Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BRICS 2026: 7 वर्षांनंतर चिनी राष्ट्राध्यक्ष येणार भारतात; पंतप्रधान मोदींसोबत होणार ऐतिहासिक भेट, महासत्तांची दिल्लीत महापरिषद

BRICS 2026 : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. ते १२-१३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत दाखल होतील. त्यांच्या या दौऱ्याविषयी गेल्या काही काळापासून बरीच अटकळ बांधली जात आहे. यापूर्वी शी जिनपिंग यांनी २०१९ मध्ये भारताला भेट दिली होती.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 10, 2026 | 05:00 PM
BRICS Summit 2026 Attendees Xi Jinping India Visit 2026

BRICS Summit 2026 Attendees Xi Jinping India Visit 2026

Follow Us
Follow Us:
  • ७ वर्षांनंतर ऐतिहासिक भेट
  • ब्रिक्स शिखर परिषदेत सहभाग
  • द्विपक्षीय चर्चेची शक्यता

भारत आणि चीन या दोन आशियाई महासत्तांमधील संबंधांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची आणि मुत्सद्देगिरीची बातमी समोर आली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग १२ आणि १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणाऱ्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत (BRICS 2026) सहभागी होण्यासाठी भारतात येत आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या दौऱ्याला अधिकृत दुजोरा दिला असून, जागतिक राजकारणाच्या दृष्टीने ही एक मोठी राजकीय घडामोडी मानली जात आहे.

२०२० मधील लडाख येथील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक लष्करी चकमकीनंतर शी जिनपिंग यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. यापूर्वी शी जिनपिंग यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये तमिळनाडूतील महाबलीपुरम (मलप्पुरम) येथे झालेल्या दुसऱ्या भारत-चीन अनौपचारिक शिखर परिषदेसाठी भारताला भेट दिली होती. त्यामुळे जवळपास सात वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर चिनी राष्ट्राध्यक्ष भारतीय भूमीवर पाऊल टाकत आहेत.

द्विपक्षीय बैठकीकडे जगाचे लक्ष

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष निमंत्रणावरून राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर असलेल्या भारत मंडपम येथे ही परिषद पार पडणार आहे. जरी दोन्ही देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी औपचारिक अजेंडा पूर्णपणे जाहीर केला नसला, तरी परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात एक स्वतंत्र द्विपक्षीय बैठक पार पडेल, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump911Claim : ‘दोन अग्निशामकांनी मला उचलून…’ 9/11 बाबत ट्रम्प यांनी मारल्या थापा; अमेरिकन मीडियाने केला ‘असा’ पर्दाफाश

गेल्या वर्षी चीनमधील तियानजिन येथे पार पडलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी चीनचा दौरा केला होता. त्या वेळी झालेल्या भेटीत पंतप्रधान मोदींनी शी जिनपिंग यांना २०२६ च्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारतात येण्याचे आमंत्रण दिले होते. सीमाप्रश्नावरील तणाव काही प्रमाणात शांत झाल्यानंतर दोन्ही देशांचे प्रमुख समोरासमोर येणार असल्याने या बैठकीकडे संपूर्ण जगाचे डोळे लागले आहेत.

भारत-चीन संबंधांमधील तणाव कमी होण्याची चिन्हे

गलवान खोऱ्यातील घटनेनंतर भारत आणि चीनमधील राजकीय आणि व्यापारी संबंध प्रचंड ताणले गेले होते. सीमाभागात दोन्ही देशांनी मोठे लष्करी बळ तैनात केले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांत लष्करी आणि राजनैतिक स्तरावर झालेल्या अनेक फेऱ्यांनंतर सीमेवरील परिस्थिती सामान्य करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत चिनी राष्ट्राध्यक्षांचा हा दौरा दोन देशांमधील बर्फ वितळत असल्याचे आणि संबंध सुधारण्याच्या दिशेने वाटचाल होत असल्याचे स्पष्ट संकेत मानले जात आहेत. सीमेवरील शांतता, द्विपक्षीय व्यापार, आणि प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर या भेटीदरम्यान चर्चा होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Tick Virus : चीनमध्ये सापडला नवा धोकादायक ‘टिक नोरोव्हायरस’; तीव्र ताप आणि डोकेदुखीने नागरिक त्रस्त

जागतिक पातळीवर ब्रिक्सचा वाढता प्रभाव

भारताच्या अध्यक्षतेखाली पार पडत असलेल्या या ब्रिक्स शिखर परिषदेला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. या परिषदेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबतच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इतर सदस्य देशांचे प्रमुख प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेत आणि राजकारणात ब्रिक्स (BRICS) या संघटनेचे स्थान दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे. सध्या ब्रिक्स देश जागतिक लोकसंख्येच्या सुमारे ४९ टक्के (अंदाजे ३.९ अब्ज लोक) लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. तसेच, जगाच्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पादनात (GDP) या गटाचा वाटा ४० टक्क्यांच्या आसपास आहे आणि जागतिक व्यापारात ब्रिक्स देशांचा वाटा २६ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. नवी दिल्लीतील या ऐतिहासिक परिषदेमुळे जागतिक मंचावर ब्रिक्सचा राजकीय व आर्थिक प्रभाव अधिक वाढेल यात शंका नाही.

Web Title: Xi jinping visit india for brics summit 2026 in new delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • Brics Council
  • PM Narendra Modi
  • World news
  • Xi Jinping China

संबंधित बातम्या

Sea Buckthorn: 28 हजार रुपये प्रति लिटर तेल! लडाखच्या ‘या’ सोन्यासारख्या फळामागे का लागल्यात मोठ्या कंपन्या?
1

Sea Buckthorn: 28 हजार रुपये प्रति लिटर तेल! लडाखच्या ‘या’ सोन्यासारख्या फळामागे का लागल्यात मोठ्या कंपन्या?

Saudi Arabia : ईश्वरनिंदेचा आरोप अन् थेट फाशीची शिक्षा; जाणून घ्या श्रीलंकेने तरीही कसा वाचवला नागरिकाचा जीव?
2

Saudi Arabia : ईश्वरनिंदेचा आरोप अन् थेट फाशीची शिक्षा; जाणून घ्या श्रीलंकेने तरीही कसा वाचवला नागरिकाचा जीव?

Chernobyl : माणूस गेला अन् घोडे जगले! चेर्नोबिलच्या रेडिएशन क्षेत्रात 31 घोड्यांचा झाला भयानक प्रयोग; आजचे वास्तव काय?
3

Chernobyl : माणूस गेला अन् घोडे जगले! चेर्नोबिलच्या रेडिएशन क्षेत्रात 31 घोड्यांचा झाला भयानक प्रयोग; आजचे वास्तव काय?

Alberta Referendum: कॅनडाचे 2 तुकडे होण्यापासून टळले; भारतीय मतदारांच्या ‘या’ एका निर्णयामुळे इतिहासाला कलाटणी
4

Alberta Referendum: कॅनडाचे 2 तुकडे होण्यापासून टळले; भारतीय मतदारांच्या ‘या’ एका निर्णयामुळे इतिहासाला कलाटणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.