Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

होंडा CB350 ची विक्री दुप्पट; रॉयल एनफिल्डला मिळणार का मोठं आव्हान? जाणून घ्या

350cc ते 500cc बाइक्सच्या ऑगस्ट विक्रीत 19.79% वाढ झाली असून रॉयल एनफिल्डने 83.56% वाट्यासह सेगमेंटवर वर्चस्व कायम ठेवले. पण होंडा CB350 ची 132.52% वाढ आणि नव्या CB500 ची एन्ट्री भविष्यातील स्पर्धा आणखी रंजक बनवते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 28, 2026 | 11:41 AM
होंडा CB350 ची विक्री दुप्पट; रॉयल एनफिल्डला मिळणार का मोठं आव्हान? जाणून घ्या
Follow Us
Follow Us:
  • ऑगस्ट 2026 मध्ये 350cc ते 500cc बाइक्सच्या विक्रीत वार्षिक 19.79% वाढ नोंदवली गेली.
  • रॉयल एनफिल्डने 83.56% वाट्यासह सेगमेंटमध्ये आपले मजबूत वर्चस्व कायम ठेवले आहे.
  • होंडा CB350 च्या विक्रीत 132.52% वाढ झाली असून नव्या CB500 चीही एन्ट्री झाली आहे.
भारताच्या 350cc ते 500cc मोटरसायकल सेगमेंटमध्ये ऑगस्ट 2026 मध्ये चांगली वाढ पाहायला मिळाली. या सेगमेंटमध्ये एकूण 1,31,956 बाइक्सची देशांतर्गत विक्री झाली. मागच्या वर्षी याच महिन्यात 1,10,158 युनिट्सची विक्री झाली होती. म्हणजेच वार्षिक विक्रीत 19.79% वाढ झाली. जुलै 2026 मधील 1,22,483 युनिट्सच्या तुलनेतही विक्री 7.73% वाढली.

रॉयल एनफिल्डच्या बाइक्सची आघाडी

या सेगमेंटमध्ये रॉयल एनफिल्डचा दबदबा कायम आहे. कंपनीने ऑगस्टमध्ये 1,10,259 मोटरसायकलींची विक्री केली. तिचा सेगमेंटमधील वाटा तब्बल 83.56% राहिला. रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 ही 43,428 युनिट्ससह सर्वाधिक विकली जाणारी बाइक ठरली. तिच्या विक्रीत मागच्या वर्षाच्या तुलनेत 20.55% वाढ झाली.

रॉयल एनफिल्डचा‘Journeying Across The Himalayas 2026’ दिल्लीमध्ये रंगणार हिमालयाचा सांस्कृतिक उत्सव!3 डिसेंबरपासून 9 डिसेंबरपर्यंत

बुलेट 350 ची 27,533 युनिट्सची विक्री झाली, तर हंटर 350 ने 23,869 युनिट्सची नोंद केली. मेटिओर 350 ची विक्री 10,669 युनिट्स राहिली. हिमालयनने 3,068 आणि गुरिल्लाने 1,692 युनिट्सची विक्री केली.

होंडा आणि इतर कंपन्यांची कामगिरी

होंडा CB350 ने 9,052 युनिट्सची विक्री करत तब्बल 132.52% वार्षिक वाढ नोंदवली. याशिवाय नव्या होंडा CB500 ची डीलर डिस्पॅचला सुरुवात झाली असून ऑगस्टमध्ये 31 युनिट्स नोंदवण्यात आली.

ट्रायम्फच्या 350cc आणि 400cc मॉडेल्सची एकत्रित विक्री 4,839 युनिट्स झाली. केटीएम 350 आणि 390 यांनी मिळून 3,066 युनिट्सची नोंद केली. बजाज पल्सर 350/400 ची विक्री 1,712, तर डोमिनार 350/400 ची 1,353 युनिट्स राहिली.

Honda CB350 ची किंमत ऐकून व्हाल खुश! बुकिंग करा फक्त Rs. 5,000 मध्ये

हार्ले-डेव्हिडसन X440 ची विक्री 1,223 युनिट्स झाली. एप्रिलियाच्या RS 457 आणि Tuono 457 यांनी अनुक्रमे 297 आणि 74 युनिट्सची नोंद केली. एकूण आकडे पाहता, मोठ्या क्षमतेच्या बाइक्सकडे ग्राहकांचा कल वाढत असल्याचे या विक्रीतून दिसते.

 

Web Title: 350cc 500cc bike sales august 2026 royal enfield honda auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • Honda
  • royal enfield

संबंधित बातम्या

ट्रायम्फपासून होंडापर्यंत; या आठवड्यात लॉन्च झालेल्या दमदार बाइक्स, BMW चीही मोठी तयारी
1

ट्रायम्फपासून होंडापर्यंत; या आठवड्यात लॉन्च झालेल्या दमदार बाइक्स, BMW चीही मोठी तयारी

टाटा एरिस की मारुती डिझायर? कोणती घ्यायची? जाणून घ्या किंमत आणि फीचर्सची तुलना
2

टाटा एरिस की मारुती डिझायर? कोणती घ्यायची? जाणून घ्या किंमत आणि फीचर्सची तुलना

नेपाळमध्ये टीव्हीएस NTORQ 150 ची एंट्री; 150cc हायपर-स्पोर्ट स्कूटरची किंमत 3,69,900 रुपये पासून सुरु
3

नेपाळमध्ये टीव्हीएस NTORQ 150 ची एंट्री; 150cc हायपर-स्पोर्ट स्कूटरची किंमत 3,69,900 रुपये पासून सुरु

Honda QC3 vs TVS iQube 3.1 kWh: किंमत, रेंज आणि फीचर्समध्ये कोण किती पुढे? जाणून घ्या
4

Honda QC3 vs TVS iQube 3.1 kWh: किंमत, रेंज आणि फीचर्समध्ये कोण किती पुढे? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.