Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kia Sorento Hybrid SUV मार्केट मध्ये धुमाकूळ घालायला सज्ज; लाँचची तारीख ठरली, बुकिंग्स ओपन!

किया इंडिया लवकरच आपली पहिली हायब्रिड SUV 'Kia Sorento' भारतात लाँच करणार असून तिचे प्री-बुकिंग सुरू झाले आहे. १.६-लिटर टर्बो हायब्रिड इंजिन, ५-स्टार सेफ्टी आणि लेव्हल २ ADAS सारख्या प्रीमियम फिचर्ससह ही ७-सीटर कार भारतीय बाजारात टोयोटा फॉर्च्युनरला तगडी टक्कर देईल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 03, 2026 | 03:30 PM
Kia Sorento Hybrid SUV मार्केट मध्ये धुमाकूळ घालायला सज्ज; लाँचची तारीख ठरली, बुकिंग्स ओपन!
Follow Us
Follow Us:
  • किया इंडियाने भारतात आपल्या पहिल्या हायब्रिड SUV सोरेंटोचा अधिकृत टीझर जारी करून प्री-बुकिंग सुरू केले आहे. 
  • १.६-लिटर टर्बो पेट्रोल हायब्रिड इंजिन असलेली ही कार २३८ एचपी पॉवर आणि ३८० एनएम टॉर्क जनरेट करेल. 
  • ड्युअल १२.३-इंच स्क्रीन, लेव्हल २ ADAS आणि ५-स्टार सुरक्षिततेसह ही ५, ६ आणि ७-सीटर पर्यायांत उपलब्ध असेल. 

भारतात हायब्रिड गाड्यांची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे, आणि याच शर्यतीत आता ‘किया इंडिया’ आपली नवी खेळी खेळण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. किआने त्यांच्या जागतिक स्तरावर गाजलेल्या Kia Sorento या प्रीमियम SUV चा पहिला ऑफीशल टीझर रिलीज केला असून, ही गाडी लवकरच भारतीय बाजारात जोराशोरात धडकणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे, ही कियाची भारतातील पहिलीच हायब्रिड कार असणार आहे.

जर तुम्ही या लक्झरी एसयूव्हीची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे कंपनीने डीलरशिप्स आणि ऑफीशल वेबसाईटवरून या गाडीचे प्री-बुकिंग अधिकृतपणे सुरू केले आहे.

जगभरात ४८ लाखांहून अधिक गाड्यांची विक्री!

किआ सोरेंटो ही काही नवीन नाव नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात २००२ मध्ये पदार्पण करणाऱ्या या एसयूव्हीच्या आतापर्यंत चार जनरेशन आल्या असून, तब्बल १३२ देशांमध्ये ४८ लाखांपेक्षा जास्त सोरेंटो गाड्या विकल्या गेल्या आहेत. २०२४ आणि २०२५ या दोन्ही वर्षांत कियाच्या जगभरातील टॉप-३ सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये सोरेंटोने स्थान मिळवले होते.

सुरक्षेच्या बाबतीतही या गाडीला तोड नाही. या कारला IIHS Top Safety Pick+ रेटिंग, NHTSA कडून ५-स्टार क्रॅश-टेस्ट सेफ्टी स्कोर आणि ‘कार अँड ड्रायव्हर’चा ‘एडिटर्स चॉईस’ पुरस्कारही मिळालेला आहे.

Kia India: किया इंडियाची मोठी घोषणा! लवकरच मार्केटमध्ये येणार नव्या इलेक्ट्रिक आणि सीएनजी गाड्या

दमदार हायब्रिड इंजिन आणि परफॉर्मन्स

भारतीय बाजारासाठी या गाडीतील सर्वात मुख्य आणि आकर्षण ठरवणारी गोष्ट म्हणजे तिचं हायब्रिड इंजिन. जरी कियाने अद्याप इंजिनच्या सर्व तांत्रिक बाबी गुपित ठेवल्या असल्या, तरी मिळालेल्या माहितीनुसार यात १.६-लिटर टर्बो पेट्रोल हायब्रिड इंजिन मिळण्याची दाट शक्यता आहे.

  • पॉवर: २३८ hp पॉवर आणि ३८० Nm चा पीक टॉर्क.
  • गिअरबॉक्स: ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन.
  • ड्राइव्ह पर्याय: आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे भारतातही फ्रंट-व्हील ड्राईव्ह आणि ऑल-व्हील ड्राईव्ह हे पर्याय मिळण्याची शक्यता आहे.
आकार आणि बोल्ड लूक!

रस्त्यावर धावताना ही गाडी नक्कीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेईल. कियाने जारी केलेल्या टीझरनुसार, सोरेंटोला एक उंच, रुबाबदार आणि मस्क्युलर लूक देण्यात आला आहे.

  • लांबी: ४,८१५ मिमी
  • रुंदी: १,९०० मिमी
  • उंची: १,७०० मिमी
  • व्हीलबेस: २,८१५ मिमी
किया इंडियाचा मोठा पुढाकार; ग्राहकांसाठी ‘ओनरशिप सर्व्हिस कॅम्प २०२६’चे आयोजन

तसेच, फ्रंट बोनेटवर धावणारी अँग्युलर लाईटची सिग्नेचर, बंपरवरील विशेष लाईट क्लस्टर आणि रुंद बॉडीमुळे या SUV ला एक भक्कम आणि प्रीमियम रोड प्रेझन्स मिळतो. ही कार भारतात ५, ६ आणि ७-सीटर अशा विविध सिटिंग पर्यायांमध्ये लाँच केली जाऊ शकते.

फिचर्सचा खजिना!

किआच्या गाड्या नेहमीच आधुनिक फिचर्ससाठी ओळखल्या जातात आणि सोरेंटोही त्याला अपवाद नाही. या गाडीच्या केबिनमध्ये तुम्हाला पुढील जबरदस्त फिचर्स मिळतील:

  • ड्युअल १२.३-इंच स्क्रीन: डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोटेनमेंटसाठी दोन मोठ्या स्क्रीन.
  • कम्फर्ट फिचर्स: पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि पॉवर्ड ड्रायव्हर सीट.
  • सुरक्षा आणि कनेक्टिव्हिटी: ३६०-डिग्री कॅमेरा सिस्टम, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, एकाधिक एअरबॅग्स आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे Level 2 ADAS (ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम) ही सुरक्षा यंत्रणा.
थोडक्यात सांगायचे तर…

भारतीय बाजारात Toyota Fortuner, Hyundai Tucson आणि Volkswagen Tiguan यांसारख्या गाड्यांशी थेट स्पर्धा करण्यासाठी किया सोरेंटो एक मजबूत आणि ‘पर्यावरणपूरक हायब्रिड’ पर्याय म्हणून समोर येत आहे. जर तुम्हाला एक मोठी, सुरक्षित आणि मायलेजच्या बाबतीतही उत्तम असणारी फॅमिली SUV हवी असेल, तर किया सोरेंटो तुमच्यासाठी एक भारी पर्याय ठरू शकते!

Web Title: All new kia sorento hybrid launch and pre booking open in india auto news india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • automobile
  • best suv cars
  • kia

संबंधित बातम्या

ट्रायम्फच्या 3 बाइक्सचा नवा अवतार! Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 मध्ये मोठे अपडेट्स
1

ट्रायम्फच्या 3 बाइक्सचा नवा अवतार! Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 मध्ये मोठे अपडेट्स

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु
2

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये
3

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट
4

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.