Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Starlink : Elon Musk चा ‘ब्रह्मांड’ प्लॅन! AI साठी सज्ज होतोय जगातील पहिला ‘स्पेस क्लाउड’; चीननेही कसली कंबर

AI च्या वाढत्या मागणीमुळे डेटा सेंटरची लढाई अवकाशात पोहोचली आहे. एलोन मस्क सौरऊर्जेवर चालणाऱ्या उपग्रह डेटा सेंटर्स बांधण्याच्या योजनेवर काम करत आहेत, तर चीन देखील स्पेस क्लाउडची तयारी करत आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jan 30, 2026 | 01:30 PM
elon musk vs china space data center war ai computing in orbit 2026

elon musk vs china space data center war ai computing in orbit 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • अवकाशात ‘AI’चे घर
  • चीनचे ‘स्पेस क्लाउड’ आव्हान
  • विज्ञानाचा नवा अध्याय

Elon Musk space data center news 2026 : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI ची भूक दिवसेंदिवस वाढत आहे. पृथ्वीवर एआय चालवण्यासाठी लागणारी वीज आणि सर्व्हर थंड ठेवण्यासाठी लागणारे पाणी आता दुर्मिळ होत चालले आहे. याच समस्येवर उपाय म्हणून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि स्पेसएक्सचे (SpaceX) सर्वेसर्वा एलोन मस्क यांनी एक क्रांतिकारी संकल्पना मांडली आहे. मस्क आता त्यांचे एआय डेटा सेंटर्स पृथ्वीवर नाही, तर थेट अंतराळात नेण्याच्या तयारीत आहेत. मात्र, या शर्यतीत मस्क एकटे नाहीत; चीननेही मस्कच्या या ‘स्पेस साम्राज्याला’ आव्हान देण्याची तयारी पूर्ण केली आहे.

मस्क यांना अंतराळात डेटा सेंटर का हवे आहे?

एलोन मस्क यांच्या मते, एआय भविष्यात मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असेल, पण त्याला लागणारी प्रचंड ऊर्जा पृथ्वीवर निर्माण करणे कठीण आहे. अंतराळात डेटा सेंटर उभारण्याचे मुख्य दोन मोठे फायदे आहेत: १. अमर्याद आणि मोफत ऊर्जा: अवकाशात ढग किंवा रात्र नसते, त्यामुळे सौर तावदाने (Solar Panels) पृथ्वीपेक्षा ५ पटीने अधिक वीज निर्माण करू शकतात. २. नैसर्गिक कूलिंग: पृथ्वीवर सर्व्हर थंड ठेवण्यासाठी अब्जावधी लिटर पाणी आणि वीज खर्च होते. अंतराळात तापमान मुळातच उणे असल्याने कूलिंगचा खर्च शून्य होतो. मस्क यांच्या मते, पुढील २ ते ३ वर्षांत अंतराळात डेटा प्रक्रिया करणे हे पृथ्वीपेक्षा स्वस्त ठरेल.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Coup : चीनमध्ये सत्तापालटाचा थरार! दोन बड्या जनरल्सना बेड्या; लष्कराने थेट शी जिनपिंग यांनाच दिले आव्हान

चीनचे ‘स्पेस क्लाउड’ आणि मस्क यांना दिलेली टक्कर

मस्क यांच्या घोषणेनंतर काही तासांतच चीनच्या ‘चायना एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन’ (CASC) ने आपली ५ वर्षांची योजना जाहीर केली आहे. चीन २०२६ च्या सुरुवातीलाच आपला पहिला प्रायोगिक डेटा सेंटर सॅटेलाईट प्रक्षेपित करणार आहे. चीनचे लक्ष्य २०३० पर्यंत ‘गिगावॅट-स्केल’ स्पेस क्लाउड नेटवर्क तयार करण्याचे आहे. यामुळे चीनला त्यांच्या लष्करी आणि नागरी डेटावर अवकाशातून प्रक्रिया करणे शक्य होईल, ज्यामुळे त्यांना जागतिक इंटरनेट आणि एआय मार्केटमध्ये मोठी आघाडी मिळेल.

🇺🇸 ELON WANTS AI IN SPACE Because Earth is too basic for what’s coming, Elon is pushing to put AI data centers in orbit. Why? Cooler temps = less energy, less risk from Earth’s natural disasters, and it’s way more futuristic. Basically, he wants to make sure AI keeps running… pic.twitter.com/ChLzfN8qwy — Mario Nawfal (@MarioNawfal) January 29, 2026

credit – social media and Twitter

स्पर्धेत जेफ बेझोस आणि गुगलही उतरले!

या ‘स्पेस रेस’मध्ये केवळ मस्क आणि चीन नाही, तर अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची कंपनी ‘ब्लू ओरिजिन’ (Blue Origin) देखील अंतराळात गिगावॅट डेटा सेंटर्स उभारण्यासाठी काम करत आहे. दुसरीकडे, गुगलचे ‘प्रोजेक्ट सनकॅचर’ (Project Suncatcher) हे त्यांच्या TPU चिप्स अवकाशात नेण्यासाठी सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे, Nvidia समर्थित ‘स्टारक्लाउड’ (StarCloud) या स्टार्टअपनी आधीच अवकाशात ‘H100’ ही जगातील सर्वात शक्तिशाली एआय चिप यशस्वीरित्या टेस्ट केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Politics: जगाला दोन तुकड्यांत विभागू नका! UN Chief यांनी ‘या’ दोन महासत्तांना धारेवर धरले; भारताचे मात्र तोंडभरून कौतुक

आव्हाने अजूनही मोठी आहेत!

जरी हे ऐकायला स्वप्नवत वाटत असले तरी, अंतराळातील कचरा (Space Debris), वैश्विक विकिरण (Cosmic Radiation) आणि अवकाशात बिघडलेले हार्डवेअर दुरुस्त करणे ही मोठी आव्हाने आहेत. मात्र, मस्क यांच्या ‘स्टारशिप’ (Starship) सारख्या पुन्हा वापरता येणाऱ्या रॉकेट्समुळे प्रक्षेपणाचा खर्च कमी झाला असून, २०३० पर्यंत आपण चक्क ‘स्वदेशी स्पेस क्लाउड’ वापरत असू, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अंतराळात डेटा सेंटर का उभारले जात आहे?

    Ans: पृथ्वीवरील डेटा सेंटर्सना लागणारी प्रचंड वीज आणि कूलिंगचा खर्च वाचवण्यासाठी अमर्याद सौरऊर्जा आणि नैसर्गिक थंड वातावरण असलेल्या अंतराळाची निवड केली जात आहे.

  • Que: चीनचा 'स्पेस क्लाउड' प्लॅन काय आहे?

    Ans: चीन पुढील ५ वर्षांत गिगावॅट-स्केल डेटा सेंटर सॅटेलाईट्सचे जाळे उभारणार आहे, जेणेकरून पृथ्वीवरील डेटावर थेट अवकाशात प्रक्रिया करता येईल.

  • Que: सामान्य लोकांसाठी याचे फायदे काय?

    Ans: यामुळे एआय सेवा स्वस्त होतील, इंटरनेटचा वेग प्रचंड वाढेल आणि पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधनांवरील (पाणी आणि वीज) ताण कमी होईल.

Web Title: Elon musk vs china space data center war ai computing in orbit 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 01:30 PM

Topics:  

  • Artificial intelligence
  • China
  • elon musk

संबंधित बातम्या

China Coup : चीनमध्ये सत्तापालटाचा थरार! दोन बड्या जनरल्सना बेड्या; लष्कराने थेट शी जिनपिंग यांनाच दिले आव्हान
1

China Coup : चीनमध्ये सत्तापालटाचा थरार! दोन बड्या जनरल्सना बेड्या; लष्कराने थेट शी जिनपिंग यांनाच दिले आव्हान

World Politics: जगाला दोन तुकड्यांत विभागू नका! UN Chief यांनी ‘या’ दोन महासत्तांना धारेवर धरले; भारताचे मात्र तोंडभरून कौतुक
2

World Politics: जगाला दोन तुकड्यांत विभागू नका! UN Chief यांनी ‘या’ दोन महासत्तांना धारेवर धरले; भारताचे मात्र तोंडभरून कौतुक

वेळ आलीये! Tesla ‘या’ 2 मॉडेल कायमचे बंद करण्याच्या तयारीत, जाणून घ्या कारण
3

वेळ आलीये! Tesla ‘या’ 2 मॉडेल कायमचे बंद करण्याच्या तयारीत, जाणून घ्या कारण

जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ! अमेरिकेला सोडून ब्रिटीश PM चीनमध्ये दाखल, काय आहे नेमकं कारण?
4

जागतिक राजकारणात मोठी उलथापालथ! अमेरिकेला सोडून ब्रिटीश PM चीनमध्ये दाखल, काय आहे नेमकं कारण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.