Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी गाडी खरेदी करताय? मग ‘या’ १० चुकांमुळे होऊ शकते तुमचे लाखोंचे नुकसान!

नवी गाडी खरेदी करताना योग्य नियोजनाच्या अभावामुळे आणि काही चुकांमुळे ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. वाईट सिबिल स्कोअर, मोठे कर्ज कालावधी आणि घाईघाईत केलेले व्यवहार टाळून आपण लाखो रुपयांची बचत सहज करू शकता.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 02, 2026 | 04:25 PM
नवी गाडी खरेदी करताय? मग ‘या’ १० चुकांमुळे होऊ शकते तुमचे लाखोंचे नुकसान!
Follow Us
Follow Us:
  • गाडी खरेदी करताना चांगला सिबिल स्कोअर राखणे आणि योग्य कागदपत्रे सोबत ठेवणे वेळेसह पैशांची बचत करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
  • दीर्घ मुदतीचे कर्ज टाळून कमीत कमी कालावधीचे कर्ज घेणे आणि जास्तीत जास्त डाऊन पेमेंट करणे नेहमीच फायदेशीर ठरते.
  • कोणतीही गाडी खरेदी करताना भावनांच्या भरात निर्णय न घेता बजेट आणि गरजेनुसार योग्य मोलभाव करून गाडी निवडली पाहिजे.

नवी गाडी खरेदी करणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि आनंदाचा टप्पा असतो. आपली गाडीची हौसमौज पूर्ण करत असताना अनेकदा आपल्याला वाटतं की आपण खूप हुशारीने व्यवहार करत आहोत, तर प्रत्यक्षात आपल्याच काही चुकांमुळे गाडीचा व्यवहार बिघडतो किंवा खिशाला मोठा फटका बसतो. गाडी खरेदी करताना बऱ्याच गोशींची दक्षता घेणे गरजेचे असते. गाडी खरेदी करत असताना कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजेत हे आपण आज इथे पाहूयात,

१. क्रेडिट स्कोअरकडे (CIBIL) दुर्लक्ष करणे

  • चूक: चांगले क्रेडिट नसताना थेट शोरूममध्ये जाणे किंवा कधीच कर्ज न घेणे.
  • योग्य मार्ग: अनेकांना वाटते की नेहमी रोख रक्कमेनेच व्यवहार करावा. पण क्रेडिट स्कोअर हा स्नायूंसारखा असतो—वापरला नाही तर कमकुवत होतो. जेव्हा कोणाला गाडीवर खूप चांगली डील किंवा कमी व्याजाचा दर मिळतो, तेव्हा त्यामागे त्याच्या नेगोसिएशन स्किल्सपेक्षा चांगला सिबिल/क्रेडिट स्कोअर कारणीभूत असतो. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर नेहमी चांगला ठेवा.
२. अपुऱ्या कागदपत्रांसह शोरूमला भेट देणे
  • चूक: कोणतीही तयारी न करता गाडी खरेदी करायला जाणे.
  • योग्य मार्ग: शोरूममध्ये जाण्यापूर्वी ड्रायव्हिंग लायसन्स, विमा कार्ड सोबत ठेवा. जुनी गाडी ‘एक्सचेंज’ करणार असाल तर तिचे पासबुक/आरसी बुक आणि टॅक्स पेपर्स जवळ ठेवा. जर तुमचे क्रेडिट कमी असेल, तर उत्पन्नाचा पुरावा पे-स्लिप आणि राहत्या घराचा पुरावा लाईट बिल वगैरे सोबत ठेवा, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल.
जुलै २०२६ मध्ये मारुती सुझुकीची विक्रमी कामगिरी; २.४ लाख वाहनांची विक्री, देशांतर्गत मागणीत मोठी वाढ

३. शोरूम बंद होण्याच्या १५ मिनिटे आधी पोहोचणे

  • चूक: शोरूम बंद व्हायच्या वेळेस जाऊन ३-४ गाड्यांच्या टेस्ट ड्राईव्हची मागणी करणे.
  • योग्य मार्ग: जसे हॉटेल बंद होताना मोठा ग्रुप घेऊन जाणे चुकीचे आहे, तसेच हेही आहे. सेल्समन, फायनान्स मॅनेजर आणि इतर कर्मचाऱ्यांनाही कुटुंबे असतात. ऐनवेळी गेल्याने तुम्हाला कोणतीही विशेष सूट मिळत नाही, उलट घाईघाईत व्यवहार बिघडू शकतो.
४. मेकॅनिकच्या आणि नातलगांच्या सल्ल्यावर आंधळा विश्वास ठेवणे
  • चूक: गाडी खरेदी करण्यासाठी केवळ मेकॅनिकचा सल्ला अंतिम मानणे.
  • योग्य मार्ग: प्रत्येक माणसाचे स्वतःचे आवडते ब्रँड्स आणि पूर्वग्रह असतात. जपानी गाड्या दुरुस्त करणारा मेकॅनिक नेहमी जपानी गाड्यांचाच सल्ला देईल, तर जर्मन गाड्यांचा मेकॅनिक जर्मन गाड्यांची स्तुती करेल. त्यामुळे मेकॅनिकचे ऐका, पण अंतिम निर्णय सर्व बाबींचा विचार करून स्वतः घ्या. शिवाय पंधरा वर्षे जुनी एकचं गाडी वापरणारे नातलग बरोबर असी शकतात, पण ते त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. आपली गरज आणि बजेट लक्षात ठेवा.
५. ज्याच्यासाठी गाडी घ्यायची आहे त्याला घरीच ठेवून येणे
  • चूक: पती किंवा घरातील एकच व्यक्ती जाऊन दुसऱ्यासाठी गाडीची निवड करणे.
  • योग्य मार्ग: तुम्ही कितीही जवळचे असलात तरी दुसऱ्याच्या आवडीनिवडी वेगळ्या असू शकतात. ज्या व्यक्तीला गाडी चालवायची आहे किंवा वापरायची आहे, त्याला शोरूममध्ये सोबत घेऊनच जा.
६. ऑनलाईन माहितीचा अतिरेक
  • चूक: आठवडे अन् आठवडे इंटरनेटवर सतत गाड्यांची तुलना करून गोंधळून जाणे.
  • योग्य मार्ग: योग्य तीच माहिती शोधा. बऱ्याचदा लोक भलत्याच गोष्टींचा अभ्यास करतात. उदाहरणार्थ, एखाद्या गाडीचे किती ‘रिकॉल्स’ झाले आहेत हे तपासा. म्हणजे ज्या गाड्यांमध्ये खराबी निघाल्यानंतर गाड्यांचे विक्री साठी पाठवलेले मोडेल्स माघारी मागवले जातात. ज्या मॉडेलचे रिकॉल्स कमी आहेत, ती गाडी भविष्यात जास्त टिकाऊ आणि विश्वासार्ह ठरण्याची शक्यता असते.
६ ते १० लाखांच्या आत परफेक्ट फॅमिली कार! बघा तुमच्या बजेटमध्ये कोणती कार आहे सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर

७. शोरूममध्ये न जाता फोनवर किंवा ऑनलाईन डिलिंग करणे

  • चूक: घरी बसून फोनवर किंवा ईमेलवर अंतिम दरासाठी हट्ट धरणे.
  • योग्य मार्ग: सेल्समन नेहमी त्याच्यासमोर हातात पैसे/चेक घेऊन बसलेल्या ग्राहकाला प्राधान्य देतो. सर्वोत्तम डील हवी असेल तर स्वतः शोरूमला भेट देऊन प्रत्यक्ष चर्चा करा.
८. जास्त कालावधीचे (७ ते ८ वर्षे) कर्ज घेणे
  • चूक: ईएमआय कमी बसावा म्हणून 7-8 वर्षांचे भरमसाठ कर्ज घेणे
  • योग्य मार्ग: ही सर्वात मोठी चूक आहे. ७ वर्षे पूर्ण होण्याआधीच तुम्हाला त्या गाडीचा कंटाळा येईल. जेव्हा तुम्ही ती गाडी विकायला जाल, तेव्हा गाडीच्या मूल्यापेक्षा कर्जाची उर्वरित रक्कम जास्त असेल. जितके जास्त डाऊन पेमेंट करता येईल तितके करा आणि ३ ते ४ वर्षेचं कर्ज घ्या.
९. सेल्समनशी खोटे बोलणे किंवा गोष्टी लपवणे
  • चूक: सिबिल स्कोअर किंवा जुन्या गाडीच्या एक्सचेंज मूल्याबद्दल खोटी माहिती देणे.
  • योग्य मार्ग: अनेकजण आधी गाडीची किंमत कमी करतात आणि नंतर शेवटी “माझी जुनी गाडी एक्सचेंज करायची आहे” असे सांगतात. पण यामुळे सेल्समनला राग येतो आणि तो तुमच्या जुन्या गाडीची किंमत अधिकच कमी लावतो. सुरुवातीपासूनच पारदर्शक व्यवहार करा, यामुळे तुमचा फायदाच होईल.
१०. गाडीच्या प्रेमात पडणे
  • चूक: गाडी बघताच भावुक होणे आणि तीच खरेदी करायचा हट्ट धरणे.
  • योग्य मार्ग: गाडी ही केवळ लोखंड, रबर आणि काचेची एक वस्तू आहे, ज्याची किंमत काळासोबत कमीच होणारचं आहे. जर तुम्ही गाडीच्या प्रेमात पडला आहात हे सेल्समनच्या लक्षात आले, तर तुमची बार्गेनिंग पॉवर संपते. निर्णय नेहमी बजेट आणि गरजेनुसार घ्या, भावनांच्या भरात नाही! गाडी खरेदी करताना भावनेपेक्षा व्यवहारी विचारांना महत्त्व द्या. योग्य नियोजन आणि योग्य माहितीच्या आधारे तुम्ही तुमचे हजारो-लाखो रुपये वाचवू शकता.

Web Title: 10 car buying mistakes to avoid and save money auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • automobile
  • Car tips
  • cars

संबंधित बातम्या

ऑगस्टच्या महिन्यात स्कूटर विक्रीचा मोठा विक्रम! 8.55 लाखांहून जास्त युनिट्सची केली डिलिव्हरी
1

ऑगस्टच्या महिन्यात स्कूटर विक्रीचा मोठा विक्रम! 8.55 लाखांहून जास्त युनिट्सची केली डिलिव्हरी

किया कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीला 15 वर्षांची बॅटरी वॉरंटी; 1 ऑगस्ट 2026 पासूनच्या ग्राहकांना मोठा फायदा
2

किया कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीला 15 वर्षांची बॅटरी वॉरंटी; 1 ऑगस्ट 2026 पासूनच्या ग्राहकांना मोठा फायदा

पुण्यात TVS iQube MillionR चा जलवा! एकाच दिवशी 100 हून जास्त स्कूटरची डिलिव्हरी
3

पुण्यात TVS iQube MillionR चा जलवा! एकाच दिवशी 100 हून जास्त स्कूटरची डिलिव्हरी

Volvo XC60 आणि XC90 Long-Range PHEV लाँच; मिळणार तब्बल 200 किमी इलेक्ट्रिक रेंज
4

Volvo XC60 आणि XC90 Long-Range PHEV लाँच; मिळणार तब्बल 200 किमी इलेक्ट्रिक रेंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.