
1 लाखांपेक्षा कमी किमतीत नवी Electric Scooter! 200 KM पर्यंत रेंज; फीचर्सही जबरदस्त
Konarc च्या S Line मध्ये वेगवेगळ्या रेंजचे पर्याय देण्यात आले आहेत.
Konarc S – 100 KM रेंज: ₹99,999
Konarc S – 125 KM रेंज: ₹1,21,999
Konarc S – 161 KM रेंज: ₹1,44,999
Konarc S – 200 KM रेंज: किंमत नंतर जाहीर होणार
Konarc Z – 125 KM आणि 161 KM: किंमत नंतर जाहीर होणार
कंपनीकडून 21 सप्टेंबरपासून डिलिव्हरी सुरू केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
CNG Car Tips: CNG कार जास्त गॅस खातेय? मायलेज वाढवण्यासाठी लक्षात ठेवा या 4 गोष्टी
Konarc मध्ये नवीन Bedrock बॅटरी सिस्टम देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. विविध बॅटरी कॉन्फिगरेशननुसार स्कूटरची रेंज बदलते. टॉप S-Line मॉडेल एका चार्जमध्ये 200 किमी IDC रेंज देऊ शकते, असा दावा आहे. बेस मॉडेलची दावा केलेली IDC रेंज 100 किमी आहे.
प्रत्यक्ष रेंज मात्र रायडिंग मोड, वेग, वजन, रस्त्यांची स्थिती आणि हवामानानुसार कमी-जास्त होऊ शकते.
Konarc S Line ची टॉप स्पीड 70 किमी प्रतितास, तर Z Line ची टॉप स्पीड 80 किमी प्रतितास असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील दैनंदिन प्रवासासोबत तुलनेने लांब अंतराच्या वापरावरही कंपनीने भर दिल्याचे दिसते.
या इलेक्ट्रिक स्कूटरमधील चर्चेतील फीचर म्हणजे Airwalk. इलेक्ट्रिक स्कूटर वजनदार असल्यामुळे पार्किंग, चढ-उतार किंवा अरुंद जागेत ती हाताने पुढे-मागे नेणे अवघड होऊ शकते.
Airwalk फीचरमध्ये इलेक्ट्रिक मोटरची मदत घेऊन कमी वेगात स्कूटर पुढे किंवा मागे हलवणे सोपे होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पार्किंग करताना विशेषतः हे फीचर उपयोगी ठरू शकते.
नव्या Konarc चे डिझाइन Ather च्या 450 सीरीजच्या तुलनेत अधिक फॅमिली-केंद्रित असतानाच स्पोर्टी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हँडलबारमध्ये इंटिग्रेटेड LED हेडलॅम्प, U-शेप्ड LED DRLs आणि ग्लॉसी ब्लॅक काउल मिळतो.
याशिवाय रुंद सिंगल-पीस सीट, फ्लॅट फ्लोअरबोर्ड, पिलियन ग्रॅब रेल, इंटिग्रेटेड बॅकरेस्ट, फ्रंट स्टोरेज आणि टचस्क्रीन इन्स्ट्रुमेंट कन्सोल यांसारखी वैशिष्ट्ये सांगण्यात आली आहेत.
स्कूटरमध्ये 450W इन-बिल्ट चार्जर देण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सामान्य इलेक्ट्रिकल सॉकेटचा वापर करून चार्जिंग करता येणार आहे. EL प्लॅटफॉर्मवरील ऑनबोर्ड चार्जिंग तंत्रज्ञानामुळे एकूण 900W पर्यंत चार्जिंग क्षमता मिळते आणि योग्य परिस्थितीत बॅटरी दोन तासांच्या आत 0 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.
भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात Ather Konarc ची स्पर्धा प्रामुख्याने TVS iQube, Bajaj Chetak, Ola S1 Series आणि Vida यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सशी होण्याची शक्यता आहे. विशेषतः एक लाख रुपयांच्या आसपासच्या किमतीतील मॉडेलमुळे फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमधील स्पर्धा आणखी तीव्र होऊ शकते.