फोटो सौजन्य: iStock
भारतात जरी बजेट फ्रेंडली कार्स मोठ्या प्रमाणात विकल्या जात असल्या तरी आजही देशात लक्झरी कार्सची डिमांड सुद्धा चांगली आहे. देशातील अनेक राजकीय नेतेमंडळी आणि सेलिब्रेटी लोकांकडे लक्झरी कार्स पाहायला मिळतात. देशात अनेक लक्झरी कार उत्पादक कंपन्या आहेत. त्यातीलच एक कंपनी म्हणजे पोर्शे.
पोर्शेने देशात अनेक उत्तम आणि हाय परफॉर्मन्स कार ऑफर केल्या आहेत. या कंपनीच्या कार्स अनेक सेलिब्रेटी मंडळींकडे सुद्धा पाहायला मिळतात. नुकतेच कंपनीने आपल्या कारच्या किमतीत 15 लाखांपर्यंतची वाढ केली आहे. यात फक्त Porsche Macan ची किमतीत बदल झालेला नाही. चला जाणून घेऊया कोणत्या कारच्या किमतीत किती लाखांची वाढ झाली आहे.
नवीन इंटिरिअर, इंजिन आणि जास्त फीचर्ससह लाँच झाली 2025 Skoda Kodiaq
खाली पोर्शेच्या विविध मॉडेल्सच्या किंमतीत झालेल्या बदलांची माहिती दिली आहे:
911 Carrera ची किंमत 1.99 कोटी रुपये वरून 2.11 कोटी रुपये झाली आहे (वाढ: 12 लाख रुपये).
911 Carrera 4 GTS ची किंमत 2.75 कोटी वरून 2.83 कोटी रुपये झाली आहे (वाढ: 8 लाख रुपये).
Cayenne ची किंमत 1.42 कोटी वरून 1.49 कोटी रुपये झाली आहे (वाढ: 7 लाख रुपये).
Cayenne GTS ची किंमत 2 कोटी वरून 2.08 कोटी रुपये झाली आहे (वाढ: 8 लाख रुपये).
Cayenne Coupé ची किंमत 1.49 कोटी वरून 1.55 कोटी रुपये झाली आहे (वाढ: 6 लाख रुपये).
Cayenne GTS Coupé ची किंमत 2.01 कोटी वरून 2.09 कोटी रुपये झाली आहे (वाढ: 8 लाख रुपये).
Tata Punch साठी किती वर्षांचं लोन घ्यावं, जेणेकरून दरमहा भरावा लागेल फक्त 10 हजार रुपये EMI ?
Panamera ची किंमत 1.70 कोटी वरून 1.80 कोटी रुपये झाली आहे (वाढ: 10 लाख रुपये).
Panamera GTS ची किंमत 2.34 कोटी वरून 2.47 कोटी रुपये झाली आहे (वाढ: 13 लाख रुपये).
Taycan II ची किंमत 1.67 कोटी वरून 1.70 कोटी रुपये झाली आहे (वाढ: 3 लाख रुपये).
Taycan 4S II ची किंमत 1.91 कोटी वरून 1.96 कोटी रुपये झाली आहे (वाढ: 5 लाख रुपये).
Taycan Turbo II ची किंमत 2.54 कोटी वरून 2.69 कोटी रुपये झाली आहे (वाढ: 15 लाख रुपये).
ह्या किंमती एक्स-शोरूम आहेत आणि बदललेल्या किमतीत काही मॉडेल्समध्ये लक्षणीय वाढ तर काहींमध्ये स्थिरता पाहायला मिळते.