फोटो सौजन्य: @HyundaiIndia (X.com)
भारतीय ऑटोमोबाईल मार्केट सातत्याने विकसित होत असून ग्राहकांच्या गरजाही झपाट्याने बदलत आहेत. पूर्वी फक्त मायलेज आणि किंमत महत्त्वाची मानली जात होती, पण आता ग्राहकांना लुक्स, सेफ्टी फीचर्स, कनेक्टेड टेक्नॉलॉजी आणि स्मार्ट ड्रायव्हिंग अनुभव हवा असतो. ही बदलती मागणी लक्षात घेता अनेक ऑटोमोबाईल कंपन्या त्यांच्या विद्यमान कार्सचे नवीन अपडेटेड व्हेरिएंट बाजारात सादर करत आहेत. यात आकर्षक डिझाईन, स्मार्ट फीचर्स आणि इंधन कार्यक्षमतेचा समावेश असतो.
देशात अनेक कार उत्पादक कंपन्या आहेत, त्यातीलच एक कंपनी म्हणजे ह्युंदाई मोटर्स. नुकतेच कंपनीने त्यांच्या लोकप्रिय एंट्री सेडान ह्युंदाई AURA चा नवीन व्हेरिएंट S AMT लाँच केला आहे. हा नवीन व्हेरिएंट आणण्यामागील कारण म्हणजे त्यांची विक्री आणखी वाढवणे. यासोबतच, ग्राहकांना कमी किमतीत एक उत्तम सेडान कार देखील देण्यात येणार आहे. चला जाणून घेऊया ह्युंदाई AURA S AMT मध्ये काय खास आहे?
Yamaha कडून दुसरी FZ‑X Hybrid बाईक लाँच, दमदार परफॉर्मन्ससह मिळणार उत्तम मायलेज
Hyundai AURA S AMT व्हेरिएंटमध्ये 1.2-लिटर Kappa पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे शहरी आणि महामार्गावर ड्रायव्हिंगसाठी उत्तम अनुभव देते. वाहनावर चांगले नियंत्रण ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक स्टेबिलटी कंट्रोल (ESC), उताराच्या ठिकाणी चांगले नियंत्रण ठेवण्यासाठी हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल (HAC), एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प (DRL), ड्रायव्हर आणि सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी 6 एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), इलेक्ट्रिक फोल्डिंग आणि इंडिकेटर लाइट्ससह बाहेरील रियर-व्ह्यू मिररची माहिती देण्यासाठी यात प्रदान केले आहे.
Hyundai AURA S AMT व्हेरिएंट भारतीय बाजारात 8.07 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आली आहे. भारतीय बाजारात, Hyundai AURA ही कार Honda Amaze, Maruti Suzuki Dzire,आणि Tata Tigor सारख्या एंट्री लेव्हल सेडानशी स्पर्धा करते.
15 July 2025 भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी असेल एकदम खास, नेमकं कारण काय?
HMIL चे संचालक आणि सीओओ तरुण गर्ग म्हणतात की, कंपनीचे उद्दिष्ट स्मार्ट मोबिलिटीला अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आहे. ते म्हणाले की, AURA S AMT मध्ये AMT ट्रान्समिशनचा समावेश करण्याचा निर्णय या दृष्टिकोनाला बळकटी देतो. यामुळे एंट्री-सेगमेंटमध्ये ‘value‑for‑money’ अधिक चांगले मिळेल, ज्यामध्ये परफॉर्मन्स, सुरक्षितता आणि सुविधा एकत्रितपणे उपलब्ध असतील.