Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

2025 मध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेसमोर गंभीर आव्हाने; काय असेल ड्रॅगनचे पुढील भविष्य, जागतिक बॅंकेचा अहवाल

जागतिक बँकेने चीन संबंधित नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात चीनसाठी 2025 हे आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक वर्ष ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Dec 28, 2024 | 07:20 PM
2025 मध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेसमोर गंभीर आव्हाने; काय असेल ड्रॅगनचे पुढील भविष्य, जागतिक बॅंकेचा अहवाल

2025 मध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेसमोर गंभीर आव्हाने; काय असेल ड्रॅगनचे पुढील भविष्य, जागतिक बॅंकेचा अहवाल

Follow Us
Close
Follow Us:

बिजिंग: जागतिक बँकेने चीन संबंधित नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात चीनसाठी 2025 हे आर्थिकदृष्ट्या आव्हानात्मक वर्ष ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अहवालानुसार, चीनची GDP वाढ 2024 मध्ये 5% राहण्याची अपेक्षा आहे. मात्र, 2025 मध्ये ती घसरून 4.5% होण्याचा अंदाज वर्तवला आहे. मालमत्ता क्षेत्रातील दीर्घकालीन संकट, कमी उत्पन्नवाढ आणि उच्च शुल्काचा फटका यामुळे चीनची आर्थिक परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता असल्याचे अहवालात म्हटले आहे.

मालमत्ता क्षेत्राचे संकट

अहवालानुसार, चीनच्या मालमत्ता क्षेत्रातील संकट हे देशांतर्गत आणि जागतिक अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचे कारण ठरत आहे. घरांच्या कमी किमती आणि गुंतवणुकीत घट झाल्यामुळे आर्थिक स्थिरतेवर परिणाम झाला आहे. यामुळे चीनमध्ये नागरिकांच्या उत्पन्न वाढीचा वेग कमी झाला आहे. जागतिक बँकेच्या संचालिका मारा वॅरिक यांनी सुचवले आहे की, मालमत्ता क्षेत्रातील संकटाचा सामना करण्यासाठी चीनने व्यापक धोरणे तयार करावी लागतील. यामुळे कुटुंबांना आर्थिक संधी मिळतील आणि विषमता कमी होईल असा अंदाज मारा वॅरिक यांनी वर्तवला आला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- काय आहे ‘फॉल्स फ्लॅग ऑपरेशन’? पाकिस्तानने भारतावर केले गंभीर आरोप, जाणून घ्या सविस्तर

उच्च शुल्काचा फटका

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनकडून अधिक शुल्क आकारण्याची धमकी दिली आहे. कॅनडा आणि मेक्सिकोसह चीनवरील आयात शुल्क वाढवल्यामुळे जागतिक व्यापारातील तणाव वाढू शकतो. विशेषतः चिनी वस्तूंवर 10% अधिक कर लादल्याने चीनच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या उपायांनी चीनच्या जीडीपी वाढीवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो.

GDP च्या वाढीचा घटता दर

अहवालात दिलेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये चीनची GDP वाढ 5% होण्याचा अंदाज आहे, जो आधीच्या 4.8% च्या अंदाजापेक्षा जास्त आहे. परंतु 2025 मध्ये GDP चा वाढीचा दर 4.5% होण्याची शक्यता आहे. मात्र, यापूर्वी तो 4.1% असण्याचा अंदाज होता. या घसरणीला मालमत्ता क्षेत्रातील अस्थिरता आणि नागरिकांच्या संपत्तीतील घट कारणीभूत ठरणार आहे.

चीनने आर्थिक संकटावर मात करण्यासाठी 3 ट्रिलियन युआन (सुमारे $411 अब्ज) विशेष ट्रेझरी बाँडमध्ये गुंतवणूक करण्याचे मान्य केले आहे. जागतिक बँकेच्या म्हणण्यनुसार, स्थानिक सरकारी वित्त सुधारणा आणि धोरणात्मक उपायांमुळे चीनला आर्थिक स्थिरता मिळवण्यात मदत होईल. चीनसाठी 2025 हे आव्हानात्मक वर्ष असेल, परंतु योग्य धोरणे स्वीकारल्यास संकटाचा प्रभाव कमी करता येईल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- Bangladesh violence: युनूस सरकारचे हिंदूंविरोधी आणखी एक षडयंत्र; बांगलादेशात पोलीस भरतीबाबत घेतला ‘हा’ निर्णय

Web Title: World bank report challenges ahead for china economy to slow down in 2025 nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 07:20 PM

Topics:  

  • China

संबंधित बातम्या

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी
1

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी

China Flash Flood : चीनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे कहर; ८ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता
2

China Flash Flood : चीनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे कहर; ८ जणांचा मृत्यू, ४ बेपत्ता

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल
3

Hangor Submarine : चीनकडून पाकिस्तानला मिळाली हँगोर पाणबुडी; हिंदी महासागरातील सागरी समीकरणात मोठा बदल

‘जोपर्यंत मी राष्ट्राध्यक्ष आहे तोपर्यंत…’ शी जिनपिंग यांचे नाव घेऊन ट्रम्प यांचे धाडसी विधान
4

‘जोपर्यंत मी राष्ट्राध्यक्ष आहे तोपर्यंत…’ शी जिनपिंग यांचे नाव घेऊन ट्रम्प यांचे धाडसी विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.