनी गाझातील युद्धबंदीला सहमती दर्शवली आहे. नुकतेच त्यांनी अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची भेट घेतली.या वेळी ट्रम्प यांनी गाझातील युद्धबंदीसाठी आणि ओलिसांच्या सुटकेसाठी नेतन्याहूंसमोर एक प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला नेतन्याहूंनी मंजुरी दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीसाठी २१ कलमी योजना सादर केली आहे. नेतन्याहूंच्या मंजुरीनंतर पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आली. ट्रम्प यांनी म्हटले की, हमासने (Hamas) ही योजना मान्य केल्यास युद्ध लवकरच संपेल. पण ते या योजनेशी सहमत नसतील तर इस्रायलला ही योजना पूर्णपणे रद्द करण्याचा अधिकारा आहे आणि अमेरिकेचा याला पाठिंबा असेल.
याच वेळी नेतन्याहूंनी देखील इशारा दिली की, गाझामध्ये पूर्णत: शांतता निर्माण होईल. यासाठी हमासला आपली शस्त्र सोडावी लागतील यानंतर लगेचच इस्रायल गाझातून हळूहळू माघार घेण्यास सुरुवात करेल. त्यांनी पुढे म्हटले की, आम्ही युद्धबंदीसाठी तयार आहोत, पण हमासने या प्रस्तावाला नकार दिला तर इस्रायल त्यांना नष्ट करण्याचे कार्य पूर्ण करेल.
हमासने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, सध्या गाझातील युद्धबंदीसाठी त्यांना कोणताही औपचारिक प्रस्ताव मिळालेला नाही. तसेच हमासने शस्त्र सोडण्यासही नकार दिला आहे. तर दुसरीकडे पॅलेस्टिनी सरकारने ट्रम्प यांच्या योजनेचे स्वागत केले आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. ट्रम्प आणि नेतन्याहूंनी कुठे भेट घेतली?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी २९ सप्टेंबर रोजी अमेरिकेच्या व्हाइट हाउसमध्ये भेट घेतली.
प्रश्न २. ट्रम्प आणि नेतन्याहूमध्ये काय चर्चा झाली?
ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यात गाझातील इस्रायल-हमास युद्ध थांबवण्यावर चर्चा झाली.
प्रश्न ३. डोनाल्ड ट्रम्प यांनी नेतन्याहूंसमोर युद्धबंदीसाठी किती कलमी प्रस्तावर मांडला?
ट्रम्प यांनी नेतन्याहूंन समोर गाझात युद्धबंदीसाठी २० कलमी प्रस्ताव मांडला.
भारत-कॅनडा संबंध पुन्हा होताहेत दृढ; जयशंकर यांनी घेतली अनिता आनंद यांची भेट घेतली