ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच, युद्धबंदीदरम्यान भारतीय हवाई दलाचं मोठं विधान
Operation Sindoor : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा चोख बदला घेत भारताने ६-७ मेच्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) नऊ दहशतवादी तळांवर अचूक हवाई हल्ले करण्यात आले, ज्याचे जगभरातून स्वागत झाले. मात्र, या कारवाईवर तुर्की, अझरबैजान आणि कतार यांनी विरोध दर्शवत पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे.
भारताच्या अचूक कारवाईवर तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने X (पूर्वीचे ट्विटर) वर एक निवेदन जारी केले. त्यात त्यांनी म्हटले की, “भारताच्या ६-७ मेच्या कारवाईमुळे युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, याची आम्हाला तीव्र चिंता आहे. आम्ही अशा चिथावणीखोर कृतींचा आणि नागरी लक्ष्यांवरील हल्ल्यांचा निषेध करतो.” भारताने स्पष्टपणे सांगितले आहे की या कारवाईत फक्त दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले असून कोणताही नागरी अथवा पाकिस्तानी लष्करी ठिकाणा हल्ल्याच्या झोनमध्ये नव्हता. त्यामुळे तुर्कीचे वक्तव्य भारताने चुकीचे आणि एका बाजूने झुकलेले असल्याचे म्हटले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : काय सत्य अन् काय तथ्य! ‘Operation Sindoor’नंतर पाकिस्ताननेही भारताचे पाच फायटर जेट पाडले…; पाक लष्करी प्रवक्त्यांचा दावा
अझरबैजानने देखील भारताच्या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, “पाकिस्तानवरील लष्करी कारवाईमुळे निर्माण झालेला तणाव अत्यंत चिंताजनक आहे. आम्ही या हल्ल्यांचा निषेध करतो आणि पाकिस्तानातील नागरिकांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करतो.” भारताच्या स्पष्टीकरणानुसार, सर्व कारवाई ही जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या प्रशिक्षण केंद्रांवर केंद्रित होती. भारताच्या मते, नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप राजकीय हेतूने प्रेरित आणि अपप्रचार आहे.
कतारने अधिक संतुलित आणि राजनैतिक भूमिका घेतली, मात्र त्यांच्याही विधानात भारताच्या कृतीविषयी अप्रत्यक्ष नाराजी होती. त्यांनी म्हटले की, “आम्ही भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाकडे गांभीर्याने लक्ष देत आहोत. दोन्ही देशांनी संयम बाळगावा, चांगल्या शेजारीधर्माचे पालन करावे आणि शांततामूलक मार्गाने वाद सोडवावा.”
भारताच्या ऑपरेशनला अमेरिका, इस्रायल, फ्रान्स आणि युरोपियन संघटनेने उघड पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी ही कारवाई अचूक, मर्यादित आणि दहशतवादाविरोधातील योग्य उत्तर असल्याचे मान्य केले आहे. भारतीय लष्कराच्या माहितीनुसार, हे हल्ले अत्यंत नियोजनपूर्वक आणि स्थानीक नागरिकांना हानी न पोहोचवता फक्त दहशतवादी केंद्रांवर केंद्रित होते.
Global Support for India 🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
As India leads #OperationSindoor against terrorism, world powers are stepping up:
🇮🇱 Israel: Stands firmly with India—terror must have no haven.
🇷🇺 Russia: Issues advisory against Pakistan—terror has consequences.
🇺🇸 USA: Reaffirms… pic.twitter.com/xVoCKeIXVP
— British Indians Voice 🇮🇳🇬🇧 (@BritIndianVoice) May 7, 2025
credit : social media
भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानने हा हल्ला ‘युद्धाची घोषणा’ असल्याचे सांगत जोरदार निषेध नोंदवला आहे. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र (UN) आणि इस्लामिक सहकार्य संघटना (OIC) यांच्याकडे तक्रार नोंदवली असून, भारताविरोधात आंतरराष्ट्रीय दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Operation Sindoor : पाकिस्तानात अंतर्गत उठावाचे वारे; मौलाना गाझींचा थेट सवाल ‘भारताशी लढायला कोण तयार?’
ऑपरेशन सिंदूरने भारताचा दहशतवादाविरोधातील निर्धार स्पष्ट केला आहे. या कारवाईवर जगातील प्रमुख लोकतांत्रिक देशांनी ठाम पाठिंबा दिला असला, तरी तुर्की, अझरबैजान आणि कतार यांसारख्या इस्लामी देशांनी पाकिस्तानला पाठीशी घालून दहशतवादाविरोधातील लढ्यालाच प्रश्नात टाकण्याचा प्रयत्न केला आहे. भारताने या देशांच्या वक्तव्यांकडे दुर्लक्ष करत स्पष्ट केले आहे – दहशतवादाला शून्य सहिष्णुता, आणि जर पुन्हा हल्ला झाला, तर उत्तर अधिक कठोर असेल.