Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनमध्ये सत्तापालटाची भीती? काय आहे जिनपिंगची ‘अँटी करप्शन’ रक्तरंजित मोहीम? पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांमध्येही दहशत

शी जिनपिंग यांनी चीनच्या सैन्यातील नंबर दोन जनरल हे वेइडोंग आणि मियाओ हुआ यांना बडतर्फ केले आहे. भ्रष्टाचाराच्या नावाखाली ही सत्ता हस्तगत करण्याची प्रक्रिया आहे का? "रक्तरंजित मोहिमेबद्दल" जाणून घ्या.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 17, 2025 | 11:28 PM
शी जिनपिंग यांनी चीनच्या नंबर 2 जनरल हे वेइडोंग आणि मियाओ हुआ यांना काढून टाकले (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

शी जिनपिंग यांनी चीनच्या नंबर 2 जनरल हे वेइडोंग आणि मियाओ हुआ यांना काढून टाकले (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • चीनमधील राजकारण हाहाःकार 
  • सत्तापालटाची भीती 
  • काय आहे रक्तरंजित मोहिमेची योजना 

बीजिंगमधील या बातमीने संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. त्यांच्या “भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा” एक भाग म्हणून, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी लष्कराच्या सर्वोच्च स्तरावर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. देशाचे क्रमांक 2 जनरल, हे वेइडोंग आणि केंद्रीय लष्करी आयोगाचे (CMC) आणखी एक सदस्य, मियाओ हुआ यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून बडतर्फ करण्यात आले आहे.

ही कारवाई पक्षाची चौथी पूर्ण बैठक बीजिंगमध्ये होणार असतानाच करण्यात आली आहे, जिथे शेकडो वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. राजकीय वर्तुळात प्रश्न उपस्थित झाले आहेत की शी जिनपिंग यांची “स्वच्छता” मोहीम खरोखर भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी आहे की ती सत्ता एकत्रित करण्याच्या रणनीतीचा भाग आहे? असा आता प्रश्न उपस्थित होत आहे. 

जिनपिंग यांचे “क्लीन अप” धोरण की सत्ता टिकवून ठेवण्यासाठी केलेली सफाई?

चीनच्या संरक्षण मंत्रालयाने पुष्टी केली की हे वेइडोंग आणि मियाओ हुआ यांना “पक्ष शिस्त आणि कायद्याचे गंभीर उल्लंघन” केल्याबद्दल कम्युनिस्ट पक्ष आणि सैन्यातून काढून टाकण्यात आले आहे. सीएमसीचे उपाध्यक्ष आणि २४ सदस्यीय पॉलिटब्युरोचे सदस्य असलेले हे वेइडोंग गेल्या काही महिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसले नव्हते. २०२२ पासून त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आलेल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या यादीत आता त्यांचे नाव समाविष्ट झाले आहे.

300 ड्रोन, 37 मिसाइल्स…रशियाने केली युक्रेनची बत्ती गुल! ट्रम्पला भेटायला आलेल्या झेलेन्स्कीला मोठा झटका

६८ वर्षीय जनरलची पदच्युती: ५० वर्षांतील ही पहिलीच घटना

हे वेइडोंगची बडतर्फी ऐतिहासिक मानली जाते कारण सांस्कृतिक क्रांती (१९६६-१९७६) नंतर पहिल्यांदाच सीएमसीच्या विद्यमान जनरलला अशा प्रकारे काढून टाकण्यात आले आहे. ते शी जिनपिंग यांचे खूप जवळचे मानले जात होते आणि पीएलए (पीपल्स लिबरेशन आर्मी) मधील तिसरे सर्वात शक्तिशाली अधिकारी होते. मंत्रालयाचे प्रवक्ते झांग झियाओगांग यांनी सांगितले की वेइडोंग, मियाओ हुआ आणि इतर सात लष्करी अधिकाऱ्यांवर “कर्तव्येत गंभीर दुर्लक्ष” आणि “मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार” केल्याबद्दल चौकशी सुरू आहे.

शी जिनपिंग यांच्या ‘भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचे’ राजकीय परिणाम

शी जिनपिंग गेल्या दशकापासून “शून्य सहिष्णुता धोरण” राबवत आहेत. ते भ्रष्टाचाराला पक्षासाठी “सर्वात मोठा धोका” मानतात. तथापि, अनेक तज्ञ ते सत्तेचे केंद्रीकरण करण्याचे साधन मानतात. विश्लेषकांचे म्हणणे आहे की हे पाऊल संभाव्य बंड किंवा मतभेदाची शक्यता कमी करण्याचा प्रयत्नदेखील असू शकतो.

लष्करात भीती, सीएमसीमध्ये फक्त चार सदस्य राहिले आहेत. मुळात सीएमसी किंवा केंद्रीय लष्करी आयोग, ही चीनची सर्वोच्च लष्करी संस्था आहे. तिचे अध्यक्ष स्वतः शी जिनपिंग आहेत. २०२२ मध्ये निवडून आलेल्या सात सदस्यांपैकी फक्त चारच सदस्य राहिले आहेत: शी जिनपिंग, झांग युक्सिया, लिऊ झेनली आणि झांग शेंगमिन. विश्लेषकांचे म्हणणे आहे की ही इतिहासातील लष्कराच्या उच्च स्तरावरील सर्वात मोठी फेरबदल आहे, ज्यामुळे सैन्यात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

10000 सैनिक B52 परमाणु बॉम्बर, 8 नौसेना जहाज आणि F-35 फायटर जेट..ट्रम्प आता खोदणार मादुरो शासनाची कबर

भ्रष्टाचार की राजकीय शुद्धीकरण?

राजकीय विश्लेषकांचा असा विश्वास आहे की ही मोहीम केवळ भ्रष्टाचाराशी संबंधित नाही, तर शी जिनपिंग त्यांच्या “प्रतिस्पर्धी शक्ती केंद्रांना” नष्ट करण्याची रणनीती अवलंबत आहेत. २०३० पर्यंत चीनच्या धोरणांवर पूर्ण नियंत्रण राखणे आणि कोणत्याही आव्हानांना आगाऊपणे दडपून टाकणे हे शी यांचे उद्दिष्ट आहे.

येणाऱ्या प्लेनम बैठकीमुळे तणाव निर्माण झाला आहे. बीजिंगमधील चौथ्या प्लेनममध्ये आणखी बडतर्फीची घोषणा होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शी जिनपिंग त्यांच्या विश्वासू अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदांवर नियुक्त करण्याची तयारी करत आहेत. याचा थेट परिणाम चीनच्या संरक्षण धोरणावर, जागतिक संबंधांवर आणि अंतर्गत शक्ती संतुलनावर होईल.

Web Title: Xi jinping china army anti corruption latest purge he weidong miao

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 11:28 PM

Topics:  

  • China
  • Xi Jinping
  • Xi Jinping China

संबंधित बातम्या

जगात कुठेही जन्माला आलेल्या पांडावर मालकी हक्क चीनचा का? काय आहे या मागील कारण
1

जगात कुठेही जन्माला आलेल्या पांडावर मालकी हक्क चीनचा का? काय आहे या मागील कारण

America Spying India: चीननंतर अमेरिकेकडून भारताची हेरगिरी; हिंद महासागरात पाठवले ओशन टायटन’, काय आहे प्रकरण
2

America Spying India: चीननंतर अमेरिकेकडून भारताची हेरगिरी; हिंद महासागरात पाठवले ओशन टायटन’, काय आहे प्रकरण

America vs China: ‘आम्ही लढायला घाबरत नाही’: अमेरिकेच्या १०० टक्के कर आकारणीवर चीनचा पलटवार
3

America vs China: ‘आम्ही लढायला घाबरत नाही’: अमेरिकेच्या १०० टक्के कर आकारणीवर चीनचा पलटवार

आ बैल मुझे मार! पाकिस्तानचा सुपडा साफ होणार? ‘हा’ देश कोणत्याही क्षणी पाकड्यांवर डागणार क्षेपणास्त्र
4

आ बैल मुझे मार! पाकिस्तानचा सुपडा साफ होणार? ‘हा’ देश कोणत्याही क्षणी पाकड्यांवर डागणार क्षेपणास्त्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.