नादच खुळा ! Anant Ambani च्या प्रत्येक कारची किंमत 1 कोटींपासून सुरु, जाणून घ्या कार कलेक्शन
भारतातील श्रीमंत कुटुंबाबद्दल बोलायला घेतले, तर सर्वात पहिले नाव अंबानी कुटुंबियांचे येते. अंबानी कुटुंबातील प्रत्येक सदस्याची सोशल मीडियावर चर्चा होत असते. यातही मुकेश अंबानींची चर्चा जास्त होत असते. नुकतेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाले. या लग्नाची सुरुवात होण्याअगोदरच याची जोरदार चर्चा झाली होती. अनेक देश विदेशातील सेलिब्रेटी मंडळींनी या लग्नाला हजेरी लावली होती.
मुकेश अंबानी याचे चिरंजीव अनंत अंबानींची सुद्धा खूप चर्चा होताना दिसते. त्यांच्या ताफ्यात देखील अनेक आलिशान कार आहेत, ज्यांची किंमतच 1 कोटींपासून सुरु होते. चला याबद्दल जाणून घेऊयात.
आता Hyundai AURA अजूनच झाली किफायतशीर, ‘या’ स्वस्त किमतीत लाँच झाला नवीन व्हेरिएंट
अनंत अंबानीकडे रोल्स-रॉइस कलिनन ब्लॅक बॅज आहे, ज्याची किंमत तब्बल 6.95 कोटी रुपये आहे. ही लक्झरी कार कस्टमाइज करता येते, ज्यामुळे या कारची किंमत आणखी वाढते.
मर्सिडीज-बेंझ एस क्लास ही एक उत्तम लक्झरी कार आहे. या कारमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. या कारच्या इंटिरिअरमध्ये अनेक प्रगत फीचर्ससह सुसज्ज आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 1.77 कोटी रुपयांपासून सुरू होते आणि 1.86 कोटी रुपयांपर्यंत जाते.
रेंज रोव्हर वोगमध्ये 2996 सीसी, 6-सिलेंडर इनलाइन, 4-व्हॉल्व्ह, डीओएचसी इंजिन आहे, जे 5,500 आरपीएमवर 394 बीएचपी पॉवर निर्माण करते आणि 2000 आरपीएमवर 550 एनएम टॉर्क जनरेट करते. या कारची किंमत तब्बल 2.26 कोटी रुपये आहे.
मर्सिडीज-बेंझ G63 AMG ही याच्या पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. या मर्सिडीज-बेंझ कारमध्ये 3982 सीसी इंजिन आहे. या कारमध्ये पाच लोक सहज बसू शकतात. या कारची किंमत 2.45 कोटी रुपयांपासून सुरू होऊन 3.30 कोटी रुपयांपर्यंत जाते.
15 July 2025 भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी असेल एकदम खास, नेमकं कारण काय?
BMW i8 ही ऑटोमोटिव्ह इनोव्हेशनवर आधारित कार आहे. या कारची डिझाइन खूपच आकर्षक आहे. तसेच, या कारमध्ये हायब्रिड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. या कारची किंमत 2.14 कोटी रुपये आहे.
रोल्स-रॉइस फॅंटम ड्रॉपहेड कूपमध्ये 6749 सीसी इंजिन आहे. हे इंजिन 460 bhp पॉवर आणि 720 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार 15 रंगांच्या व्हेरिएंटसह येते. या रोल्स-रॉइस कारची किंमत 6.83 कोटी रुपये आहे.