Yunus Controversial proposal presented to China on India's northeastern states
ढाका: बांग्लादेश आणि भारत संबंध सध्या मोठ्या तणावात आहे. बांगलादेशच्या सतत भारताविरोधीच्या खेळीमुळे दोन्ही देशांत वाद निर्माण होत आहे. दरम्यान बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी चीनला बांगलादेशात आर्थिक गुंतवणुक करण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात युनूस यांनी भारताच्या ईशान्येकडील राज्यांचे भूपरिवेष्टित स्वरुप व्यापार विस्तार करण्यासाठी एक संधी ठरु शकते असे म्हटले आहे. अलीकडेच मोहम्मद युनूस चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यादरम्यान युनूस यांनी हे वादग्रस्त विधान केले.
मोहम्मद युनूस यांनी भारताच्या पूर्वेकडील सात राज्यांना सात बहिणी म्हटले जाते. ही राज्य सर्व बाजूंनी जमिनेने वेढलेली आहेत. या भागांमध्ये पोहोचण्यासाठी कोणताही समुद्री मार्ग नाही. यामुळे चीनच्या दौऱ्यादरम्याव युनूस यांनी शी जिनपिंग यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चीनला भारताच्या पूर्वेकडील भागांत आपला प्रभाव वाढवण्याचे आमंत्रण दिले. यामुळे भारतामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
युनूस यांच्या या विधानामागे चीनला खुश करणे आणि बांगलादेशीतील भारतीय समर्थाकांना कमकुवत करण्याचा डाव असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. भारतासाठी पूर्वेकडील भाग रणनीतिक दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. चीन आधीपासूनच या भागात आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. याच वेळी मोहम्मद युनूस यांच्या या विधानाने मोठी खळबळ उडवली आहे. यामुळे भारतात तीव्र संतापजनक अशा प्रतिक्रिया येते आहेत.
दरम्यान बागंलादेश सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामाना करत आहे. याचवेळी बांगलादेशात राजकीय अस्थिरता देखील निर्माण झाली आहे. शेख हसीनाविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलने सुरु आहे. अशा परिस्थिती युनूस यांचे हे विधान जनतेचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. युनूस यांच्या या विधानामुळे बांगलादेश आणि भारतातील संबंध चिघळण्याची शक्यता आहे.
दरम्यान बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे माहिती सल्लागार महफुज आलम यांनी मोठा दावा केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आलम यांनी म्हटले आहे की, पदच्युत पंतप्रधान शेख हसीन यांच्या आवामी लीग पक्षाचे सदस्य भारतात पळून गेले आहे. शेख हसीना यांच्यावर चीका करताना महफुज यांनी म्हटले आहे की, शेख हसीना यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लोकांना जबरदस्तीने गायब करुन ठार मारले आहे.