अंधेरी आरटीओमध्ये असलेले कर्माड अॅन्ड कंट्रोल सेंटर 24 तास सुरू असते. यासाठी मुंबईतील 4 आरटीओ कार्यालयांमधील सहायक मोटार वाहन निरीक्षक यांची प्रत्येकी 8 तासांच्या शिफ्टामध्ये कार्यरत असतात. कमांड अॅन्ड कंट्रोल सेंटरमधील स्क्रीनवर अलर्ट आल्यावर तातडीने त्या वाहनाच्या ड्रायव्हरला संपर्क साधला जातो व प्रसंगाविषयी माहिती घेतली जाते. ज्या प्रकरणांमध्ये महिलांची छेडछाड अथवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवली असल्याचे निदर्शनास येते, त्या प्रकरणात सहायक मोटार वाहन निरीक्षक है वाहनाचे लाइव्ह लोकेशन, परवानाधारकाचे नाव व नंबर ही माहिती पोलिस विभागाकडे पाठवली जाते. त्यानंतर कारवाईकरून त्याचा रिपोर्ट आरटीओकडे पाठवण्यात येतो.
राज्यातील वाहनांवर बसविलेल्या या व्हीएलटी आणि पनिक बटणच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींचे निरसन कारण्यासाठी अंधेरी प्रादेशिक परिवहन कार्यालयात कमांड अँड कंट्रोल सेंटर 15 जानेवारी 2025पासून सुरू करण्यात आले. वाहनामधील व्हीएलटी मध्ये लोकेशन ट्रेकर, रिअल टाइम लोकेशन, स्पीड अलर्ट, जिओ-फेन्सिंग अशा गोष्टीची माहिती आरटीओला उपलब्ध होते.
वसई परिसरात कार्यालयातून घर जात असताना काही दुचाकीस्वा त्रास देत असल्याच्या भीतीने एक महिला प्रवाशाने पॅनिक बटन दाबले होते. मात्र, संबंधित दुचाकीस्वार हे तिच्या कार्यालयातील मित्र असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कोणतीह कारवाई केली नाही.
Ans: व्हीएलटी ही वाहनाचे थेट (रिअल टाइम) लोकेशन, वेग, हालचाल यावर लक्ष ठेवणारी प्रणाली आहे. पॅनिक बटन आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी दाबल्यास तात्काळ अलर्ट कंट्रोल सेंटरला पाठवते.
Ans: महाराष्ट्रात सुमारे 1 लाख 20 हजारांपेक्षा अधिक प्रवासी वाहनांमध्ये व्हीएलटी आणि पॅनिक बटन बसवण्यात आले आहेत.
Ans: या अलर्टमध्ये फक्त एका महिलेने प्रवासादरम्यान त्रास झाल्याची तक्रार नोंदवली होती.






