पाकिस्तानच्या दहशतवादी कुरापत सुरुच; ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने उद्ध्वस्त केलेला 'तो' तळ पुन्हा उभा केला (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Pakistan News Marathi : इस्लामाबाद : एक मोठी बातमी समोर येत आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने उद्ध्वस्त केलेला एक दहशतवादी तळ पुन्हा उभारला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मद तळ भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त केला होता. हा तळ पाकिस्तानमध्ये पुन्हा उभारला जात आहे. यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दहशतवादी कुरापती उघडकीस आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नुकतेच या तळाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये काही दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. पाकिस्तान पंजाब प्रांतातील बहावलपूरमधील हा मोठा दहशतवादी तळ आहे
भारताच्या जम्मू आणि काश्मीरमदील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये २६ निरापराध लोकांचा मृत्यू झाला होता. याविरोधात भारताने ऑपरेशन सिंदूर सुरु केले. या मोहिमेअंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची ठिकाणे उद्ध्वस्त करण्यात आली होती. यामध्ये पंजाबच्या बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचा तळही उद्ध्वस्त करण्यात आला होता. सध्या हा तळ पुन्हा उभारला जात असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी बहावलपूरच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
या जैश-ए-मोहम्मद तळाच्या प्रशिक्षण शिबिरात एक स्विमिंग पूल आहे. या ठिकाणी दहशतवाद्यांना पोहण्याचे प्रशिक्षण दिले जाते. ऑपरेशन सिंदूरनंतर हा तळ बंद करण्यात आला होता. परंतु आता हा तळ पुन्हा एकदा उभारला जात आहे. तसेच या ठिकाणी दहशतवाद्यांना प्रशिक्षणही दिले जात असल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय जैश-ए-मोहम्मदच्या मदरसा देखील या ठिकाणी आहे. ही मदरसा देखील पुन्हा उभारली जात आहे.
या ठिकाणी मरकज सुभान अल्लाह हे जैशचे सर्वात प्रमुख स्थळ मानले जाते. या ठिकाणी जैशचे मौलाना मसूद अझहरचे लपण्याचे ठिकाण असल्याचे म्हटले जाते. हे मुख्यालय बहावलपूर मरकझ नियंत्रण रेषेच्या १०० किमी आत आहे. भारताच्या हल्ल्यात हे तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. तसेच यामध्ये मसूदच्या कुटुंबातील काही सदस्यांचा मृत्यू झाला होता.
भारताने पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर मोहीम सुरु केली. या मोहिमेअंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. तसेच यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यास सुरुवात केली होती. मात्र बारताने पाकिस्तानच्या कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले. यानंतर भारताने पाकिस्तानच्या दहशतवाद्याला पाठिंब्याचा जागतिक स्तरावर देखील खुलासा केला. मात्र अजूनही पाकिस्तानच्या भारतविरोधी कुरापती सुरुच आहेत.