Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Taiwan Strait : ‘स्वातंत्र्याची भाषा करणाऱ्यांना ठेचून काढणार!’ बीजिंगमध्ये गुप्त खलबतं; तैवानचे विरोधी पक्षनेते चीनमध्ये दाखल

China News : शी जिनपिंग आणि तैवानचे विरोधी पक्षनेते चेंग ली-वुन यांची बीजिंगमध्ये एक ऐतिहासिक बैठक झाली. शी जिनपिंग यांनी 'एक कुटुंब' या संकल्पनेचा उल्लेख करत तैवानसोबतच्या एकजुटीवर जोर दिला.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 10, 2026 | 03:34 PM
xi jinping meeting taiwan opposition leader punishment warning 2026

xi jinping meeting taiwan opposition leader punishment warning 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • बीजिंगमध्ये गुप्त खलबतं
  • स्वातंत्र्यवाद्यांना इशारा
  • ‘एक चीन’ धोरणावर जोर

Xi Jinping Cheng Li-wun Beijing meeting : जागतिक नकाशावर सध्या युद्धाचे ढग दाटले आहेत आणि त्यातच आशिया खंडातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांनी तैवानच्या कुओमिंतांग (केएमटी) या विरोधी पक्षाच्या नेत्या चेंग ली-वुन यांची बीजिंगमधील ‘ग्रेट हॉल ऑफ द पीपल’ मध्ये भेट घेतली. ही भेट केवळ शिष्टाचार नव्हती, तर तैवानच्या स्वातंत्र्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना दिलेला हा एक अंतिम इशारा मानला जात आहे. या भेटीदरम्यान जिनपिंग यांनी ‘एक चीन’ या आपल्या जुन्याच पण आक्रमक धोरणाचा पुनरुच्चार केला.

जिनपिंग यांचा आक्रमक पवित्रा: “शिक्षा अटळ आहे!”

या गुप्त बैठकीतून बाहेर आलेल्या माहितीनुसार, शी जिनपिंग यांनी अत्यंत कठोर शब्दांत आपला संदेश दिला आहे. ते म्हणाले की, “तैवान सामुद्रधुनीच्या दोन्ही बाजूला राहणारे लोक हे रक्ताने चिनी आहेत. जे लोक चीनपासून वेगळे होण्याचा किंवा स्वातंत्र्याचा प्रयत्न करतील, त्यांना इतिहासाच्या पानांवर शिक्षा भोगावी लागेल.” जिनपिंग यांचा रोख तैवानच्या सध्याच्या लोकशाहीवादी सरकारकडे होता. या भेटीत त्यांनी ‘एक कुटुंब’ ही संकल्पना मांडली असली, तरी त्यामागे तैवानवर ताबा मिळवण्याची लष्करी धमकी स्पष्टपणे दिसून येत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : MQ4C Triton : अमेरिकेचा 1600 कोटींचा ‘ट्रायटन’ हवेतच गायब; आखातात रोज 3 हजार कोटींचा धूर, रहस्यमय ‘सिग्नल’ने खळबळ

तैवानच्या राजकारणात फूट पाडण्याचा डाव?

चीनने तैवानच्या सत्ताधारी पक्षाला बाजूला सारून थेट विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करणे, ही बीजिंगची एक मोठी चाल मानली जात आहे. तैवानमध्ये अंतर्गत फूट पाडून तिथल्या लोकांच्या मनात ‘एकतेचा’ भ्रम निर्माण करण्याचा हा चीनचा प्रयत्न आहे. चेंग ली-वुन यांच्याशी झालेल्या चर्चेत जिनपिंग यांनी असा विश्वास व्यक्त केला की, दोन्ही बाजूंच्या संबंधांचे भविष्य हे ‘चिनी’ असण्यातच दडलेले आहे. मात्र, तैवानमधील बहुसंख्य जनता स्वतःला स्वतंत्र मानत असल्याने जिनपिंग यांचे हे विधान आगीत तेल ओतण्यासारखे ठरले आहे.

Taiwan opposition leader Cheng Li-wun leaves on April 7 for China and a potential meeting with President Xi Jinping on what she says is a peace mission as Beijing makes a renewed push to convince Taiwanese to support ‘reunification’ https://t.co/VMQxUPdxZT — Reuters (@Reuters) April 6, 2026

credit – social media and Twitter

अमेरिकेची भूमिका आणि वाढता तणाव

चीनच्या या वाढत्या हालचालींवर अमेरिकेचे बारीक लक्ष आहे. अधिकृत राजनैतिक संबंध नसतानाही, अमेरिका हा तैवानचा सर्वात मोठा शस्त्र पुरवठादार आणि संरक्षक आहे. चीनने अनेकदा अमेरिकेला तैवानला शस्त्रे पुरवण्यापासून रोखले आहे, पण अमेरिकेने आपला पाठिंबा कायम ठेवला आहे. आता जिनपिंग यांनी विरोधी पक्षनेत्यासोबत केलेल्या या बैठकीमुळे तैवान सामुद्रधुनीच्या परिसरात चीनच्या लष्करी हालचाली आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. २०२३ पासून सुरू असलेला हा तणाव आता २०२६ मध्ये युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran No Talks : इस्लामाबाद किल्ल्यासारखं सजवलं, पण पाहुणेच गायब; इराणचा शांतता चर्चेला सणसणीत नकार, त्यात पाकिस्तानचा अपमान

ड्रॅगनचा पुढचा पाऊल काय?

शी जिनपिंग यांची ही भेट चीनच्या त्या मोठ्या रणनीतीचा भाग आहे, ज्यामध्ये ते तैवानला पूर्णपणे चीनमध्ये विलीन करू इच्छितात. जिनपिंग यांनी वापरलेली “शिक्षेची” भाषा ही केवळ शब्दांची फुलोरा नसून, ती लष्करी कारवाईची पूर्वसूचना असू शकते. जर तैवानने आपला स्वातंत्र्याचा आग्रह सोडला नाही, तर चीनकडून भविष्यात “काहीतरी मोठे” घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: शी जिनपिंग यांनी बीजिंगमध्ये कोणाची भेट घेतली?

    Ans: चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी तैवानच्या विरोधी पक्ष 'कुओमिंतांग' (KMT) च्या नेत्या चेंग ली-वुन यांची भेट घेतली.

  • Que: जिनपिंग यांनी तैवानच्या स्वातंत्र्याबद्दल काय विधान केले?

    Ans: जिनपिंग म्हणाले की, जे लोक चीनपासून स्वातंत्र्याची मागणी करतील किंवा फुटीरतावाद पसरवतील, त्यांना शिक्षा दिली पाहिजे.

  • Que: 'एक चीन' धोरण (One China Policy) म्हणजे काय?

    Ans: चीनच्या मते तैवान हा एक स्वतंत्र देश नसून तो चीनचाच एक भाग आहे, या धोरणाला 'एक चीन' धोरण म्हटले जाते.

Web Title: Xi jinping meeting taiwan opposition leader punishment warning 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • China
  • Taiwan
  • World War 3
  • Xi Jinping

संबंधित बातम्या

Trump Iran Conflict : महाशक्तींचा थरार! रशियाची बुद्धी अन् चीनची भिंत; पुतिन-जिनपिंग यांच्या चक्रव्यूहात ‘असे’ फसले डोनाल्ड ट्रम्प
1

Trump Iran Conflict : महाशक्तींचा थरार! रशियाची बुद्धी अन् चीनची भिंत; पुतिन-जिनपिंग यांच्या चक्रव्यूहात ‘असे’ फसले डोनाल्ड ट्रम्प

BRICS Summit 2026: ग्लोबल पॉवर प्ले! दिल्लीत भरणार महासत्तांचा दरबार; पुतिन-जिनपिंग यांच्या दौऱ्याकडे जगाचे लक्ष
2

BRICS Summit 2026: ग्लोबल पॉवर प्ले! दिल्लीत भरणार महासत्तांचा दरबार; पुतिन-जिनपिंग यांच्या दौऱ्याकडे जगाचे लक्ष

Missile Technology : चीनच्या हाती लागला ‘विनाशकारी’ खजिना; जमिनीखालून निघाले क्षेपणास्त्र बनवणारे 17 गूढ दुर्मिळ धातू
3

Missile Technology : चीनच्या हाती लागला ‘विनाशकारी’ खजिना; जमिनीखालून निघाले क्षेपणास्त्र बनवणारे 17 गूढ दुर्मिळ धातू

War Alert: आता युद्धाची वेळ! अमेरिकेच्या छातीवर रशिया आणि इराणचे ‘300’ ड्रोन तैनात; ट्रम्पचा क्युबाला थेट लष्करी कारवाईचा इशारा
4

War Alert: आता युद्धाची वेळ! अमेरिकेच्या छातीवर रशिया आणि इराणचे ‘300’ ड्रोन तैनात; ट्रम्पचा क्युबाला थेट लष्करी कारवाईचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.