Worship of the Padukas of Shri Vitthal Rukmini Temple in London UK by the Temple Committee
पंढरपूर (दि.14) :- श्री विठ्ठल भक्त अनिल एकनाथ खेडकर मुळ गांव अहिल्यानगर असून सध्या लंडन, युके येथे स्थायिक आहेत, ते युके म्हणजेच लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे भव्यदिव मंदिर साकारणार आहेत. त्यानिमित्ताने आज पादुकासह दिंडी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात आल्यानंतर मंदिर समितीच्या वतीने त्यांचेकडील पादुकांचे मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पुजन करण्यात आले.
यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, लेखा अधिकारी मुकेश अनेचा व विभाग प्रमुख पांडूरंग बुरांडे तसेच अनिल खेडकर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असलेले पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, आणि वारीची, संत परंपरेची गाथा आता जगभरात पोहोचणार असून काही वर्षात युके म्हणजेच लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे भव्यदिव मंदिर श्री विठ्ठल भक्त अनिल खेडकर साकारणार आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘परदेशी शक्तींशी कट रचून बांगलादेश नष्ट करण्याचा प्रयत्न’; शेख हसीनांचा मोहम्मद युनूसवर गंभीर आरोप
यानिमित्ताने 14 एप्रिल ते 21 जून 2025 दरम्यान पंढरपूर ते लंडन अशी आंतरराष्ट्रीय दिंडी निघणार आहे. यासाठी लंडन येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर टीम प्रयत्नशील आहे. याबाबत माहिती देताना अनिल खेडकर म्हणाले, मी गेल्या 7 वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर पायी अशी वारी करत आहे. अमेरिका, यूरोप, लंडन येथे अनेक भारतीय मंदिरे आहेत. इस्कॉन, अक्षरधाम तसेच राजस्थान येथील देवतांची मंदिरे परदेशात आहेत पण एवढी जुनी संत साहित्य परंपरा असलेले पंढरपूर येथील मंदिर नाही, यासाठी वारी साता समुद्रापार नेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
वारीतील प्रेम, जिव्हाळा, सलोखा मी अनुभवला आहे. याचा लाभ जगभरात व्हावा ही प्रामाणिक ईच्छा आहे असे ते म्हणाले. खरेतर दिंडीतील पादुका विमानातून लंडन येथे जाऊ शकतात, पण समर्पण म्हणून सुखी संसाराची वाट सोडून लाखो भाविक पायी वारी करतात, यासाठी सुमारे 22 देशातून 18000 किलोमीटर चा प्रवास करत ही दिंडी निघणार असून भक्तीची परंपरा भारता बाहेर पोहोचणार आहे. त्यासाठी सर्व देशांचा व्हिसा, वाहनांचे परमिट व इतर अनुषंगिक कायदेशीर तयारी त्यांनी केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवाला धोका; अवघ्या 17 वर्षांच्या मुलाने रचला हत्येचा कट, पाहा कोण?
दिनांक 14 एप्रिल रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथून दिंडी मार्गस्थ झाली आहे. दि. 18 एप्रिल रोजी भारत सोडून नेपाळ, चीन, रशिया, जर्मनी अशा 22 देशातून 70 दिवसात 18 हजार किमी एवढा प्रवास करत कारने या पादुका घेऊन जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे, अशी माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.