पाकिस्तान भारतापेक्षा सुरक्षित? ग्लोबल सेफ्टी इंडेक्सने जाहीर केली नवी यादी; पहिल्या स्थानावर कोण? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ग्लोबल सेफ्टी इंडेक्स 2025 च्या यादीत काही आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. ग्लोबल सेफ्टी इंडेक्स ने 2025 ची जगातील सर्वाधिक सुरक्षित देशांची नवीन यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, पाकिस्तानने भारताला मागे टाकले असून अमेरिका ब्रिटन आणि चीन सारख्या देशांचेही स्थान खाली आहे. नुम्बेओने जाहीर केलेल्या ग्लोबल सेफ्टी इंडेक्स २०२५ प्रसिद्ध केलेल्या या अहवालानुसार, पाकिस्तान 65व्या स्थानी आहे. तर भारत 66व्या क्रमांकावर आहे. हे दोन्ही देशांसाठी एक महत्वाचा संकेत असून पाकिस्तानने आता सुरक्षाबाबत भारतापेक्षा अव्वल स्थान मिळवले आहे. धक्कादायक बाब म्हणजे अमेरिका सुरेक्षेच्या बाबतीत 89व्या स्थानी आहे. दक्षिण आशियाई देशांपेक्षा कमी रँकिंगवर अमेरिका आहे.
UAE आणि अँडोरा 84.7 गुणांसह सर्वात सुरक्षित देश पहिले स्थान पटकावले आहे. त्यानंतर संयुक्त अरब अमीरात 84.5 गुणांसह, नंतर कतार 84.2, तैवान 82.9 आणि ओमान 81.7 या देशांचा क्रमांक लागतो. मजबूत सुरक्षा व्यवस्था, कमी गुन्हेगारी दर आणि चांगल्या राहणीमानामुळे हे देश सुरक्षाबाबतीत अव्वल स्थानी आहेत.
नुम्बेओने प्रसिद्धी केलेल्या या अहवालातील रँकिंग वेगवेगळ्या देशांतील नागरिकांनी केलेल्या सुरक्षा सर्वेक्षणावर आधारित आहे. यामध्ये दिवसा आणि रात्री लोक त्यांच्या सुरक्षिततेबद्दल किती समाधानी आहेत हे दिसून आले. तसेच,चोरी, हल्ले, भेदभाव, आणि गुन्हेगारी यांसारख्या गोष्टींवर आधारित हा अहवाल तयार करण्यात येतो. यामुळे ही यादी शायसकीय आकडेवारी नसून लोकांच्या अनुभव आणि भावनांवर आधारित आहे.
भारतात आणि पाकिस्तानमध्ये फक्त एक क्रमांकाचा फरक आहे. मात्र, हा चिंतेचा विषय आहे. भारताला आपली सुरक्षा यंत्रणा आणखी सुधारण्याची गरज आहे. जेणेकरून भविष्यात देशाला ग्लोबल इंडेक्सच्या यादीत उच्च स्थान मिळू शकेल.तर, जर तु म्ही जगातील सर्वात सुरक्षित देशांमध्ये प्रवास करण्याचा किंवा राहण्याचा विचार करत असाल, तर ही यादी लक्षात ठेवा. तसेच, आपल्या देशाच्या सुरक्षेबद्दल जागरूक राहणे आणि ती सुधारण्यासाठी पावले उचलणे खूप महत्वाचे आहे.
जागतिक सुरक्षा निर्देशांकाच्या या नवीन क्रमवारीवरून आपल्याला दिसून येते की सुरक्षा केवळ सरकार किंवा कायदा आणि सुव्यवस्थेशी जोडलेली नाही तर सामान्य जनतेच्या अनुभवांशी आणि धारणांशी देखील जोडलेली आहे. पाकिस्तान भारताला मागे टाकत आहे, अमेरिका खाली येत आहे आणि लहान देश वरच्या स्थानावर आहेत हे दर्शविते की आपल्याला आपली सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी अधिक काम करण्याची आवश्यकता आहे.