युद्ध थांबणार? युक्रेनशी चर्चेनंतर ट्रम्प यांचा मॉस्कोला फोन; लवकरच झेलेन्स्की-पुतिन यांची घडवणार भेट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Trump and Zelensky Meeting : वॉशिंग्टन : अखेर चार वर्षाहून अधिक काळ सुरु असलेले रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) लवकरच थांबणार असल्याची शक्यता आहे. नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांच्या बैठक पार पडली. वॉशिंग्टनमध्ये व्हाइट हाउसमध्ये ही बैठक घेण्यात आली. यावेळी नाटो प्रमुख आणि युरोपीय देश देखील उपस्थित होते. दरम्यान या बैठकीनंतर ट्रम्प आणि इतरे सर्व नेत्यांनी लवकरच युद्ध संपणार असा आनंद व्यक्त केला आहे.
या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवरुन माहिती दिली. व्हाइट हाउसमध्ये झालेल्या झेलेन्स्कींसोबतची बैठक यशस्वी ठरली असे त्यांनी सांगितले. तसेच युक्रेनला देण्यात येणाऱ्या सुरक्षेवर युरोपीय देशांनी आणि अमेरिकेने हमी दर्शवली आहे. यामुळे आता लवकरच रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता बैठक पार पडेल असेही ट्रम्प म्हणाले. या बैठकीनंतर त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना देखील याची माहिती दिली.
ट्रम्प यांनी सांगितले की, आता लवकरच रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यात बैठक होईल. सध्या याची तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. यासाठी लवकरच वेळ आणि जागा निश्चिक केली जाईल. तसेच दोन्ही देशांचे राष्ट्राध्यक्ष या बैठकीत सामील होतील.
ट्रम्प भेटीदरम्यान अलास्कात ‘poop suitcase’ घेऊन पुतिनचे बॉडीगार्ड; काय आहे कारण?
ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात झालेल्या बैठकीदरम्यान व्हाइट हाउसमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, फिनलॅंडचे अध्यक्ष अलेक्झॅंडर स्टब, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर, जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ, युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेने आणि नाटोचे प्रमुख मार्क रुटो उपस्थित होते. या सर्वांसोबत चांगली चर्चा झाल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.
ट्रम्प यांनी पुतिन आणि झेलेन्स्कीमध्ये होणाऱ्या पुढील शांतात बैठकीत लवकर होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी असेही म्हटले की, मी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना फोन करुन बैठकीची माहिती दिली आहे. सध्या याची व्यवस्था सुरु आहे. या बैठकीनंतर पुन्हा एक बैठक होईल. यामध्या पुतिन, झेलेन्स्की यांच्यासह मी उपस्थित राहील असे ट्रम्प यांनी म्हटले.
ट्रम्प यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षांपासून सुरु असलेले युद्ध आता थांबेल. यासाठी एक सकारात्मक पावलाच्या दृष्टीने आपण वाटचाल केली आहे. आता या प्रकरणावर उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स, परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि स्टीव्ह वीटकॉफ लक्ष्य ठेवतील.
रशिया युक्रेन युद्ध कधी सुरु झाले?
रशिया आणि युक्रेन युद्ध २०१४ फ्रेब्रवारी मध्ये सुरु झाले तेव्हापासून आतापर्यंत सुरु आहे.
काय आहे रशिया युक्रेन वादाचे कारण?
रशियाने युक्रेनच्या क्रिमियावर ताबा मिळवल्यापासून या युद्धाला सुरुवात झाली होती. पण त्यानंतर युक्रेनने देखील रशियाच्या डोनेट्स्कवर ताबा मिळवला. यामुळे २०२२ मध्ये पुन्हा एकदा दोन्ही देशात आपापला प्रदेश परत मिळवण्यासाठी संघर्ष सुरु झाला.