जिद्दीला सलाम! 'या' ब्रिटिश गिर्यारोहकाने १९व्यांदा गाठले एव्हरेस्ट शिखर ; मोडला स्वत:चाच विक्रम (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
काठमांडू: जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर मानव सर्व काही साध्य करु शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ब्रिटिश गिर्यारोहक केंटन कूल. केंटन कूल यांनी जगातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्ट (८८४९ मीटर) वर १९व्यांदा यशस्वी चढाई केली आहे. असे करुन त्याने स्वत:चा विक्रम मोडत नवीन इतिहास रचला आहे. केंटन कूल यांच्या या यशाने गिर्यारोहकांच्या क्षेत्रात नाव उंचावले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, केंटन कूल ही दक्षिण-पश्चिम इंग्लंडचे रहवासी आहेत. त्यांचे वय ५१ वर्ष आहे. त्यांनी २००४ साली प्रथम एव्हरेस्टवर चढाई केली होती. त्यानंतर त्यांनी दरवर्षी ही मोहीम यशस्वी पार पाडली. केंटन कूल २०१४ मध्ये हिमस्खलन आणि २०१५ मध्ये भूकंपामुळे आणि २०२० मध्ये कोरोना माहामारीमुळे त्यांना माऊंट एवरेस्टवर चढाई करता आली नाही. मात्र त्यांनी २०२५ मध्ये पुन्हा स्वत:चाच विक्रम मोडत १९ वेळा माऊंट एव्हरेस्टवर चढणारे व्यक्ती ठरले.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ मे रोजी केंटन कूल यांनी अनेक गिर्यारोकांसोबत एव्हरेस्टच्या शिखरावर पाऊल ठेवले. सध्या ते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत परतत आहे. त्यांचे आरोग्य देखील उत्तम आहे. एवढ्या वेळा चढाई करुनही त्यांचा उत्साह आणि शारिरक क्षमता कमी झालेली नाही. त्यांच्या या यशामुळे त्यांचे संपूर्ण गिर्यारोहण विश्वात नाव झाले आहे. त्यांनी दाखवून दिले आहे, की जिद्दी, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर मानव प्रत्येत गोष्ट साध्य करु शकतो.
गिर्यारोहक केंटन कूल सर्वात जास्त वेळा माऊंट एव्हरेस्ट सर करणारे नेपाली शेरपा गाईड ठरले आहे. यापूर्वी गिर्यारोहक कामी रिता शेरपा यांनी ३० वेळा एवरेस्ट सर करण्याचा इतिहास रचला आहे. त्यांनी देखील एवरेस्टवर चढाई सुरु केली आहे. लवतरच ही चढाई यशस्वी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
प्रत्येक गिर्यारोहकासाठी एवरेस्टवर चढाई करणे आनंदादायी स्वप्न असते. केंटन कुल यांनी त्यांच्या स्वप्नाला अनेक वेळा सत्यात उतरवले आहे. त्यांची जिद्द, सातत्य आणि ध्येय त्यांच्या प्रवासात तसेच नव्या पिठीसाठी प्रेरणादायी ठरले आहे. गिर्यारोहक केंटून कूल यांनी कामगिरी मानवी क्षमतेची आणि अढळ इच्छाशक्तीचे एक उत्तम उदाहरण आहे.