Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त 3 मिनिटांत रिक्षाच बनेल स्कूटर! Hero कंपनीचं भन्नाट ‘इनोव्हेशन’; सरकारनेही दिला हिरवा सिग्नल

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे वाढत्या किमतींमुळे आता लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. या सगळ्या परिस्थितीमुळे Hero MotoCorp ने भारतात एक नवीन अनोखं 'इनोव्हेशन' आणलं आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 31, 2026 | 01:02 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Hero MotoCorp ने भारतात एक नवीन अनोखं ‘इनोव्हेशन’ आणलं
  • देशातील पहिली 2-in-1 इलेक्ट्रिक गाडी असणार
  • गाडी गरजेनुसार स्कूटर आणि कधी रिक्षा अशा दोन्ही स्वरूपात
Hero Surge S32 : पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे वाढत्या किमतींमुळे आता लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. या सगळ्या परिस्थितीमुळे Hero MotoCorp ने भारतात एक नवीन अनोखं ‘इनोव्हेशन’ आणलं आहे. Hero Surge S32 असे या इलेक्ट्रिक वाहनाचे नाव आहे. हे देशातील पहिली 2-in-1 इलेक्ट्रिक गाडी असणार आहे. ही गाडी गरजेनुसार स्कूटर आणि कधी रिक्षा अशा दोन्ही स्वरूपात बदलता येणार आहे. यामुळे तुम्ही एकाच गाडीचा वापर वैयक्तिक कामासाठी आणि व्यावसायिक कमाईसाठी म्हणजे मालवाहतूक किंवा प्रवासी स्वरुपासाठी करू शकता. आणि या अनोख्या स्कीमला सरकारनेही ग्रीन सिग्नल दाखवला आहे.

जर कधी अचानक CNG Car चा पिकअप ढासळलाच तर सर्वात पहिले ‘हा’ पार्ट चेक करा, अन्यथा…

वेगवेगळ्या कामांसाठी ठरणार उपयुक्त

Hero Surge S32 चं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी काही मिनिटांमध्ये वेगळ्या स्वरुपातून वेगळ्या स्वरुपात रुपांतरीत होऊ शकते. ही गाडी अवघ्या 3 मिनिटांत थ्री-व्हीलरमधून स्कूटर आणि स्कूटरमधून पुन्हा थ्री-व्हीलरमध्ये रूपांतरित करता येते. यामध्ये एक स्पेशल’मॉड्यूल’ दिलेलं आहे, ज्यामुळे याचा आकार बदलतो. हे मॉड्युल जोडून किंवा काढून याचा आकार बदलता येतो. विशेष म्हणजे, टू-व्हीलर आणि थ्री-व्हीलर अशा दोन्ही मोडमध्ये वेगळी मोटर आणि बॅटरी दिली गेली आहे, ज्यामुळे विविध कामांसाठी याचा पुरेपूर वापर करता येऊ शकतो.

It is notable to see an Indian OEM taking a forward-looking approach and demonstrating India’s engineering capabilities on a global platform. Hero MotoCorp has introduced the Surge S32 electric vehicle—positioned as the world’s first category-swapping vehicle, capable of… pic.twitter.com/nL4JcOBAW1 — Nitin Gadkari (@nitin_gadkari) March 30, 2026

नितीन गडकरींकडून कौतुक

या मॉड्युलला केंद्र सरकारनेही हिरवा सिग्नल दिला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही खास सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट शेअर केली आहे. आणि या मॉड्युलचं या उपक्रमाचं कौतुक केलं आहे.

किती वजन वाहून नेऊ शकते ही स्कूटर?

Hero Surge S32 हे वाहन प्रामुख्याने छोटे व्यापारी, डिलिव्हरी बॉईज आणि दैनंदिन कामे करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारं मॉड्युल आहे. थ्री-व्हीलर मोड यामध्ये ५०० किलोपर्यंत वजन वाहून नेण्याची क्षमता आहे. त्यामुळे इतकं वजन वाहून नेलं जाऊ शकतं. तर स्कूटर मोडमध्ये ट्रॅफिकमधून सहज प्रवास केला जाऊ शकतो. या इलेक्ट्रिक वाहनामध्ये काही खास फीचर्स दिले गेले आहेत. ज्यात एलईडी लाईट्स, डिजिटल डिस्प्ले आणि काही प्रगत सर्व्हिसेस यांसारखे आधुनिक फीचर्सचा समावेश होतो. या गाड्या पूर्णपणे इलेक्ट्रिक असल्याने यामुळे प्रदूषण होण्याचा कोणताच प्रश्न नाही. त्यामुळे या गाड्या पर्यावरणासाठीही अत्यंत पूरक आहेत.

कधी होणार लाँच?

कंपनी या गाड्या लवकरच भारतीय बाजारपेठेत लाँच करण्याच्या तयारीत आहे. एकंदरीत, Hero Surge S32 हे एक स्मार्ट इलेक्ट्रिक वाहन आहे. ज्यामुळे प्रवास तर होतोच सोबत कमाईचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देखील ही गाडी मदत करते त्यामुळे भारतात तिच्या येण्याची वाट बऱ्याच उत्साहाने पाहिली जात आहे.

Duster, Creta की Kia Seltos, कोणती SUV एकतर्फी मार्केट गाजवते? जाणून घ्या सेफ्टी, टेक्नॉलॉजी आणि फीचर्स

Web Title: An auto rickshaw transforms into a scooter in just 3 minutes nitin gadkari approval marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • automobile news
  • Central government
  • Electric Vehicles
  • Hero MotoCorp
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!
1

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!

Hyryder CNG: 1 लाखात ‘ही’ कार घेतल्यास किती भरावे लागणार हफ्ते? EMI चा हिशेब एका क्लिकवर
2

Hyryder CNG: 1 लाखात ‘ही’ कार घेतल्यास किती भरावे लागणार हफ्ते? EMI चा हिशेब एका क्लिकवर

Mahindra Scorpio Lifestyler: मनावर राज्य करायला रस्त्यावर उतरली महिंद्रा स्कॉर्पिओ लाइफस्टायलर, किंमत फक्त 19.79 लाख
3

Mahindra Scorpio Lifestyler: मनावर राज्य करायला रस्त्यावर उतरली महिंद्रा स्कॉर्पिओ लाइफस्टायलर, किंमत फक्त 19.79 लाख

Hero Splendor Off Road Crossover: हिरो स्प्लेंडर आता नव्या ऑफ-रोड रुपात; डिझाइनचे पेटंट भारतात बुक!
4

Hero Splendor Off Road Crossover: हिरो स्प्लेंडर आता नव्या ऑफ-रोड रुपात; डिझाइनचे पेटंट भारतात बुक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.