Will Muhammad Yunus resign, know the details of emergency meeting of the interim government
ढाका: सध्या बांगलादेशाच राजकीय बंडाचे वातावरण आहे. अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु आहे. याच वेळी युनूस यांनी अंतिरम सरकारसोबत एक आपत्कालीन बैठक घेतली आहे. या बैठकीत त्यांच्या राजीनाम्यावर चर्चा झाली. युनूस यांनी आपण पदावर काय राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अंतरिम सरकारने सांगितले आहे की, मोहम्मद युनूस कोणत्याही राजकीय आणि लष्करी दबावाला बळी पडून राजीनामा देणार नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (२४ मे) रोजी ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर सल्लागार वहिदुद्दीन महमूद यांनी सांगितले की, मुहम्मद युनूस त्यांच्या पदावर कायम राहतील. युनूस राजीनामा देणार नसून त्यांनी त्यांचे काम सुरुच ठेवणार असल्याचे म्हटले आहे. त्याच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आमचे सल्लागार सहकारी आणि आम्ही येथेच आहोत.
दरम्यान बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या राजीनाम्याची सर्वत्र चर्चा सुरु होती. या चर्चांदरम्यान युनूस यांनी शनिवारी (२४ मे) आपत्कालीन बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी प्रशासन, राजकीय पक्ष आणि लष्करातील वाढत्या तणावाचा आढावा घेतला. यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीच्या काही तास आधीच युनूस यांनी राजनीमा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. राजकीय पक्षांमध्ये एकमत नसल्यामुळे जबाबदाऱ्या पार पाडण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी म्हटले होते.
गरम्यान या बैठकीनंतर, युनूस राजीनामा देणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि जमात-ए-इस्लामी यांच्याशी ८ वाजता युनूस यांची बैठक होणार आहे.
दरम्यान मोहम्मद युनूस यांच्या राजीनाम्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. यामुळे निर्णयामध्ये अनिश्चितता आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि जमात-ए-इस्लामी यांच्याशी बैठक झाल्यावरच मोहम्मद युनूस यांच्या निर्णयावर अधिकृत माहिती मिळेल.
दरम्यान गुरवारी (२२ मे) युनूस यांनी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखीलील राष्ट्रीय नागरिक पक्षाच्या नेत्यांना, राजीनामा देण्याचा विचार करत असल्याचे म्हटले होते. यानंतर युनूस यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना उधाण आले. त्यांनी म्हटले होते की, सर्व राजकीय पक्षांमध्ये एकमत नसल्याने जबाबदाऱ्या पार पाडण्यात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत काम करुणे कठी आहे, यामुळे राजीनाम्याची इच्छा युनूस यांनी व्यक्त केली होती. दरम्यान ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना यांच्या सत्तापालटानंतरही बागंलादेशमध्ये अस्थिरता कायम आहे.