Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन वर्षात कार खरेदी होणार महाग; Nissan, Hyundai पाठोपाठ आता ‘या’ लोकप्रिय कंपनीनेही जाहीर केली दरवाढ

भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल कपंनीनेही कारच्या किंमतीमध्ये वाढ करण्याचे जाहीर केले आहे. लवकरच या कंपनीच्या कारच्या किंमतीमध्ये तब्बल 4 टक्के दरवाढ होणार आहे. त्यामुळे नवीन वर्ष भारतीय ग्राहकांसाठी महागाईचे असणार आहे.

  • By नारायण परब
Updated On: Dec 06, 2024 | 04:00 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

वर्ष संपण्यास अखेरचे काही दिवस राहिले आहेत.या वर्षाच्या अखेरच्य काही दिवसामध्ये काही प्रमाणात ऑफर्स काही ऑटोमोबाईल कंपन्यांकडून दिल्या जात आहेत मात्र सर्वच कंपन्याही आता पुढील वर्षाचे नियोजन करत आहेत. ग्राहकांना 2025 मध्ये नवनवीन अत्याधुनिक कार उपलब्ध होणार आहेच. मात्र या कारच्या किंमतीमध्ये वाढ होणार आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी याबद्दल माहिती दिली आहे. यामध्ये निसान, ऑडी, बीएमडब्ल्यू , ह्युंदाई आदी कंपन्यांचा समावेश आहे. याचधर्तीवर आता भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल कपंनी असलेल्या मारुती सुझुकीने कारच्या किंमतीमध्ये वाढ होण्याचे जाहीर केले आहे. मारुती सुझुकीने आपल्या कारच्या किंमतीमध्ये लवकरच भारतात 4% पर्यंत वाढ होणार असल्याचे जाहीर केले आहे. ही किंमतवाढ  1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे.

डिसेंबर 2024 मध्ये Renault च्या ‘या’ कार्सवर मिळत आहे भरघोस सूट

कंपनीने वाढत्या इनपुट खर्च आणि ऑपरेशनल खर्चामुळे जानेवारी 2025 पासून  कारच्या किंमती वाढवण्याची योजना आखली आहे. असे दरवाढीचे कारण समोर येत आहे.  ही दरवाढ  4 टक्क्यांपर्यंत अपेक्षित असून प्रत्येक मॉडेलनुसार यामध्ये फरक असणार आहे.   “कंपनी सतत खर्च ऑप्टिमाइझ करण्यासाठी आणि ग्राहकांवर होणारा परिणाम कमी करण्याचा प्रयत्न करत असताना, वाढलेल्या किंमतीचा काही भाग बाजारात पाठवण्याची आवश्यकता असू शकते,” असे मारुती सुझुकीच्या नियामक फाइलिंगमध्ये नमूद केले आहे.

कंपनीची विक्री आणि निर्यात

उल्लेखनीय म्हणजे, मारुती सुझुकीने गेल्या वर्षीच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये डीलरशिपवर पाठवलेल्या कारच्या संख्येत 10% वाढ केली आहे. कार विक्रेत्याने गेल्या महिन्यात 1,81,531 युनिट्सची विक्री नोंदवली होती, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत 1,64,439 होती. कंपनीची कार निर्यातही मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे आकडे समोर येत आहेत. 28,633 वाहनांची कंपनीने निर्यात केली आहे. या विक्रीवरुनच कंपनीची भारतातील आणि जगातील लोकप्रियता कळते. परदेशामध्ये मारुती सुझुकीची बाजारपेठे ही मुख्यत: आशियाई देश, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकन देश हे आहेत.

मारुती सुझुकीच्या बाजारपेठेतील कार 

मारुती सुझुकीकडे हॅचबॅक सेगमेंटमध्ये विक्रीसाठी WagonR, Swift, Celerio, Alto K10 आणि S-Presso सारखी मॉडेल्स आहेत, एरिना आउटलेट्सद्वारे MPV ( मल्टी पर्पज व्हेइकल) सेगमेंटमध्ये Eeco आणि Ertiga आहेत  SUV सेगमेंटमध्ये ब्रेझा कार . दरम्यान, ब्रँडच्या प्रीमियम Nexa आउटलेट्समध्ये इग्निस, बलेनो, फ्रॉन्क्स, सियाझ, XL6, जिमनी आणि इनव्हिक्टो सारखी मॉडेल्स देशात विक्रीसाठी आहेत.

इतर कंपन्यांनी केलेली दरवाढ

मारुती सुझुकीची प्रमुख प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या Hyundai Motor कडून 1 जानेवारी 2025 पासून त्यांच्या कारच्या किंमतीमध्ये 25,000 रुपयापर्यंत वाढ केली जाणार आहे.निसान मोटर इंडियाने जानेवारी 2025 मध्ये Magnite या त्यांच्या लोकप्रिय मॉडेलच्या किंमतीमध्ये  2 टक्क्यांपर्यंत वाढ केली जाणार असल्याचे जाहीर केले आहे . त्यामुळे नवीन वर्षात ऑफर्सची घोषणा होणाऱ्यापूर्वी दरवाढीची घोषणा झाल्याने कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मागावे लागणार आहेत.

 

Web Title: After nissan hyundai now popular company maruti suzuki has also announced a price hike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2024 | 04:00 PM

Topics:  

  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

Maruti Brezza 2026 खरेदी करण्यासाठी तुमचा पगार किती असावा? जाणून घ्या On Road Price
1

Maruti Brezza 2026 खरेदी करण्यासाठी तुमचा पगार किती असावा? जाणून घ्या On Road Price

2025 मध्ये Maruti Suzuki च्या ‘या’ कारवर ग्राहक फुल ऑन फिदा! Hyundai आणि Tata च्या वाहनांना सुद्धा चांगला प्रतिसाद
2

2025 मध्ये Maruti Suzuki च्या ‘या’ कारवर ग्राहक फुल ऑन फिदा! Hyundai आणि Tata च्या वाहनांना सुद्धा चांगला प्रतिसाद

Grand Vitara आणि Hyryder चे वर्चस्व संपुष्टात? ‘ही’ ठरतेय देशातील सर्वात स्वस्त Hybrid SUV
3

Grand Vitara आणि Hyryder चे वर्चस्व संपुष्टात? ‘ही’ ठरतेय देशातील सर्वात स्वस्त Hybrid SUV

ग्राहकांनी Maruti Suzuki ‘या’ कारला अक्षरशः रडवलं! मागील 5 महिन्यांपासून 1 देखील युनिट विकले गेले नाही
4

ग्राहकांनी Maruti Suzuki ‘या’ कारला अक्षरशः रडवलं! मागील 5 महिन्यांपासून 1 देखील युनिट विकले गेले नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.