Will Putin bow down to America Trump's these three big decisions in the last 24 hours
Russia Ukraine War : सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये तीव्र युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ हे युद्ध सुरु आहे. दरम्यान रशियाचे युक्रेनवर हल्ले वाढले आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये रशियाने युक्रेनच्या अनेक भागांवर सातत्याने हल्ले केले आहेत. यामुळे रशियाचे वाढते हल्ले पाहता आता यामध्ये अमेरिका देखील उडी घेण्याची शक्यता आहे. सध्या ट्रम्प यांनी पुतनिविरोधात आक्रमक भकमिका घेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प पुतिनवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
बी-२ बॉम्बसह थेट हवाई हल्ल्याची तयारी
अमेरिकेटे बी-२ बॉम्बर्स फाइटर जेट्स जगातील सर्वा अत्याधुनिक आणि ताकदवर विमनांपैकी मानले जातात. याच्याच मदतीने अमेरिकेन इस्रायलला मदत करत इराणवर हल्ला केला होता. या बॉम्बर्सच्या हल्ल्याला रोखण्याच रशियन बनावटीचे एस-३०० एअर डिफेन्स सिस्टम देखील अयशस्वी ठरले होते.
ट्रम्प यांनी या बॉम्बर्स द्वारे गरज पडल्यास मॉस्कोवर हवाई हल्ला करण्याचे म्हटले आहे. यावेळ तो मागचा-पुढचा कोणताही विचार करणार नाही. यामुळे रशियाकडे नमतं घेण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.
अमेरिकेचे हवाई आणि गुप्तचर यंत्रणा
इस्रायल आणि इराण युद्धातही उडी घेतली होती. अमेरिकेने इस्रायलला सैन्य न पाठवता थेट इराणवर हल्ला केला होता. आता अमेरिके रशिया -युक्रेन युद्धात युक्रेनला शस्त्र पुरवते. परंतु सध्याच्या परिस्थिती पाहता अमेरिका रशियावर थेट हल्ला करण्याची शक्यता आहे.
तसेच अमेरिकेकडे सुमारे १३ हजार लढाऊ विाने आहेत, तर रशियाकडे ४३०० विमाने आहे. तसेच अमेरिकेचे जगभरात जवळपास १५ हजार हवाई तळे आहे, तर रशियाचे ९०४ लष्करी तळे आहे. याशिवाय अमेरिका गुप्तचर माहिती मिळवण्यातही रशियाच्या पुढे आहे.
जागतिक सहकार्य
तसेच रशिया-युक्रेन युद्धाला जागतिक स्तरावर विरोध होता आहे. यामध्ये रशियाला मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, जपान आणि इस्रायल या देशांनी रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यांना विरोध केला आहे. रशियावर या देशांनी निर्बंध देखील लावले आहेत. रशियाकडे उत्तर कोरिया वगळता कोणत्याही मित्र राष्ट्राचा पाठिंबा नाही.
तसेच भारताने रशिया-युक्रेन युद्धात आपली भूमिका तटस्थ ठेवली आहे. यामुळे अमेरिकेने कठोर निर्बंध लादल्यास रशिया तेल निर्यात करणे कठीण होईल. तसेच चीनकडून सेमीकंडक्टर मिळणेही कंठीण होईल. या तीन गोष्टींमुळे रशिया मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता आहे.