Will Khyber Pakhtunkhwa seprate from Pakistan, After Balochistan says CTD Report
इस्लामाबाद: सध्या पाकिस्तानला एकामागून एक झटका मिळत आहे. नुकतेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने पाकिस्तानसमोर पुढील कर्ज देण्याआधीच नवीन अटी ठेवल्या आहेत. एकीकडे पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानचे महत्त्वाचे प्रांत बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा पाकिस्तानपासून वेगळे होण्याचा मार्गावर आहेत. याचा मागचे कारण म्हणजे पाकिस्तानमधील वाढते दहशतवादी हल्ले, स्फोट, लोकांवरील अत्याचार यासर्व गोष्टींना पाकिस्तान बळी पडत चालला आहे.
तसे पाहायला गेले तर पाकिस्तानमध्ये स्फोट, दहशतवादी हल्ले काही नवीन नाहीत. परंतु २०२५च्या वर्षात या घटनांमध्य़े मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे खैबर पख्तूनख्वा देखील पाकिस्तानपासून वेगळे होण्याच्या मार्गावर असलेले संकेत मिळाले आहे.२०२५ मध्ये एकट्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात १३७ दिवसांत तब्बल २८४ हल्ले झाले आहेत. खैबर पख्तूनख्वाच्या उत्तर वझिरिस्तान, बानू, डेरा, इस्माइल खान, पेशावर आणि कुर्रम हे भाग दहशतवाद्यांच्या विळख्यात अडकले आहेत. या भागात केवळ सामान्य नागरिकच नव्हे तर सुरक्षा दलांचे देखील मोठ्या प्रमाणात बळी गेले आहेत.
पाकिस्तानच्या काऊंटर टेररिझम डिपार्टमेंटने (CTD) एक अहवाल सादर केला आहे. या अहवालाने खळबळ उडाली आहे. तसेच पाकिस्तान सरकार आणि लष्कराच्या अपयशाची पोलखोल केली आहे. अहवालानुसार, पाकिस्तानने १४८ दहशतवाद्यांना ठार केले आहे. मात्र, १११६ संशयितांपैकी केवळ ९५ दहशतवाद्यांना अटक करण्यात पाकला यश आले आहे. यावरुन पाकिस्तानची प्रशासकीय यंत्रणेची क्षमता किती कमी आहे हे सष्ट होते.
खैबर पख्तूनख्वामध्ये सर्वाधिक दहशवादी हल्ले झाले आहेत. यामागचे कारण लष्कराने स्वीकारलेली गुड तालिबान आणि बॅड तालिबान ही दुहेरी नीती असल्याचे CTD च्या अहवालात सांगण्यात आले आहे. तहरिक-ए-तालिबान, लष्कर-ए-तैयबा यांसारख्या दहशतवादी संघटनांना पाकिस्तानने शह दिला आहे. त्यांच्यावर कधीच कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे खैबर पख्तूनख्वाच्या भागात अस्थिरता निर्माण झाली आहे. हा प्रांत अफगाण सीमेला लागून असल्यामुळे दहशतवाद्यांना याठिकाणी सुरक्षित आश्रय मिळाला आहे.
अहलवालात दिलेल्या माहितीनुसार, अस्थिरतेसाठी केवळ दहशतवाद नाही, तर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ, इम्रान खान व सध्याचे पंतप्रधान शाहबाज शरीफ देखील यासाठी कारणीभूत आहेत. या तिन्ही नेत्यांनी सत्ता आणि लष्कराच्या फायद्यासाठी खैबर पख्तूनख्वाच्या जनतेचा बळी घेतला आहे. यामुळे स्थानिक लोकांचा रोष वाढत आहे.
CTD च्या अहवालात नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात पाकिस्तानमध्ये लष्कराविरोधी ५० हून अधिक निदर्शने काढण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थी, समाजसेवक आणि सामान्य लोक आंदोलनात उतरले आहे. अनेक ठिकाणी लष्कराच्या वाहनांवर हल्ले केले जात आहे. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील ही परिस्थिती पाकिस्तानच्या भवितव्यासाठ धोकादायक ठरत आहे.
खैबर पख्तूख्वाने देखील बलुचिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवत वेगळे होण्याची मागणी केली तर लवकरच पाकिस्तानचे तुकडे होण्याची शक्यता आहे.