
‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरची 100+ किमी रेंज, किंमत 1 लाखांपेक्षा कमी
Ampere Magnus G Max ही स्कूटर ईको मोडमध्ये 100 किलोमीटरपेक्षा जास्त रिअल-वर्ल्ड रेंज देण्यास सक्षम आहे. या स्कूटरमध्ये 3 kWh लिथियम फेरो फॉस्फेट (LFP) बॅटरी देण्यात आली असून, बॅटरीसाठी 5 वर्षे किंवा 75,000 किमीची वॉरंटी दिली जात आहे.
भारतात 2025 मध्ये Skoda च्या लाखभर वाहनांची विक्री! ग्राहकांनी भरभरून दिला प्रतिसाद
शहरातील रोजच्या वापरासाठी उपयुक्त ठरणारी ही स्कूटर 20% ते 80% चार्ज होण्यासाठी सुमारे 4.5 तासांचा चार्जिंग वेळ घेते. याशिवाय, या सेगमेंटमधील मोठ्या मानल्या जाणाऱ्या 33 लिटर अंडर-सीट बूट स्टोरेजमुळे घरगुती वापरासाठी ती अधिक सोयीची ठरते.
Magnus G Max मध्ये हब-माउंटेड मोटर देण्यात आली असून, ती 1.5 kW नॉमिनल आणि 2.4 kW पीक पॉवर निर्माण करते. स्कूटरमध्ये Eco, City आणि Reverse असे राइडिंग मोड्स देण्यात आले आहेत.
याचा कमाल वेग 65 किमी प्रतितास असून, 165 मिमी ग्राउंड क्लीयरन्स, ड्युअल फ्रेम चेसिस आणि मजबूत सस्पेन्शन सेटअपमुळे ही स्कूटर खड्डे, स्पीड ब्रेकर्स आणि असमान रस्त्यांवर सहजपणे चालवता येते.
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 3.5-इंच LCD डिजिटल क्लस्टर, USB चार्जिंग पोर्ट, LED हेडलॅम्प आणि इंडिकेटर्स देण्यात आले आहेत. TCU च्या माध्यमातून कनेक्टेड फीचर्सचा पर्यायही उपलब्ध आहे. Magnus G Max ही स्कूटर Monsoon Blue, Matcha Green आणि Cinnamon Copper या तीन आकर्षक ड्युअल-टोन रंगांमध्ये उपलब्ध असून, ती स्टायलिश आणि डायनॅमिक लुक देते.
या लाँचबाबत बोलताना ग्रिव्ह्ज इलेक्ट्रिक मोबिलिटीचे मॅनेजिंग डायरेक्टर विकास सिंग म्हणाले, “Magnus G Max ही स्कूटर भारतीय कुटुंबे त्यांच्या रोजच्या वापरात स्कूटर कशी वापरतात, याचा सखोल अभ्यास करून विकसित करण्यात आली आहे. डिझाइन, परफॉर्मन्स, सेफ्टी, रेंज, स्टोरेज आणि बॅटरी विश्वसनीयता या सर्व बाबींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. आमचे विस्तृत सर्व्हिस आणि आफ्टर-सेल्स नेटवर्क ग्राहकांना विश्वास आणि समाधान देईल.”
17 वर्षांहून अधिक इलेक्ट्रिक मोबिलिटीचा अनुभव असलेल्या Ampere ने Magnus G Max च्या माध्यमातून भारतीय कुटुंबांसाठी स्पेस, रेंज आणि सुरक्षिततेचा समतोल साधणारी इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे. पारंपरिक स्कूटरमधून इलेक्ट्रिक वाहनांकडे वळू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक व्यवहार्य आणि विश्वासार्ह पर्याय ठरणार आहे.