PM मोदी आणि अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीची तारीख निश्चित; जाणून घ्या कधी होणार बैठक? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
PM Modi and Xi Jinping Meet : नवी दिल्ली/ बिजिंग : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिग (Xi Jinping) यांच्या भेटीची तारीख निश्चित झाली आहे. दोन्ही नेत्यांची रविवारी ३१ ऑगस्ट रोजी भेट होणार आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदी जपानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर (PM Modi Japan Visit) असतील. गुरुवारी (२८ ऑगस्ट) संध्याकाळी पंतप्रधान मोदीं जपान दौऱ्यावर रवाना होणार आहेत.
पंतप्रधान मोदी चीनच्या तियानजिनमध्ये होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरुन हा दौरा होत आहे. या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक होणार आहे.
हा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर ५०% टॅरिफ लादले आहे. यामुळे अमेरिका आणि भारताचे संबंध ताणले गेले आहेत. तसेच चीनवर ट्रम्प यांनी ३०% टॅरिफ (Tarrif) लादले आहे. चीनने भारताला पाठिंबा दिला आहे. यामुळे हा दौरा अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे.
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! आता अर्जेंटिनाचा प्रवास झाला सोपा; विना व्हिसा मिळणार प्रवेश, पण…
पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच चीन दौरा असणार आहे. तसेच २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेले संघर्षानंतर हा पहिलाच दौरा आहे. यापर्वी मोदींनी २०२४ मध्ये रशियाच्या काझान येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत जिनपिंग यांची भेट घेतली होती. या द्विपक्षीय बैठकीत भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या सीमा संघर्ष संपवण्यासाठी LAC वर गस्त घालण्याचा करारावर चर्चा झली होती.
भारतातील चीनचे राजदूत झू फेहोंग यांनी या दौऱ्याला अत्यंत महत्वपूर्ण सांगितले आहे. यामुळे भारत आणि चीनमधील नवीन संबंधाना सुधारणा आणि विकासाला चालना मिळेल असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे ही भेट महत्वाची आणि यशस्वी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान यापूर्वी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांना भारताला भेट दिली होती. यावेळी त्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेत्यांनी भारत-चीन सीमा वादावर (India China Boundary Row) सविस्तर चर्चा केली. याचा मुख्य उद्देश भारत-चीन सीमा प्रश्न सोडवणे आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) शांतता व स्थिरता कायम ठेवणे हा होता.