
Zakir Naik Faces Major Setback Before Reaching Dhaka
Bangladesh News in Marathi : ढाका : एक मोठी बातमी समोर आली आहे. बांगलादेशने (Bangladesh)कट्टर इस्लामिक धर्मप्रचारक जाकिर नाईकच्या बांगलादेश दौऱ्यावर स्थगिती दिली आहे. हा भारतासाठी मोठा विजय मानला जा आहे. झाकिर नाईक हा अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये मोस्ट वान्टेड आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. शिवाय नाईकच्या इस्लामिक प्रचाराला मोठा धक्का बसला आहे.
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) सरकार यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारेन मंगळावारी (०४ नोव्हेंबर) झाकिर नाईकला देशात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. सचिवालयात गृह मंत्रालयाच्या बैठकीत हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या कोअर कमिटीत हा निर्णय घेण्यात आला.
भारताच्या दबावामुळे घेतला निर्णय?
भारताला नाईक बांगलादेश दौऱ्यावर जाणार असल्याचा सूत्रांकडून गुप्त माहिती मिळाली होती. तसेच स्थानिक वृत्तपत्रांमध्ये देखील शूत्रांचा हवाला देत नाईकच्या दौऱ्याचे वृत्त दिले होते. यावर भारताने तातडीने आक्षेप घेतला होता. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात एक निवेदन जारी केले होते. या निवेदनात झाकिर नाईकच्या बांगलादेश दौऱ्यावर आक्षेप घेण्यात आला होता. तसेच झाकिर नाईक ढाकामध्ये पोहोचल्यावर त्याला भाराताच्या हवाली केले जावे असे सांगण्यात आले.
दरम्यान भारताच्या या आक्षेपावर बांगलादेशने दखल घेतले असल्याचे म्हटले. बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते एस.एम. महबूबुल आलम यांनी म्हटले की, “आम्ही भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी एका प्रमुख इस्लामिक विद्वानाच्या बांगलादेश दौऱ्याच्या शक्यतेबाबत केलेल्या वक्तव्याची दखल घेतली आहे.” तसेच त्यांनी असेही म्हटले की, भारतासह जगभरातील कोणत्याही देशांनी आरोपी, दहशतवादी, फरार व्यक्तीला आश्रय देऊ नये.
मलेशियात लपून बसला आहे नाईक
झाकिर नाईकवर भारतात दहशतवाद, मनी लाँड्रिंग आणि द्वेषपूर्ण भाषणे पसरवल्याचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २०१६ मध्ये तपास यंत्रणांनी त्याच्यावर दहशतवादविरोधी खटला दाखल केला होता. यानंतर नाइकने भारतातून पळ काढला आणि मलेशिया आश्रय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, नाईक बांगलादेशात २८-२९ नोव्हेंबरला एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार होता. परंतु बांगालदेश सरकारने हा कार्यक्रम बंद केला असून नाईकच्या प्रवेशावरही बंदी घातली आहे.