Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शहरातल्या ट्राफिकसाठी कोणत्या कार आहेत तुमच्यासाठी बेस्ट? वाचा हे 5 पर्याय

शहरांमधल्या ट्राफिकसाठी उत्तम पर्याय म्हणून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हे 5 कारचे बेटर ऑप्शन्स. ऑफिस, मार्केट किंवा दैनंदिन कामांसाठी हे पर्याय तुम्हाला उपयोगी ठरतील.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: May 28, 2026 | 09:33 PM
शहरातल्या ट्राफिकसाठी कोणत्या कार आहेत तुमच्यासाठी बेस्ट? वाचा हे 5 पर्याय
Follow Us
Follow Us:

जर तुम्हीही रोजरोज शहरांमधल्या ट्राफिकमध्ये गाडी चालवून कंटाळून गेला असाल आणि अशी कार शोधत असाल कि जी छोटी असेल आणि आरामात पार्क होऊन जाईल. तर ही बातमी फक्त तुमच्याचसाठी आहे. आजकाल मोठ्या शहरांत तुफान ट्राफिकमुळे आणि छोट्या छोट्या रस्त्यांमुळे लोक मोठ्या SUV गाड्यांच्याऐवजी छोट्या हैचबैक आणि मायक्रो-SUV कार जास्त पसंत करत आहेत.

अशा कार फक्त गर्दीच्या रस्त्यातूनच पटकन निघत नाहीत तर यांचा मेंटेनंसही कमी असतो. इंधन ही कमी खर्च होत असते. याच गोष्टींना लक्षात ठेवत आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, अशा पाच कार ज्या नेहमीच्या दैनदिन वापरासाठीही उपयुक्त आहेत.

Tata Punch

पहिली कार आहे ती म्हणजे टाटा पंच, जिचा आकार लहान आहे, यामुळे शहरांमधल्या ट्राफिकमधून ती सहजासहजी निघू शकते. रस्त्यावरही ही कार कोणत्याही SUV सारखीच वाटते. 1.2 लिटर पेट्रोल इंजिनच्या बरोबर, शहराच्या हिशोबाने आरामदायक प्रवास, ही कार देऊ शकते. कारमध्ये 10.25 इंचाचा मोठा टचस्क्रीन, सनरुफ 360 डिग्री कॅमेरा आणि सेफ्टी फीचर्स दिलेले आहेत. त्यामुळेच ही कार तरुणांमध्ये आणि कुटुंबांमध्येही पसंत केली जातीय. गाडीची एक्स शोरूम किंमत 5.65 लाख रुपयांपासून सुरु होते.

Maruti Swift

मारुती सुझुकी स्विफ्टचं नाव भारतीय बाजारात कित्येक वर्षांपासून विश्वासार्ह मानलं जातं. ही कार विशेषतः आपल्या जबरदस्त मायलेज, हलकं स्टीयरिंग आणि दमदार इंजिनसाठी ओळखले जाते. शहरांच्या ट्राफिकमध्ये स्विफ्ट चालवणं सोपं यासाठी होतं कारण या कारचं इंजिन लवकर पिकअप घेतं आणि त्यामुळे ओवरटेक करणं सोपं जातं. नवीन स्विफ्टमध्ये तर अजून चांगले फीचर्स आणि मायलेज दिलं गेलं आहे. पेट्रोल मॉडेल जवळपास 25 किमी प्रती लिटर तर CNG मॉडेल 33 किमी एवढ मायलेज काढू शकतं. या कारची किंमत 5.79 लाख रुपयांपासून सुरु होते.

Nissan Magnite

हा पर्याय त्या लोकांसाठी आहे, ज्यांना बजेट मध्ये स्टायलीश आणि फीचर-लोडेड SUV हवी आहे. याच्यात डिजीटल  इंस्ट्रूमेंट क्लस्टर, 360 डिग्री कॅमेरा आणि मोठी टचस्क्रीन दिलेली आहे. कारचा आकार छोटा असल्याने, छोट्या रस्त्यांनी  आणि पार्किंगसाठीही काही अडचण येत नाही. या कारची किंमत 5.79 लाख रुपयांपासून सुरु होते.

Hyundai Grand i10 Nios

जर तुम्हाला अशी कार हवी असेल ज्यात आराम, फीचर्स आणि अगदी सफाईदार ड्रायविंग हवे असेल, तर Hyundai Grand i10 Nios ही कार तुमच्यासाठी बेस्ट आहे. ज्यांना र्प्जाचा लांबचा प्रवास गाठायचा असतो, त्यांची ही कार पहिली पसंती आहे.  या कारमध्ये  8 इंच इंफोटेनमेंट सिस्टम, वायरलेस चार्जिंग, रियर AC वेंट्स अशा बऱ्याच अद्ययावत सुविधा दिलेल्या आहेत. या कारची किंमत जवळपास 5.55 लाख रुपयांपासून सुरु होते.

Maruti Alto K10

जर तुमचं बजेट कमी आहे आणि नेहमीच्या ऑफिसला येण्या-जाण्यासाठी किंवा दैनदिन गोष्टींसाठी एक चांगलीकार बघत असाल तर, Maruti Alto K10 सगळ्यात भारी पर्याय असेल. अगदी छोटा आकार असल्याने ही गाडी छोट्या गल्ल्यांमधून आणि रस्त्यावरून अगदी सहज जाऊ शकते. हिचा टर्निंग रेडीयसही कमी असल्याने, पार्किंग करण्यासाठीही जास्त कष्ट घ्यावे लागत नाही. या कारची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे हिच मायलेजच होय.

 

Web Title: 5 best car for traffick

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 09:33 PM

Topics:  

  • Affordable Cars
  • automobile news
  • cars
  • Traffic

संबंधित बातम्या

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया
1

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया

2027 Kawasaki Ninja 500: भारतीय बाजारात दाखल झाली २०२७ कावासाकी निन्जा ५००! पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स
2

2027 Kawasaki Ninja 500: भारतीय बाजारात दाखल झाली २०२७ कावासाकी निन्जा ५००! पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

२०२७ टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्ट होणार लाँच; नवीन लूक आणि फीचर्सची माहिती आली समोर!
3

२०२७ टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्ट होणार लाँच; नवीन लूक आणि फीचर्सची माहिती आली समोर!

भारतातील ऑटोमोबाईल वर्कफोर्स ‘फक्त सर्टिफिकेटमध्ये श्रीमंत, पण कौशल्यात कमी; ‘लुकस इंडियन सर्व्हिसेस’चे अध्यक्ष राघवन यांचे मत
4

भारतातील ऑटोमोबाईल वर्कफोर्स ‘फक्त सर्टिफिकेटमध्ये श्रीमंत, पण कौशल्यात कमी; ‘लुकस इंडियन सर्व्हिसेस’चे अध्यक्ष राघवन यांचे मत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.