Will India-Canada relations improve under new leadership What will be Carney's role
ओटावा: कॅनडाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून मार्क कार्नी यांनी जस्टिन ट्रुडोंना मागे टाकले आहे. सध्या त्यांची जगभरात चर्चा सुरु असून भारतातही ते चर्चेचा विषय बनले आहेत. जस्टिन ट्रूडो पंतप्रधानपदी असताना खलिस्तान चवळीबाबत त्यांनी भारतविरोधी आक्रमक भूमिका स्वीकारली होता. यामुळे दोन्ही देशांत संबंधांमध्ये बिघाड झाला होता. यामुळे कार्नी यांच्या नव्या नेतृत्त्वाखाली भारत-कॅनडा संबंध सुधारतील का? भारताविरोधात त्यांची भूमिका काय असेल? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
कोण आहेत मार्क कार्नी?
मार्क कार्नी यांनी राजकारणात प्रवेश करम्यापूर्वी बँक ऑफ इंग्लंडमध्ये काम केले होते. त्यांची गणना जगातील अग्रगण्य अर्थतज्ज्ञांमध्ये केली जाते. कार्नी यांनी हॉवर्ड विद्यापीठातून 1988 मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी लिबरल पक्षात प्रवेश केल्यानंतर अर्थव्यवस्थेतील विविध विषयांवर स्पष्ट मते मांडली आहेत.
सध्या कॅनडाच्या अर्थव्यवस्थेवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅनडाविरोधी घेतलेल्या टॅरिफ धोरणांचा मोठा परिणाम होत आहे.लिबरल पक्षाने देशात आर्थिक स्थिरता आणण्यासाठी कार्नी यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे सडेतोड भाषणशैली आणि उत्तर प्रशासकीय अनुभव आहे.
खलिस्तान आणि भारताबाबत कार्नी यांची भूमिका
कार्नी हे लिबरल पक्षाचे नेते आहेत. यामुळे त्यांची विचारसरणी पक्षाप्रमाणे समान आहे. माजी पंतप्रधान ट्रूडो यांनी खलिस्तानी चळवळींना थेट समर्थन केले नव्हते, परंतु त्यांनी भारविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली होती. यामुळे भारत आणि कॅनडाचे संबंध कमालीचे तणावग्रस्त झाले होते.
सध्या कार्नी यांची भूमिका याबाबतीत स्पष्ट नाही. त्यांनी कदीही खलिस्तानी चळवळींना विरोधही केला नाही आणि उघडपणे समर्थनही दर्शवले नाही. मात्र, कॅनडातील प्रभावशाली शीख लॉबीचा त्यांना पाठिंबा मिळत आहे. लिबरल्सच्या शीख नेत्यांनीच त्यांचा प्रचार करण्यास सुरुवात केली होती, त्यांना राजकीय पाठिंबा दिला होता.
भारत कॅनडा संबंध सुधारण्याची शक्यता
कार्नी यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असताना भारतासोबत व्यापारिक संबंध सुधारण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी दोन्ही देशांमधील अडचणी दूर करुन व्यापर पुन्हा सुरु करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, व्यवसायसंबंधी दोन्ही देशांत जी काही समस्या असेल ती मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. दोन्ही देशांतील संबंध रुळावर आणण्याचा प्रयत्न राहिल. तसेच 2023 मध्ये ट्रूडो यांच्या भारविरोधी भूमिकेमुळे कॅनडासोबतचे व्यापारिक करार थांबले होते. अशा परिस्थतीत कार्नी यांचे नेतृत्व भारतासाठी सकारात्मक ठरेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.