फोटो सौजन्य: @AnshuTechblog (X.com)
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांच्या मागणीनुसार बेस्ट आणि उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर करत असतात. त्यातीलच एक विश्वासाची कंपनी म्हणजे टाटा मोटर्स. ही कंपनी अनेक वर्षांपासून बेस्ट कार ऑफर करत आहे. आता कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपले लक्षकेंद्रीत करत आहे.
कंपनीने देशात अनेक बेस्ट कार्स ऑफर केल्या आहेत. टाटा पंच ही त्यातीलच एक. गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये टाटा पंच ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली होती. या टाटा कारला ग्लोबल एनसीएपी कडून क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार सेफ्टी रेटिंग देखील मिळाले होते. टाटा पंचची एक्स-शोरूम किंमत 6 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 10.32 लाख रुपयांपर्यंत जाते. भारतीय बाजारात या कारचे एकूण 31 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहेत. तसेच ही कार पाच रंगांच्या पर्यायांसह येते.
Hero कडून ग्राहकांना खास गिफ्ट ! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीत 32000 पर्यंतची केली घट
टाटा पंच प्युअर एमटीच्या सर्वात स्वस्त मॉडेलची ऑन-रोड किंमत 6,88,250 रुपये आहे. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला 6.20 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. टाटा कार लोनवर खरेदी करण्यासाठी, तुम्हाला ठरविक रक्कम डाउन पेमेंट स्वरूपात करावी लागेल. जर तुम्ही डाउन पेमेंटमध्ये जास्त रक्कम जमा केली तर तुमचा ईएमआय त्यानुसार कमी होईल. जर बँक या टाटा कारसाठी घेतलेल्या लोनवर 9% व्याज आकारत असेल, तर या व्याजदरानुसार एक निश्चित रक्कम दरमहा बँकेत ईएमआय म्हणून जमा करावी लागेल.
जर तुम्हाला टाटा पंच लोनवर घ्यायचे असेल आणि दरमहा फक्त 10 हजार रुपयांचा ईएमआय भरायचा असेल, तर तुम्हाला सात वर्षांसाठी लोन घ्यावे लागेल.
जर तुम्ही EMI मध्ये जास्त रक्कम जमा करू शकत असाल तर तुम्ही कमी कालावधीसाठी लोन देखील घेऊ शकता. जर तुम्ही 6 वर्षांसाठी लोन घेतले तर तुम्हाला 9 टक्के व्याजदराने दरमहा 11,200 रुपये ईएमआय भरावा लागेल.
भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कारचा बोलबाला; मात्र ‘या’ कारकडे ग्राहकांनी ढुंकूनही पहिले नाही
जर तुम्ही ही टाटा कार खरेदी करण्यासाठी पाच वर्षांसाठी लोन घेतले आणि बँक या लोनवर 9 टक्के व्याज आकारत असेल, तर दरमहा 12,900 रुपयांचा ईएमआय बँकेत जमा होईल.
जर पंच खरेदी करण्यासाठी चार वर्षांसाठी लोन घेतले असेल, तर दरमहा 9 टक्के व्याजदराने 15,500 रुपये ईएमआय बँकेत जमा करावे लागतील.
टाटा पंच खरेदी करण्यासाठी, कोणत्याही बँकेकडून कर्ज घेण्यापूर्वी सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचणे महत्वाचे आहे. बँकांच्या वेगवेगळ्या धोरणांनुसार वरील आकडेवारीत फरक असू शकतो.