Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yemen Civil War : येमेनमध्ये पुन्हा हिंसेचा भडका! सरकारी सैन्य अन् हुथी बंडखोरांमध्ये भीषण युद्ध; 24 तासांत 44 ठार

Yemen Civil War : येमेनमध्ये सरकारी सैन्य आणि हुथी बंडखोरांमध्ये झालेल्या लढाईत गेल्या 24 तासांत 44 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही बाजू तैझ आणि लहज या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागांमध्ये सातत्याने सैन्य आणि शस्त्रसामग्री तैनात करत आहेत.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Sep 20, 2026 | 11:26 AM
Yemen civil war updates 2026 Yemen military vs Houthis clash

Yemen civil war updates 2026 Yemen military vs Houthis clash

Follow Us
Follow Us:
  • २४ तासांत ४४ जणांचा मृत्यू
  • सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागांवर संघर्ष
  • मोठ्या प्रमाणावर लष्करी कुमक तैनात

मध्य पूर्वेतील पश्चिम आशियाई देश येमेनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले गृहयुद्ध पुन्हा एकदा अत्यंत भीषण व हिंसक वळणावर पोहोचले आहे. देशातील आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त सरकारी सैन्य आणि इराणसमर्थित हुथी बंडखोरांमध्ये गेल्या २४ तासांत अनेक आघाड्यांवर झालेल्या भीषण संघर्षात किमान ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. नैऋत्य येमेनमधील (Yemen Civil War) तैझ आणि लहज या दोन अत्यंत महत्त्वाच्या प्रांतांमध्ये ही चकमक झाली असून, यामुळे संपूर्ण लाल समुद्र (Red Sea) क्षेत्रातील व्यापारी मार्ग आणि सुरक्षेबाबत मोठी चिंता निर्माण झाली आहे.

स्थानिक लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंनी आपापल्या ताब्यातील रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांवर पकड मजबूत करण्यासाठी अतिरिक्त लष्करी तुकड्या आणि अत्याधुनिक शस्त्रसामग्री तैनात करण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः जागतिक सागरी व्यापारासाठी अतिशय संवेदनशील असलेल्या ‘बाब अल-मंदेब’ सामुद्रधुनीच्या (Bab al-Mandab Strait) नजीक असलेल्या कहाबुब, अल-काधा आणि अल-वाजिया या भागांमध्ये युद्धाची तीव्रता सर्वाधिक दिसून येत आहे.

तैझ प्रांतात हुथींचे हल्ले उधळले; १७ जणांचा मृत्यू

नाव न छापण्याच्या अटीवर एका वरिष्ठ सरकारी लष्करी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तैझ आणि लहज प्रांतांमधील आघाडीवर दोन्ही सैन्यांमध्ये जोरदार गोळीबार अन् क्षेपणास्त्र हल्ले सुरू आहेत. हुथी बंडखोरांनी तैझ प्रांतातील अल-काधा आणि अल-वाजिया येथील सरकारी सैन्याच्या चौक्यांवर आणि मोक्याच्या ठिकाणांवर ताबा मिळवण्यासाठी एकापाठोपाठ एक अनेक प्राणघातक हल्ले केले. मोठ्या प्रमाणावर सैनिकांची कुमक पाठवून सरकारी सैन्याची तटबंदी भेदण्याचा प्रयत्न हुथी लढवय्यांनी केला.

तथापि, येमेनी सरकारी सैन्याने जोरदार प्रत्युत्तर देत हुथी बंडखोरांचे हे सर्व हल्ले यशस्वीरीत्या हाणून पाडले. या भीषण चकमकीत ६ सरकारी सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले, तर लष्कराच्या प्रत्युत्तरदायी कारवाईत ११ हुथी बंडखोर मारले गेले. या भागातील ताबा राखण्यासाठी अद्यापही दोन्ही बाजूंनी अधूनमधून गोळीबार सुरूच आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World Cleanup Day: एस्टोनियातील ‘या’ एका कल्पनेने बदलले जग; जाणून घ्या 20 सप्टेंबरचे महत्त्व आणि इतिहास

लहज आणि कहाबुब पर्वतीय प्रदेशात मोठा संहार

दुसरीकडे, लहज प्रांतातील कहाबुब हा दुर्गम आणि पर्वतीय भाग युद्धाचे मुख्य केंद्र बनला आहे. हा भाग आंतरराष्ट्रीय जलमार्गावर देखरेख ठेवण्यासाठी अत्यंत मोक्याचा मानला जातो. या कहाबुब आघाडीवर झालेल्या धुमश्चक्रीत दोन्ही बाजूंचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकारी लष्करी अधिकाऱ्याने पुष्टी केली आहे की, या भागात हुथींशी लढताना गेल्या २४ तासांत १२ सरकारी सैनिकांना वीरमरण आले.

त्याच वेळी, हुथी गटाच्या लष्करी सूत्रानेही या भागात आपल्या सैन्याचे मोठे नुकसान झाल्याचे मान्य केले आहे. हुथींच्या दाव्यानुसार, कहाबुब भागातील चकमकीत त्यांच्या एका प्रमुख कमांडरासह १५ हुथी लढवय्ये ठार झाले आहेत. दोन्ही बाजूंनी या परिसरात तोफखाना आणि अवजड शस्त्रास्त्रांचा वापर वाढवला असून, यामुळे आजूबाजूच्या नागरी वस्त्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

लाल समुद्र आणि बाब अल-मंदेब सामुद्रधुनीत तणावाचे सावट

येमेनमधील या ताज्या हिंसेची पार्श्वभूमी या महिन्याच्या सुरुवातीला घडलेल्या घटनांशी जोडलेली आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच हुथी बंडखोरांनी येमेनच्या नैऋत्येकडील लाल समुद्राच्या किनारपट्टीवर वेगाने आगेकूच केली होती. १० सप्टेंबर रोजी हुथींनी रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या ‘मोखा’ (Mokha) या बंदर शहरावर पूर्ण ताबा मिळवला होता. त्यानंतरच्याच दिवशी, म्हणजेच ११ सप्टेंबर रोजी, त्यांनी बाब अल-मंदेब सामुद्रधुनीच्या अगदी मध्यभागी असलेल्या ‘मय्यून’ (पेरिम) बेटावर आपले नियंत्रण प्रस्थापित केले.

मय्यून बेट आणि मोखा बंदरावर ताबा मिळवल्यानंतर हुथी बंडखोरांचे मनोबल वाढले असून, त्यांनी जमिनीवरून पुढे सरकत तैझ आणि लहज प्रांतावर वर्चस्व मिळवण्याचे प्रयत्न तीव्र केले आहेत. या भागातून जगातील मोठा खनिज तेल आणि व्यापारी वाहतुकीचा मार्ग जात असल्याने, आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष या युद्धाकडे लागले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Jr Wedding: 500,000 डॉलर्सचे बेट अन फटाके; पुतिन यांच्या जवळच्या सहकाऱ्याने प्रायोजित केले ट्रम्पच्या मुलाचे लग्न

२०१४ पासून सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष

येमेनमधील या विनाशकारी संघर्षाची सुरुवात २०१४ च्या अखेरीस झाली होती. शिया पंथीय हुथी बंडखोरांनी येमेनची राजधानी ‘सना’ (Sanaa) आणि उत्तर येमेनचा बहुतांश भाग आपल्या ताब्यात घेऊन तत्कालीन सरकार उलथवून टाकले होते. त्यानंतर मार्च २०१५ मध्ये सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय आघाडीने येमेनच्या अधिकृत सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी लष्करी हस्तक्षेप केला.

गेल्या एका दशकापासून सुरू असलेल्या या गृहयुद्धात लाखो नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर कोट्यवधी लोक बेघर झाले आहेत. संयुक्त राष्ट्रांनी (UN) यापूर्वी अनेकदा या परिस्थितीला जगातील सर्वात मोठे मानवी संकट घोषित केले आहे. आता पुन्हा एकदा या भागात सुरू झालेल्या तीव्र युद्धामुळे शांततेच्या आशा मावळल्या असून, येमेन पुन्हा एकदा महाविनाशकारी संघर्षाच्या गर्तेत ढकलला गेला आहे.

Web Title: Yemen civil war clash between government forces and houthis 44 killed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • Houthi
  • World news
  • yemen

संबंधित बातम्या

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू
1

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच
2

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट
3

Saudi Arabia Alert : रियाधच्या आकाशात रणशिंग! एअर-रेड अलर्टने थरार; विमानतळाजवळ धुराचे लोट

World News: F-35 चा ‘सिक्रेट पार्ट’ पोहचला हाँगकाँगमध्ये, चीनच्या हाती लागली अमेरिकेची स्टेल्थ टेक्नोलॉजी?
4

World News: F-35 चा ‘सिक्रेट पार्ट’ पोहचला हाँगकाँगमध्ये, चीनच्या हाती लागली अमेरिकेची स्टेल्थ टेक्नोलॉजी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.