Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्यूझीलंडच्या संसदेत हाना रावहितींचा जोरदार विरोध: पारंपारिक हाका नृत्याद्वारे स्वदेशी हक्कांचे समर्थन

न्यूझीलंडच्या संसदेत नुकतीच एक ऐतिहासिक घटना घडली. सभागृहामध्ये माओरी समाज्याच्या हक्कासांठी लढणाऱ्या आणि संसदेतील सर्वात तरूण खासदार हाना रावहिती यांनी हाका नृत्य केले.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 16, 2024 | 11:02 AM
न्यूझीलंडच्या संसदेत हाना रावहितींचा जोरदार विरोध: पारंपारिक हाका नृत्याद्वारे स्वदेशी हक्कांचे समर्थन

न्यूझीलंडच्या संसदेत हाना रावहितींचा जोरदार विरोध: पारंपारिक हाका नृत्याद्वारे स्वदेशी हक्कांचे समर्थन

Follow Us
Close
Follow Us:

वेलिंगटन: न्यूझीलंडच्या संसदेत नुकतीच एक ऐतिहासिक घटना घडली. सभागृहामध्ये माओरी समाज्याच्या हक्कासांठी लढणाऱ्या आणि संसदेतील सर्वात तरूण खासदार हाना रावहिती कारियारिकी मॅपे-क्लार्क यांनी हाका नृत्य केले. ही घटना गुरूवारी झालेल्या सभेदरम्यान घडली. हाना यांनी स्वदेशी संधि विधेयकाची प्रत फाडत पारंपारिक हाका नृत्य केले. त्यांच्या या कृतीने संपूर्ण संसदेत खळबळ उडाली आणि चर्चेला उधाण आले.

पारंपारिक नृत्याद्वारे विधेयकाचा तीव्र विरोध

मिळालेल्या माहितीनुसार, हाका हा माओरी समाजाचा पारंपारिक नृत्यप्रकार आहे. हा नृत्यप्रकार विरोध, एकता आणि सन्मान दर्शवतो. हाना रावहिती यांनी विधेयकाचा तीव्र विरोध करत हा नृत्यप्रकार केली. यावेळी सभागृहात उपस्थित इतर माओरी सदस्य आणि प्रेक्षकही त्यांच्यासोबत सामील झाले. परिणामी, सभापती गेरी ब्राउनली यांना काही काळासाठी सभागृहाचे कामकाज थांबवावे लागले. सध्या न्यूझीलंडच्या संसदेतील अधिवेशनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या – बांगलादेशात प्रेसचे स्वातंत्र्य धोक्यात; 167 पत्रकारांची मान्यता रद्द, पत्रकारांमध्ये तीव्र आक्रोष

माओरी समाजाचे अधिकार धोक्यात

मीडिया रिपोर्टनुसार, न्यूझीलंडचे खासदार तत्त्व विधेयकावर मतदान करण्यासाठी संसदेत जमले होते. यादरम्यान ही घटना घडली. ही घटना स्वदेशी माओरी समाजाच्या अधिकारांशी संबंधित आहे. न्यूझीलंडच्या 1840मधील वैतांगी करारानुसार माओरी समाजाला त्यांच्या जमिनी, संस्कृती आणि हक्कांचे संरक्षण मिळावे, असे ठरवले गेले होते. हे सर्व न्यूझीलंडवासियांना लागू केले पाहिजे असे या विधेयकात नमूद करण्यात आले आहे. मात्र, नव्या विधेयकामुळे हे हक्क आणि अधिकार धोक्यात येण्याची भीती हाना आणि इतर माओरी नेत्यांना वाटू लागली. त्यामुळे त्यांनी हाका न्यृत्याद्वारो याचा तीव्र विरोध नोंदवला.

Powerful: Māori legislators disrupt New Zealand’s parliament with the Haka to protest a damaging new bill which would seek to reinterpret a 184-year old treaty signed between the British Crown and more than 500 Māori chiefs in 1840.

Parliament was suspended after the protest. pic.twitter.com/enEfcaNMyS

— Chelsea Hart ۴۰۳۰ (@chelseahartisme) November 14, 2024


कोण आहेत हाना रावहिती? 

हाना रावहिती करियारिकी मॅपे-क्लार्क या केवळ 22 वर्षांच्या असून त्या न्यूझीलंडच्या संसदेत निवडून जाणाऱ्या सर्वात तरुण खासदार आहेत. 2023 च्या निवडणुकीत त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यांनी माओरी समाजाचे प्रतिनिधित्व केले होते. त्या केवळ एक राजकीय नेत्या नसून माओरी समाजाच्या संस्कृती, हक्क आणि स्वाभिमानासाठी संघर्ष करणाऱ्या एक कणखर नेत्या म्हणून ओळखल्या जातात.

हाना रावहिती यांनी संसदेत दिलेल्या पहिल्याच भाषणातही हाका नृत्य सादर करत आपल्या भूमिकेची स्पष्टता दाखवली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हाना यांचे पाऊल माओरी समाजाच्या हक्कांसाठी महत्त्वाचे ठरत आहे. त्यांच्या या धाडसी कृतीने न्यूझीलंडच्या संसदेत आदिवासी अधिकारांची चर्चा पुन्हा रंगली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या – शाळा बंद, 3 दिवसांचा लॉकडाऊन; लाहोर-मुलतानमध्येही ‘प्रदूषण बॉम्ब’ फुटला, AQI ने 2000 पार

Web Title: Youngest mp hana rawahitis haka dance in new zealand parliament nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 11:02 AM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

क्षणभरात जीव टांगणीला! धावत्या ट्रेनमधून उतरताना महिलेचा पाय घसरला अन्…, पाहा काय घडलं पुढं?, Video Viral
1

क्षणभरात जीव टांगणीला! धावत्या ट्रेनमधून उतरताना महिलेचा पाय घसरला अन्…, पाहा काय घडलं पुढं?, Video Viral

ताजमहलच्या तळघरात काय दडलंय? 300 वर्षांपूर्वीच ते रहस्य अखेर उलगडलं… आश्चर्यांनी भरलेला हा Viral Video एकदा पहाच
2

ताजमहलच्या तळघरात काय दडलंय? 300 वर्षांपूर्वीच ते रहस्य अखेर उलगडलं… आश्चर्यांनी भरलेला हा Viral Video एकदा पहाच

शो मस्ट गो ऑन…! गोरेगावचा ओबेरॉय मॉल की स्विमिंग पूल…; मुसळधार पावसाचा मुंबईकरांनी लुटला आनंद, पाहा VIDEO
3

शो मस्ट गो ऑन…! गोरेगावचा ओबेरॉय मॉल की स्विमिंग पूल…; मुसळधार पावसाचा मुंबईकरांनी लुटला आनंद, पाहा VIDEO

विधींच्या मध्येच वधूने घेऊ पाहिली वामकुक्षी, अन् मग पहा काय घडलं ते… लग्नसमारंभातील Video Viral
4

विधींच्या मध्येच वधूने घेऊ पाहिली वामकुक्षी, अन् मग पहा काय घडलं ते… लग्नसमारंभातील Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.