Will India benefit from Trump's H-1B visa fee hike Know what experts says
H-1B Visa update : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रविवारी H-1B व्हिसाच्या शुल्कात वाढ केली. तसेच त्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरीही केली. आता H-1B व्हिसा धारकांना यासाठी १ लाख अमेरिकन डॉलर (भारतीय रुपयांत ८८ ते ९० लाख) खर्च करावे लागणार आहेत. याचा सर्वाधिक फटका भारतीयांना बसणार असल्याचे मानले जात आहे. यामुळे अनेक कंपन्यांमध्ये आणि अमेरिकेत नोकरी करणाऱ्या तरुणांचा गोंधळ उडाला आहे. भारताच्या आयटी क्षेत्रात आणि व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
काय आहे ट्रम्प प्रशानाचे म्हणणे
ट्रम्प प्रशासनाने व्यावसायिकांसाठी गोल्ड कार्ड सुरु केले असून हे त्यांना अमेरिकेत आणण्यास मदत करेल असे म्हटले आहे. तर दुसरीकजे H-1B व्हिसा शुल्क वाढीमुळे त्याचा गैरवापर कमी होईल. ट्रम्प प्रशासनाच्या मते, अनेक मोठ्या आयटी कंपन्या परदेशी लोकांना अमेरिकन अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या पगाराच्या तुलनेत कमी पगारावर कामावर ठेवत आहेत. यामुळे अमेरिकन नागरिकांना नोकरीच्या संधी उपलब्ध नाही. पण H-1B व्हिसा शुल्क वाढीमुळे कंपन्या परदेशी लोकांना घेणे टाळतील आणि देशातील तरुणांना संधी देतील असे युक्तीवाद आहे.
या नवीन व्हिसा शुल्कामुळे लोक अमेरिकेत स्थलांतर करण्यापूर्वी विचार करतील असेही म्हटले जात आहे. तसेच हा व्हिसा केवळ नव्या अर्जदारांना लागू होणार असल्याचे ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तज्ज्ञाच्या मते याचा भारताला फायदा आणि तोटा दोन्ही आहे. मात्र यामुळे अमेरिकेला सर्वाधिक नुकसान होणार आहे.
Explainer: ट्रम्पच्या नव्या आदेशाने भूकंप, सर्व H-1B विसाधारकांचे शुल्क 1 लाख अमेरिकी डॉलर असणार?
यामुळे H-1B व्हिसाच्या शुल्क वाढीचा भारतावर परिणाम होईलच पण भारताला याचा फायदा देखील होईल.
काय आहे H-1B व्हिसा?
H1B व्हिसा हा परदेशी कर्मचाऱ्यांना अमेरिकच्या विशिष्ट कंपन्यांमध्ये नोकरी करण्याचा, अमेरिकेत व्यवसायांमध्ये संधी देतो. तीन वर्षांसाठी हा व्हिसा दिला जातो. सहा वर्षांपर्यंत वाढवण्याची यामध्ये सवलत असते.
भारताला व्हिसा शुल्कवाढीचा फायदा होणार?
तज्ज्ञांच्या मते, भारतासमोर H1B व्हिसा शुल्क वाढीमुळे आव्हाने आणि संधी दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. याचा भारताला आर्थिक दृष्ट्या फायदा आणि तोटा दोन्ही आहे.
भारतीयांचा नाद नाही! अमेरिकेच्या H-1B ‘व्हिसा बॉम्ब’ला केला फुसका; शोधला ‘हा’ जुगाडू पर्याय