(फोटो सौजन्य-AI एआय)
यंदाच्या कार्यक्रमाची व्याप्ती मागच्या वर्षापेक्षा जास्त मोठी असून 100 पेक्षा जास्त कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. यामध्ये 25 पेक्षा जास्त कला प्रदर्शन व इन्स्टॉलेशन्स, 20 हून जास्त लाईव्ह म्युझिक परफॉर्मन्स, 20 पेक्षा जास्त खाद्यविषयक कार्यक्रम आणि 50 पेक्षा जास्त वर्कशॉप्स व संवाद सत्रांचा समावेश आहे. हिमालयीन प्रदेशातील 45 पेक्षा जास्त ब्रँड्स आणि क्राफ्ट कलेक्टिव्हजचा ‘Himalayan Bazaar’ देखील यंदा आकर्षण ठरणार आहे.
कला आणि स्थानिक समुदायांच्या कथा यंदाच्या महोत्सवाचा महत्त्वाचा भाग असतील. गौतम पांडे यांचे ‘Before Time’ लडाखमधील प्राचीन शैलचित्रांची माहिती देईल, तर ‘Into the Himalayas’ या व्हर्च्युअल रिअॅलिटी अनुभवातून स्नो लेपर्डच्या अधिवासाची सफर करता येईल. ‘The Gaddi Suitcase’ मधून गद्दी आणि भंगाली पशुपालक समुदायांच्या परंपरा संगीत, मिनिएचर आर्ट आणि कांगडी लोकसंगीताच्या माध्यमातून मांडल्या जातील.
संगीतप्रेमींसाठी ताबा चाके, रमन नेगी आणि आभा हंजुरा यांचे परफॉर्मन्स असतील. खाद्यसंस्कृतीसाठी ‘Chouka Courtyard’ मध्ये कालिम्पोंग, आसाम, सिक्कीम, शिलाँग, नागालँड आणि हिमाचल प्रदेशातील पदार्थ व चहाच्या परंपरांचा अनुभव मिळेल.
यंदाची थीम ‘Becoming’ असून हवामान बदल, स्थलांतर, बदलता भूभाग आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे हिमालयीन समुदायांमध्ये होत असलेल्या बदलांवर त्यातून प्रकाश टाकला जाणार आहे. याशिवाय दररोज चित्रपटांचे प्रदर्शनही होणार असून त्याचे क्युरेशन धर्मशाला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या ‘DIFF On the Road’ उपक्रमाद्वारे केले जाईल.
2025 मधील आवृत्तीला 11,000 पेक्षा जास्त पर्यटकांनी भेट दिली होती. तसेच 50 पेक्षा जास्त हिमालयीन समुदायांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. रॉयल एनफिल्ड सोशल मिशनने 2030 पर्यंत 100 हिमालयीन समुदायांसोबत काम करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे यंदाचा महोत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता हिमालयातील संस्कृती, पर्यावरण आणि स्थानिक जीवनशैली समजून घेण्याचे व्यासपीठ ठरणार आहे.






