अबू मोहम्मद अल-जुलानी हयात तहरीर अल-शाम गटाचे प्रमुख आणि नव्या अंतरिम सरकारचे प्रमुख (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
दमास्कस: एक मोठी खळबळजनक घटना समोर आली आहे. सीरियाच्या अल-जुलानी यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन झालेल्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अल-जुलानी यांनी सीरियाचील पॅलेस्टिनी दहशतवादी गटांविरोधात कारवाई करण्यास सुरुSवात केली आहे. तसेच लवकरच अब्राहम करार होऊन इस्रायलला मान्यता देणार असल्याचे म्हटले जात आहे.
सीरियाने ही कारवाई अशा वेळी केली आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियाला पाठिंबा दर्शवला आहे. ट्रम्प यांनी सीरियाला अमेरिकन छावण्यांमध्ये सामील करुन घेतेल आहे. ही परिस्थिती इराणसाठी धोक्याची मानली जात आहे. कारण असदच्या काळात सीरियामध्ये इराण समर्थित गट हमासला सीरियामध्ये आश्रय मिळाला होता. पंरुत असद सरकारच्या सत्तापालट होऊन हयात-तहरीरच्या अल-जुलानी यांचा विद्रोही गट सीरियात सत्तेत आला आहे.
दरम्यान सीरियाच्या अल-जुलानी सरकारने इस्रायलविरोधी लढणाऱ्या पॅलेस्टिनींविरोधात कारवाई सुरु केली आहे. या संघटनांना इराणकडून पाठिंबा मिळत होते. यामध्ये पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद, पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईन जनरल कमांड अशा संघटनांचा समावेश होता. परंतु सीरियाच्या नव्या सरकाने या संघटनांविरोधात कारवाई सुरु केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, पीएफएलपी-जीसी या पॅलेस्टिनी संघटनेचा प्रमुख तलाल नाजी याला नव्या सरकारने ताब्यात घेतले आहे. तसेच अनेक इस्लामिक जिहादच्या सदस्यांना अटत करुन त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे.
सीरियातील जुन्या बशर अल-असदच्या राजवटीला इराणने वर्षानुवर्षे पाठिंबा दिला होता. यामुळे इराणन समर्थित गटांचे सीरियात वर्चस्व सुरु होते. सीरियात इस्रायलविरोधी हिसांचार होता. परंतु हयात-तहरीर अल-श्याम या गटाने असदला सत्तेवरुन उतरवले आणि आपली सत्ता स्थापन केली. दरम्यान या नव्या सरकारने इराण समर्थित दहशतवादी गटांविरोधात कारवाया सुरु केल्या आहेत. यामुळे सीरियातील इराणचे वर्चस्व हळूहळू संपुष्टात येत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य पर्व देशांच्या दौऱ्यादरम्यना सौदी अरेबियात सीरियाच्या नवीन सरकारचे प्रमुख अल-जुलानी यांची भेट घेतली. अल-जुलानी पूर्वी दहशतवादी म्हणून ओळखला जात होता. त्याच्यावर अमेरिकेने १० लाखांचे बक्षिस देखील ठेवले होते. परंतु आता अमेरिकेन अल-जुलानी ला दहशतवाद्यांच्या यादीतून काढून टाकले असून बक्षिसही रद्द केले आहे.
तसेच सौदीतील भेटीनंतर ट्रम्प यांनी सीरियाला अमेरिकन छावण्यात सामील केले आहे. तसेच सीरियावरील इतर निर्बंध देखील हटवण्यात आले आहेत. तसेच सीरियाच्या पुनर्बांधणीसाठी देखील ट्रम्प यांनी पाठिंबा दर्शवला आहे. परंतु हयात-तहरीर अल-श्याम (HTS) हा पूर्वी दहशतवादी गट होता. यामुळे ट्रम्प यांच्या निर्णयाने संपूर्ण जग हादरले आहे.