World's largest arms importer 2025 countries list know the details
सध्या जगभरात संरक्षण क्षेत्रात शस्त्रास्त्रांच्या खरेदी-विक्रीची तीव्र स्पर्धा सुरु आहे. अनेक देश आपले संरक्षण ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. तसेच काही देश शस्त्रे विकिण्याच्याही प्रयत्नात आहे. भारतानेही स्वदेशी शस्त्रे बनवून लष्करात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच २०२५ ची ग्लोबल डिफेंस रेसची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कोणत्या देशाने किती खर्च केला, किती शस्त्रे विकली याची माहिती देण्यात आली आहे.
या अहवालानुसार, २०२५ मध्ये अनेक देशांनी अरबो डॉलर्सचे संरक्षण करार केले आहे. अनेक देशांनी केवळ धोरणात्मक, संरक्षणात्मक दृष्टीकोनातूनच नव्हे तर राजनैतिक दृष्टीकोमनातूनही संबंध वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. या देशांमध्ये भारतासह अमेरिका, सौदी अरेबिया, पोलंड, ब्रिटन, फ्रान्स, जपान, आणि राष्ट्रांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारत आघाडीवर आहे.
यामध्ये सर्वात जास्त अघाडीवर भारत आहे. भारताने अनेक मोठ्या संरक्षण करारावर स्वाक्षरी केली आहे. भारताने नौदलासाठी फ्रान्ससोबत ६३ हजार कोटी रुपयांचा राफेल-एम करार केला आहे. तसेच १५६ स्वदेशी लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टरचाही ४५ हजार कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे. याशिवाय भारताने फिलिपिन्सीला दुसररी ब्रह्मोस मिसाईल बॅटरीचा पुरवठा केली आहे. तसेच व्हिएतनाम आणि इंडोनेशियासोबत ७० कोटी व ४५ कोटी डॉलर्सचे करार अंतिम टप्प्यात आणळे आहेत. भारताने संरक्षण निर्यात दरात १२ टक्क्याने वाढ केली आहे. भारत हा केवळ जागतिक संरक्षण क्षेत्रात ग्राहकच नव्हे तर निर्यातदारही बनला आहे.