
Zohran Mamdani RSS Mohan Bhagwat RSS Centenary Global Outreach USA
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत सध्या त्यांच्या तीन देशांच्या महत्त्वाकांक्षी आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अमेरिका, कॅनडा आणि युनायटेड किंगडममध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. मात्र, २९ ऑगस्ट रोजी अमेरिकेतील प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर गार्डन (MSG) येथे होणाऱ्या त्यांच्या मोठ्या कार्यक्रमावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकीय वातावरण तापले आहे. न्यूयॉर्क शहराचे महापौर झोहरान ममदानी यांनी पत्रकार परिषद घेऊन या कार्यक्रमाबद्दल तीव्र चिंता व्यक्त करत त्याला आपला विरोध दर्शवला आहे.
विशेष म्हणजे झोहरान ममदानी हे न्यूयॉर्क शहराचे पहिले भारतीय-अमेरिकन महापौर आहेत. त्यांनी पत्रकार परिषदेत आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा उल्लेख करत भारताच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेचा संदर्भ दिला. ते म्हणाले, “माझ्या आईचे संपूर्ण कुटुंब आजही भारतात राहते. लहानपणापासून माझ्या कुटुंबाने मला भारताची जी ओळख करून दिली आहे, ती एका बहुलवादी, समावेशक आणि धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताकाची आहे.” कोणत्याही देशात विशिष्ट विचारसरणीतून इतरांना वेगळे पाडणाऱ्या किंवा सामाजिक भेद निर्माण करणाऱ्या चळवळींचा उदय होणे अत्यंत चिंताजनक असून, एका भारतीय-अमेरिकन नागरिकाच्या आणि न्यूयॉर्कच्या महापौराच्या नात्याने आपण अशा विचारांच्या पूर्णपणे विरोधात असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Flood: नेपाळमध्ये निसर्गाचा कोप! भोटेकोशी नदीला महापूर; 1000 लोक गेले वाहून; 30 पोलीस बेपत्ता; भयानक VIDEO VIRAL
जरी महापौर ममदानी यांनी या सभेला विरोध केला असला, तरी शहर प्रशासनाकडे खासगी वास्तूमध्ये आयोजित होणारा हा सोहळा थेट रद्द करण्याचे कायदेशीर अधिकार आहेत किंवा कसे, याबाबत त्यांनी अनभिज्ञता व्यक्त केली. दरम्यान, अमेरिकेतील अनेक नागरी हक्क संघटना, जसे की ‘हिंदूज फॉर ह्युमन राइट्स’, ‘इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिल’ आणि ‘इंटरफेथ सेंटर ऑफ न्यू यॉर्क’, यांनी न्यूयॉर्क सिटी हॉलबाहेर एकत्र येत या सभेविरुद्ध जोरदार निदर्शने केली आणि मॅडिसन स्क्वेअर गार्डन प्रशासनाला हा सोहळा रद्द करण्याचे आवाहन केले.
VIDEO | On RSS chief Mohan Bhagwat’s event at Madison Square Garden, New York City Mayor Zohran Mamdani says, “… I also stand here as the first Indian American mayor in our city’s history. My mother’s family is all still in India. The vision of India that I was taught by my… pic.twitter.com/2UbDYj7WHu — Press Trust of India (@PTI_News) August 25, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS Summit 2026: अरुणाचल प्रदेशचा वाद अन् चीनचे मौन; शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्यावरून सस्पेन्स; काय आहे चीनचा खरा हेतू?
दुसऱ्या बाजूला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित ‘जागतिक संपर्क मोहिमे’चा हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. या सोहळ्याच्या आयोजकांनी (‘अहेड फोरम’) सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथील ‘विश्व एकता महोत्सव’ (Universal Oneness Celebration) हा मानवी मूल्यांवर आधारित आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजेच संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे या प्राचीन तत्त्वावर आधारित हा कार्यक्रम असून, सुमारे ५,००० भारतीय नागरिक यामध्ये सहभागी होण्याचा अंदाज आहे.