Zelensky agreed to peace talks stating Ukraine is ready to negotiate with the U.S.
Russia Ukraine War : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी युद्ध संपवण्यासाठी शांतता चर्चेला सहमती दर्शवली आहे. ते म्हणाले की, युक्रेन अमेरिकेसोबत शांतता चर्चा करण्यास तयार आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी शांतता चर्चेला संमती दिली आहे. त्यांनी स्वतः याला दुजोरा दिला आहे. आता या चर्चेची जागाही निश्चित झाली आहे. अमेरिका आणि युक्रेन यांच्यातील पहिली औपचारिक शांतता चर्चा सौदी अरेबियात होणार आहे. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात वॉशिंग्टनच्या ओव्हल ऑफिसमध्ये झालेली बैठक अयशस्वी ठरली होती आणि दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद झाला होता. मात्र, आता झेलेन्स्की यांनी शांतता चर्चेला सहमती देऊन नवा मार्ग खुला केला आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी जाहीर केले आहे की युक्रेन आणि अमेरिका यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी पुढील आठवड्यात सौदी अरेबियात चर्चा होणार आहे. गुरुवारी, झेलेन्स्की म्हणाले की ते सोमवारी सौदी अरेबियाला जाणार आहेत, जिथे ते क्राउन प्रिन्सला भेटतील. यावेळी त्यांची टीम सौदी अरेबियात राहून अमेरिकन अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. युक्रेनला शांतता प्रस्थापित करण्यात सर्वाधिक रस असल्याचेही झेलेन्स्की म्हणाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : विमानात अश्लील प्रकार! महिलेने सर्वांसमोर काढले कपडे, नाईलाजाने पायलटने उचलले ‘असे’ पाऊल
झेलेन्स्कीने माफी मागितली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी सांगितले की, अमेरिकन शिष्टमंडळ शांतता प्रस्थापित करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचा विचार करत आहे. विटकॉफच्या म्हणण्यानुसार, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांना पत्र लिहून संबंध सुधारण्याची इच्छा व्यक्त केली आहे आणि माफीही मागितली आहे.
अमेरिका आणि युक्रेनमधील संबंध लवकरच सामान्य होतील आणि वाटाघाटी पुन्हा सुरू होतील, अशी आशा विटकॉफ यांनी व्यक्त केली. त्याच वेळी, झेलेन्स्की यांनी आपल्या वक्तव्यात पुन्हा एकदा शांततेची इच्छा व्यक्त केली आणि म्हटले की युद्धाचे कारण फक्त रशिया आहे. त्यांनी जागतिक नेत्यांना मॉस्कोवर संघर्ष संपवण्यासाठी दबाव आणण्याचे आवाहन केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : कॅनडाचे माजी पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्पच्या धमकीनंतर कॅमेऱ्यासमोर लागले रडायला; VIDEO आला समोर
युक्रेन रागावला
गेल्या महिन्यात, सौदी अरेबियाने अमेरिका आणि रशियाच्या शिष्टमंडळांचे आयोजन केले होते जेथे रियाधमध्ये युद्धविराम चर्चा झाली. मात्र, या चर्चेत युक्रेन आणि युरोपीय देशांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला नसल्याने त्यांची नाराजी उघड झाली. आता युक्रेन आणि अमेरिकेचे अधिकारीही सौदी अरेबियात भेटणार आहेत.